Breaking News

संजय राऊत ट्विट करत म्हणाले, पीठ से निकले खंजरों को गिना जब… बंडखोर खासदारांवर टीका करत फुटीरावर शायरीतून निशाणा

राज्यात शिवसेना सोडून गेलेल्या आमदारांनंतर आता १२ खासदारही शिंदे यांच्या गटात सहभागी झाले. तत्पूर्वी रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडत शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. या साऱ्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले, ते माझे सहकारी होते. त्यांनी फुटीरांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर मी काहीही बोलणार नाही. मात्र आम्ही एनडीएतून यापूर्वीच बाहेर पडलो होतो. आणि आताही आम्ही एनडीएचा भाग नाही.

रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत जी भावना व्यक्त केल्या त्यानंतर त्यांना मी फोन करून त्यांच्याशी बोललो. त्यांना काही गोष्टी समजाविण्याचा प्रयत्न केला. आम्ही दोघांनी एकत्रित काम केले आहे. त्यामुळे त्यांच्याशी मी बोलू शकत होतो. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. न्यायालयात स्पष्ट होईल कोण खरे कोण खोटे असेही त्यांनी सांगितले. रात्री मात्र त्यांनी एक ट्विट करत बंडखोरांवर चांगलाच निशाणा साधला.

शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेल्या सूचक ट्वीटची चर्चा सुरू झाली आहे. याआधी देखील संजय राऊतानी शायरीच्या माध्यमातून सूचक शब्दांत केलेल्या ट्वीटची अशीच चर्चा रंगली होती.

संजय राऊतांनी ट्वीटमध्ये सूचक शब्दांत भावना व्यक्त केल्या आहेत. रामदास कदम यांनी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर या ट्वीटची चर्चा केली जात आहे. या ट्वीटमध्ये संजय राऊतांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्यांनी एक शेर ट्वीट केला आहे.

“पीठ से निकले खंजरों को गिना जब, ठीक उतने ही थे, जितनों को गले लगाया था…जय महाराष्ट्र”, असं या ट्वीटमध्ये संजय राऊतांनी म्हटलं आहे.

Check Also

नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *