Breaking News

गानसम्राज्ञीला “अखेरचा हा दंडवत” पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांनी दिला मुखाग्नी

मराठी ई-बातम्या टीम

सुरेल आवाज आणि आपल्या कल्पक शैलीमुळे तमाम संगीतरसिकांना गाणे, संगीतातून मंत्रमुग्ध करणाऱ्या गान सम्राज्ञी आणि भारताची गानकोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांना मुंबईकरांसह देशातील जनतेने संध्याकाळी ७.१० च्या सुमारास शिवाजी पार्क येथे शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप दिला. त्यांच्या चितेला मंगेशकर यांचे बंधु हृदयनाथ मंगेशकर यांनी मुखाग्नी दिला. त्यांच्यावर लष्करी आणि शासकिय इतमामात अंत्यसंस्कार देण्यात आले. यावेळी संपूर्ण मंगेशकर कुटुंबिय यावेळी हजर होते.

यावेळी लता मंगेशकर यांनीच गायलेले “अखेरचा हा तुला दंडवत, सोडून जाते गाणं” या गाण्यातील बोलप्रमाणे त्यांनीच या भूलोकीचा अखेरचा निरोप घेत असल्याचे सिनेरसिकांना धन्यवाद देत असल्याचे वातावरण जाणवत होते.

गानसम्राज्ञीला अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मनसे प्रमुख राज ठाकरे त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर, बॉलीवूड स्टार शाहरूख खान, गीतकार जावेद अख्तर आदींनी त्यांच्या पार्थिवाचे शिवाजी पार्कवर अंत्यदर्शन घेतले. या सर्वांसह हजारोंच्या संख्येने लता मंगेशकर यांचे अनेक चाहते हजर होते. बॉडीवूड महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांची कन्या श्वेता बच्चन यांनी लता मंगेशकर यांच्या घरी जावून त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

यावेळी लता मंगेशकर यांची त्यांच्या राहत्या प्रभूकुंज या घरापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यांनी अंत्ययात्रा हाजी अली, सिध्दीविनायक मंदिर मार्गे त्यांना शिवाजी पार्क येथे आणण्यात आले. त्यांची अंत्ययात्रा सुरु झाल्यानंतर असंख्य चाहते आणि सहभागी झाले. तर अनेक रहिवाशी त्यांना इमारतीच्या गॅलरीतून तर रस्त्याच्या कडेला उभे राहून त्यांना अखेरचा निरोप देत होते. अंत्ययात्रे दरम्यान आणि त्यांच्यावरील अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थित त्यांच्या चाहत्यांकडून लता दिदी अमर रहे, लता मंगेशकर अमर रहे या घोषणांनी परिसर गाजवून सोडत भावनापूर्ण आणि साश्रुपूर्ण नयनांनी मंगेशकर यांना अखेरचा निरोप दिला.

 

Check Also

नाना पटोले यांची टीका,… हा तर छत्रपती शिवरायांचा अपमान

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *