Breaking News

Tag Archives: rajesh tope

खाजगी दवाखान्यांनी सरकारी दरानेच उपचार करावेत आरोग्य संस्थांमध्ये खाटा वाढवितानाच ऑक्सिजन आणि रेमडीसीवीरचे व्यवस्थापन करा-टोपे

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाची ही दुसरी लाट सुरु झाल्यानंतर आता पुन्हा खाजगी रूग्णालयांनी कोरोना रूग्णांकडून जास्तीची बील वसुली सुरु केली आहे. हे चुकिचे असून खाजगी रूग्णालयातही अधिग्रहीत करण्यात आलेल्या खाटांवर दाखल करण्यात आलेल्या कोविड रूग्णांवर राज्य सरकारने निर्धारीत केलेल्या दरानुसारच उपचार करावेत आणि त्यानुसारच बीलांची आकारणी करावे. तसेच ही बीले …

Read More »

मुख्यमंत्र्यांचे पोलिस दलास आदेश: नियम मोडणाऱ्यांवर कडक कार्यवाही करा राज्यातील निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे

मुंबई : प्रतिनिधी गेल्या वेळेस आपण कोरोनाचा संसर्ग रोखून दाखविला होता, मात्र आताची परीक्षा अधिक कठीण व आव्हानात्मक आहे त्यामुळे ब्रेक दि चेन मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याकडे सर्व जिल्हाधिकारी तसेच पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावे. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गाफील राहून चालणार नाही आणि संसर्ग आणखी फैलावलेला परवडणार नाही, असे …

Read More »

रेमडिसिव्हीरच्या किरकोळ विक्रीवर बंदी फक्त रूग्णालयातच मिळणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

मुंबई : प्रतिनिधी ‘कोरोना’ रुग्णांवर उपचारासाठी उपयुक्त असलेल्या रेमडिसिव्हीर इंजेक्शनचे वितरण योग्य पध्दतीने होण्यासाठी त्याच्या नियंत्रणाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. रेमडिसिव्हीर इंजेक्शनच्या विक्रीतील गैरप्रकार टाळण्यासाठी त्यांच्या किरकोळ विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. ही औषधे वितरकांमार्फत थेट रुग्णालयांना देण्यात येणार आहेत. रेमडिसिव्हीर इंजेक्शनच्या वापराबाबात सुयोग्य नियमावली तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री …

Read More »

कोरोना: अबब बाधित ६३ हजारावर… तर आठवड्यात ४ लाखाची वाढ ६३ हजार २९४ नवे बाधित, ३४ हजार ८ बरे झाले तर ३४९ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी ४ एप्रिल ते १० एप्रिल असे एका आठवड्यात ४ लाख नवीन रुग्ण राज्यात आढळले. तर १९८२ मृत्यू झाले./ सध्या मृत्यू दर ०.५ टक्के इतका असून तो वाढतोय. गेल्या महिन्यात १४ मार्च ते २० मार्च या आठवड्यात१.५ लाख रुग्ण होते. सध्या पॉझिटीव्हिटी दर २६ टक्के असून जितक्या जास्त चाचण्या …

Read More »

मुख्यमंत्र्याचे टास्क फोर्सला निर्देश: या सुविधांमध्ये वाढ करा ऑक्सीजनची उपलब्धता, वैद्यकिय सुविधांसह अन्य गोष्टींवर वाढ करण्याचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी कोविडच्या मोठ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन प्लॅन्टची उभारणी, बेड्स व इतर वैद्यकीय सुचिधा वाढवणे, रेमडीसीव्हीर उपलब्ध करणे, लसीकरण वाढवणे व विशेषत: सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणे यादृष्टीने तात्काळ कार्यवाही व्हावी असे सांगतांना लसीकरण वाढविण्यासाठी महाराष्ट्राला अधिक लसींचा पुरवठा व्हावा अशी विनंती परत एकदा …

Read More »

सर्वपक्षिय नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरेंनी दिले हे संकेत कडक निर्बंधाशिवाय दुसरा पर्याय राहीला नाही

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील. आपल्याला प्रथम जीव वाचविण्याला प्राधान्य द्यावे लागेल. ही जर आरोग्याची आणीबाणी असेल तर प्राधान्य हे नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला असले पाहिजे. विरोधी पक्ष नेत्यांनी दिलेल्या सूचनांवर निश्चितपणे गांभीर्याने विचार केला जाईल, त्यांनी चांगल्या …

Read More »

सर्वपक्षिय बैठकीत होणार आठवडाभऱाच्या लॉकडाऊनवर शिक्कमोर्तब? शनिवारी संध्याकाळी सर्वपक्षिय नेत्यांची मुख्यमंत्र्यांनी बोलाविली बैठक

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी लॉकडाऊन शिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे उद्या शनिवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील सर्वपक्षिय नेत्यांची बैठक बोलाविली असून या बैठकीत एक आठवड्याचा लॉकडाऊन लागू करण्याबाबत चर्चा करून शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. एप्रिल महिना सुरु झाल्यापासून राज्यात …

Read More »

लसीकरणप्रश्नी शरद पवारांच्या भूमिकेपेक्षा प्रदेशाध्यक्ष, मंत्र्यांची भूमिका वेगळी पवार म्हणतात ते मदत करतायत तर मंत्री टोपे आणि प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणतात ते देतच नाही

मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्यातील लसीकरणाची अनेक केंद्र कोरोनाची लस उपलब्ध नसल्याने बंद ठेवण्याची पाळी आल्याची भूमिका राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मांडत महाराष्ट्राला मागणी पेक्षा कमी लसींचा पुरवठा केंद्राकडून करण्यात येत असल्याचे सांगत केंद्र सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली. तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवरच थेट हल्ला चढविला …

Read More »

गुजरातला एक कोटी तर महाराष्ट्राला अवघे ७ लाख ५० हजार लसीचे डोस आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली केंद्राची पोलखोल

मुंबई: प्रतिनिधी कोरोना लसीकरणात महाराष्ट्र देशात अग्रेसर राज्य आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी दर आठवड्याला ४० लाख डोसेस देण्याची मागणी राज्याने केंद्र शासनाला केली. मात्र त्याला प्रतिसाद देताना केंद्राकडून आज साडेसात लाख डोस पाठविण्यात आले. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची लोकसंख्या जास्त असताना आणि देशातील एकूण रुग्णांपैकी ५५ …

Read More »

कोरोना: अबब…६० हजार; बाधित रूग्ण पोहोचले ५ लाखावर ५९ हजार ९०७ नवे बाधित, ३० हजार २९६ बरे झाले तर ३२२ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी दोन-तीन दिवसाच्या अंतरानंतर राज्यात आज सर्वाधिक ५९ हजार ९०७ इतके बाधित रूग्ण आढळून आले आहेत. यापूर्वी राज्यातील बाधितांच्या संख्येने ५७ हजार रूग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळून आले आहेत. राज्यातील सर्वाधिक रूग्ण मुंबई महानगरातील ११ महानगरपालिका आणि पुणे शहर व ग्रामीण, नाशिक, नागपूर शहर …

Read More »