Breaking News

Tag Archives: sudhir mungantiwar

मंत्री, राज्यमंत्र्यांनो संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत कार्यालये खाली करा सामान्य प्रशासन विभागाचे मंत्रिमंडळ कार्यालयांना आदेश

मुंबईः प्रतिनिधी राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर १२ नोव्हेंबर २०१९ रोजी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयासह सर्व मंत्री, राज्यमंत्र्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला असल्याने या सर्वांनी आपापली कार्यालये १३ नोव्हेंबर २०१९ रोजी संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत रिकामी करावीत असे आदेश राज्याच्या सामान्य प्रशासन …

Read More »

अखेर अरविंद सावंतांच्या रूपाने शिवसेना एनडीएतून बाहेर भाजपाआधीच शिवसेनेकडून युती तुटल्याची अधिकृत घोषणा

नवी दिल्लीः प्रतिनिधी राज्यातील सत्ता स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून घडामोडींना मोठा वेग आला आहे. त्यामुळे एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष म्हणून मोदी सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेचे अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांनी आज राजीनामा दिला. विशेष म्हणजे भाजपाने युतीसंदर्भात भूमिका जाहीर करण्यासाठी शिवसेनेला संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंतची …

Read More »

भाजपा-शिवसेना युतीचा निर्णय संध्याकाळी ७.३० नंतर माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीचा निकाल जाहीर होवून १७ दिवस झाले. तसेच राज्यातील जनतेने शिवसेना-भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीला कौल दिलेला असतानाही शिवसेनेकडून कोणताही प्रतिसाद दिला नाही. उलट विरोधक असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीशी चर्चा सुरु ठेवल्याने याबाबतचा निर्णय राज्यपालांनी शिवसेनेला दिलेल्या मुदतीनंतर अर्थात संध्याकाळी ७.३० वाजल्यानंतर युतीबाबतचा निर्णय भाजपा घेणार असल्याची माहिती माजी अर्थमंत्री सुधीर …

Read More »

कोणतीही भूमिका ठाम भूमिका न घेता भाजपाने राज्यपालांची घेतली भेट चंद्रकांत पाटील, मुनगंटीवार, महाजन, शेलारांचे शिष्टमंडळ भेटले

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील सत्ता स्थापनेसंदर्भात राज्यपालांकडे दावा करण्याऐवजी एकंदरच निर्माण झालेल्या राजकिय परिस्थितीची माहिती भाजपाच्या शिष्टमंडळाने दिली. तसेच या परिस्थितीतून मार्ग काढण्याची विनंती भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांना राजकिय परिस्थितीची माहिती दिल्याचे भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. राज्यपालांच्या भेटीसाठी सुधीर मुनगंटीवार, …

Read More »

शिवसेनेची वाट पहात भाजपा राज्यपालांना भेटणार सरकार स्थापनेची चर्चा करण्यासाठी राजभवनावर जाणार असल्याची मुनगंटीवारांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील जनतेने दिलेल्या जनादेशाप्रमाणे राज्यात महायुतीचेच सरकार स्थापन होणार आहे. मात्र अद्याप शिवसेनेनेकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. तरीही आम्ही मुख्यमंत्र्यांच्यावतीने गुरूवारी राज्यपालांची भेट घेवून सरकार स्थापनेसंदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. राज्यातील भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. याबैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरिष …

Read More »

केंद्रीय मंत्री गडकरींच्या मध्यस्थीने मातोश्रीशी बोलणी होणार उध्दव ठाकरे यांच्याशी फोनवर संपर्क साधण्याचे प्रयत्न

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील सत्ता स्थापनेवरून निर्माण झालेला राजकिय घोळावर तोडगा काढण्यासाठी भाजपाने पुढाकार घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मध्यस्थी मार्फत बोलणी करण्याच्या हालचाली भाजपाकडून करण्यात येत असल्याची माहिती भाजपामधील विश्वसनीय सूत्रांनी दिली. विधानसभा निवडणूकीचा निकाल जाहीर होवून १२ दिवस उलटून …

Read More »

कधीही आनंदाची बातमी जाहीर होईल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील सत्ता स्थापनेवरून निर्माण झालेल्या गोंधळावर भाजपाकडून पहिल्यादांच आपली भूमिका जाहीर करत कधीही आनंदाची बातमी जाहीर होणार असल्याचे सांगत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेशी चर्चा करण्याची तयारी असल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. तसेच राज्यातील सरकार हे देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली स्थापन होणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष …

Read More »

तीन महिन्यात ३३ कोटीपैकी ३१ कोटी वृक्षांची लागवड नाशिक, नांदेड, चंद्रपूर, पुणे, यवतमाळसह कोल्हापूरात १ कोटीहून अधिकची वृक्ष लागवड झाल्याची वनमंत्री मुनगंटीवार यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी जुलै ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत ३३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प राज्याच्या वन विभागाच्यावतीने जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार जुलै ते सप्टेंबर महिना अजून पूर्ण होण्याच्या आताच राज्यात ३१ कोटी २० लाख ०७ हजार ७३७ वृक्षांची लागवड झाली असून ही संख्या ३३ कोटी संकल्पाच्या ९०.६५ टक्के इतकी …

Read More »

नियोजनशून्य कारभारामुळे पाच वर्षात ६० टक्केच निधी खर्च भाजप-शिवसेना सरकारचा आर्थिक नियोजनात बेशिस्तीचा कळस: विजय वडेट्टीवार

मुंबई: प्रतिनिधी भाजप शिवसेना युती सरकारची पाच वर्षातील कामगिरी सुमार झाली असून आर्थिक नियोजनही फसले आहे. सरकारचा आर्थिक ताळेबंद पाहिला तर पाच वर्षात सर्व विभागांसाठी एकूण १४ लाख १३ हजार २७६ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली होती, परंतु ८ लाख ९६ हजार ४८२ कोटी रुपये खर्च करण्यात आले. याचाच …

Read More »

घड्याळे, स्टॉप वॉचेस, फ्रीझ, फ्रीझर, वॉटर कुलरसह अनेक वस्तूंच्या किंमती कमी होणार १९३ वस्तूंवरील कर दरात घट झाल्याची अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी वस्तू आणि सेवा कर कायद्यांतर्गत तीन टप्प्यात वस्तूंचे दर कमी करण्यात आले. यामध्ये २२८ पैकी १९३ वस्तुंवरील कर २८ टक्क्यांहून १८ टक्के इतके कमी करण्यात आले. १८ टक्क्यांच्या व १२ टक्क्यांच्या कर दराच्या स्लॅबमधील काही वस्तूंचे कर दर आणखी कमी करण्यात आले तर काही वस्तूंवर करमाफी देण्यात …

Read More »