Breaking News

अखेर मान्सून राज्यात धडकलाः वातावरणातल्या गारव्याने नागरिकांना दिलासा कोकणात बरसल्या मान्सूनच्या सरी

महाराष्ट्रातील प्रत्येक जण ज्या गोष्टीची गेल्या काही दिवसांपासून आतुरतेनं वाट पाहत होता. तो दिवस आज उजाडला आहे. महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालेलं आहे. दक्षिण महाराष्ट्रात पावसानं हजेरी लावली आहे. ८ जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनतर महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये मान्सून पोहोचला आहे. भारतीय हवामान विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. दरवर्षीच्या तुलनेत मान्सून यंदा चार ते पाच दिवस उशिरा आलेला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या मान्सून महाराष्ट्रातील रत्नागिरीपर्यंत पोहोचला आहे. तर कर्नाटकातील शिमोगा, हसन या शहरांसह धर्मपुरी, श्रीहरी कोटा इथपर्यंत मान्सून पोहोचला आहे. मान्सून दाखल होण्याचा दरवर्षीचा अंदाज पाहता यंदा मान्सून चार ते पाच दिवस उशिरानं दाखल झाला आहे.

महाराष्ट्रातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक मान्सून कधी दाखल होणार याकडे डोळे लावून बसले होते. अखेर राज्यात मान्सूनचं आगमन झालं आहे. महाराष्ट्रात आज म्हणजे ११ जून रोजी मान्सून दाखल झाला आहे. महाराष्ट्रात रत्नागिरीपर्यंत मान्सून पोहोचला आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपरजॉय वादळामुळं मान्सूनच्या आगमनाला उशीर झाला होता. अखेर मान्सून केरळमध्ये ८ जूनला म्हणजेच सात दिवस उशिरा दाखल झाला. केरळमध्ये मान्सून १ जूनला दाखल होतो. त्यानंतर मान्सून ७ जूनपर्यंत दाखल होतो. दरवर्षीच्या तुलनेत यंदा अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपरजॉय वादळामुळं मान्सूनचं आगमन उशिरानं झालं.

दरम्यान, बिपरजॉय वादळामुळे गुजरातच्या समुद्र किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन झाल्याने आणि महाराष्ट्रातील काही भागात मान्सूनने हजेरी लावल्याने राज्यातील अनेक भागात वातावरणात बदल होत उखाडा कमी होऊन थंड वारे वाहण्यास सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला.

Check Also

आणखी काही दिवस या जिल्ह्यात राहणार अवकाळी पाऊसाचा मुक्काम…

मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावत आधीच उन्हाच्या तडाक्याने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना चांगलाच तडाखा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *