Breaking News

साधी राहणीमान असलेल्या लता मंगेशकर यांची संपत्ती किती? जाणून घ्या ३७० कोटी रूपयांची संपत्ती आणि चार पॉश गाड्या होत्या

मराठी ई-बातम्या टीम

गानसम्राज्ञी तथा भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. त्या आपल्या सुरेल आवाजाबरोबरच साधी राहणीमानासाठी प्रसिध्द होत्या. त्याचबरोबर गायनाबरोबरच त्यांना क्रिकेट आणि कारचा शौक होता.

संगीताव्यतिरिक्त कार आणि क्रिकेटची आवड असलेल्या मंगेशकर यांनी ३६ भाषांमध्ये ५० हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. मंगेशकर यांची पहिली कमाई किती होती? त्यांच्याकडे कोणत्या गाड्या होत्या हे जाणून घ्या.

लतादीदींचे जीवन अत्यंत साधे होते. जरी त्याच्याकडे गाड्यांचे मोठं कलेक्शन होतं. रिपोर्ट्सनुसार, लताजींची एकूण संपत्ती ३७० कोटी रुपयांची असून लताजी दक्षिण मुंबईतील पॉश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेडर रोड भागात रहात होत्या प्रभाकुंज भवनात राहत होत्या.

लता दीदींच्या गॅरेजमध्ये आलिशान गाड्या उभ्या आहेत. लताजींनी फार पूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांना गाड्यांची आवड आहे. लताजींनी या मुलाखतीत सांगितले होते की, त्यांनी पहिल्यांदा शेवरलेट खरेदी केली होती. लता दीदींनी ही कार त्यांच्या मूळ गावी इंदूर येथून खरेदी केली होती. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे ही कार त्यांनी आपल्या आईच्या नावावर घेतली होती. यानंतर त्याने बुइक (Buick) कार खरेदी केली, त्याच्याकडे क्रिस्लर (Chrysler) कार देखील होती.

लतादीदींना यश चोप्रा यांनी भेट म्हणून मर्सिडीज कार दिली होती. त्यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले होते, “दिवंगत यश चोप्रा हे मला त्यांची बहीण मानत होते. ‘वीरझारा’चे संगीत रिलीज झाले तेव्हा त्यांनी मर्सिडीजची चावी माझ्या हातावर ठेवली आणि सांगितले की, ही कार भेट आहे. माझ्याकडे अजूनही ती कार आहे.”

याशिवाय त्या क्रिकेटची मॅच पाहण्याची आवड होती. त्यामुळे त्या सुनिल गावस्करपासून ते महेंद्रसिंग धोनी यांच्यापर्यत अनेक खेळाडूंच्या फॅन होत्या. त्यांच्या खेळाचे त्या नेहमी कौतुक करत असत. याशिवाय नव्या गाण्यावरून त्यांचे आणि सुप्रसिध्द गायक शंकर महादेवन यांचेही दररोज बोलणे होत असत. त्यांनी एखादे नवे गाणे रेकॉर्ड करून पाठविले की त्याचे कौतुकही करत असत.

Check Also

गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी या तीन मराठी चित्रपटांची निवड मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

यंदाच्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनाकडून ग्लोबल आडगाव, गिरकी आणि बटरफ्लाय या तीन मराठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *