Breaking News

Tag Archives: pravin darekar

राऊत कधी पाण्यात उतरलात का? महाराष्ट्राची जनता पाहतेय, आम्ही रिकामटेकडा दौरा करतोय की टीका-प्रविण दरेकरांचा पलटवार

मुंबई: प्रतिनिधी केवळ मीडियात येऊन अश्रू पुसणे आणि प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन त्यांचे दु:ख जाणून घेणे वेगळे आहे. निसर्ग चक्रीवादळ असो किंवा तौक्ते वादळ आम्ही घटनास्थळी गेलो. आताही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून गेलो. त्यामुळे आम्ही रिकामटेकडा दौरा करत आहोत की फक्त टीका करत आहोत हे महाराष्ट्राची जनता पाहत असल्याचा पलटवार आज विधान परिषदेचे …

Read More »

अजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल? मुख्यमंत्र्यांबद्दल 'अरे - तुरे' चे शब्द वापरले ही महाराष्ट्राची संस्कृती नाही

मुंबई: प्रतिनिधी कोकणातील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या भाजपा नेत्यांनी स्वागताला हजर राहीले नाही म्हणून एका अधिकाऱ्याला फैलावर घेतल्याची चित्रफित व्हायरल झाली. त्यात मुख्यमंत्र्यांचा उल्लेख एकेरी करण्यात आल्याचे ऐकायला मिळत आहे. त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपा नेत्यांना टोला लगावत मामलेदार, जिल्हाधिकाऱ्यांना बघायला आलात की नुकसान किती झाले बघायला आलात …

Read More »

भाजपाने दिला लोणकर कुटुंबियांना कर्जफेडीसाठी आर्थिक मदतीचा हात स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांच्या १९.९६ लाखांच्या थकित कर्जाची परतफेड

मुंबई: प्रतिनिधी एमपीएससी परीक्षा पास होऊन सुद्धा मुलाखती होत नसल्याने नैराश्यातून आत्महत्या केलेल्या स्वप्निल लोणकरच्या कुटुंबियांवर असलेल्या १९ लाख ९६ हजार ९६५ रूपयांच्या कर्जाची परतफेड करणारा धनादेश आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुपूर्द केला. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा …

Read More »

…अन्यथा भाजपच्यावतीने तीव्र आंदोलन करणार विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून राज्यात सर्वच जिल्ह्यातील व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. दुकाने, खासगी कार्यालयं तसेच इतर सुविधा खुल्या झाल्या असल्या तरी उपनगरीय लोकल सेवा मात्र सर्वसामान्य नागरिकांसाठी अद्याप बंद आहे. परंतु कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांना उपनगरीय लोकल सेवा सुरु करण्याबाबत राज्य सरकारने आठवड्याभरात निर्णय घ्यावा अन्यथा भाजपच्यावतीने …

Read More »

लस घेतली तरी विधिमंडळ अधिवेशनासाठी कोरोना चाचणी आवश्यकच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे कामकाज निश्चित

मुंबई : प्रतिनिधी कोरोना संकटाची सध्याची स्थिती पाहता आणि तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन मुंबई येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी ५ व ६ जुलै या दोन दिवसाचे कामकाज निश्चित करण्यात आले आहे. विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानभवनाच्या प्रांगणात झाली. या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, …

Read More »

सर्वसामान्यांमध्ये जाताना नवे बूट खरेदी करावे लागणे यासारखे आश्चर्य नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा टोला

मुंबई: प्रतिनिधी सर्वसामान्य लोकांमध्ये जाताना राज्याच्या दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना नवीन बूट खरेदी करावे लागतात यासारखे आश्चर्य नाही अशी खोचक टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली. तोक्ते वादळाने कोकणात मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी राज्याचे दोन्ही विरोधी पक्षनेते कोकणच्या दौर्‍यावर होते. यावेळी प्रसिद्ध …

Read More »

भाजपावाल्यांनाच रेमडेसीवीर कसे मिळते? आगामी काळात भाजपच्या कारनाम्यांचा भांडाफोड करणार असल्याचे नवाब मलिक यांचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी राज्यासह देशात कोरोनाबाधित रूग्णांसाठी रेमडेसिवीर औषधांचा तुटवडा जाणवत असताना गुजरातमध्ये भाजपा कार्यालयात आणि जळगांवातील भाजपाच्या माजी आमदाराकडून रेमडेसिवीर औषधांचे मोफत वाटप, त्याचा काळाबाजार आणि साठेबाजी करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना ब्रुक फार्मा कंपनीकडूनही रेमडेसिवीरचा साठा उलब्ध होणार असल्याचे सांगितले. रूग्णांसाठी रेमडेसीवीर औषधे उपलब्ध …

Read More »

राज्याच्या गृहमंत्र्यांचा फडणवीस आणि भाजपाला इशारा पोलिसांवरील दबाव सहन करणार नाही- मंत्री वळसे-पाटील

मुंबई: प्रतिनिधी राज्यात सध्या रेमडेसिवीर औषधांचा तुटवडा असताना या औषधांचा मोठा साठा मुंबईत येणार असल्याची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्माच्या मालकाला ताब्यात घेतले. याची माहिती मिळताच देवेंद्र फडणवीस विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यासोबत काल रात्री पोलीस ठाण्यात पोहोचले होते. यावेळी त्यांनी कारवाईवरुन पोलिसांना जाब देखील …

Read More »

केंद्राने साठेबाजी, काळाबाजार करण्याची फडणवीस व भाजपाला परवानगी दिलीय का? पोलीस कारवाईत अडथळा आणणाऱ्या फडणवीस, दरेकर व प्रसाद लाडविरोधात कारवाई करा- नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी मुंबई पोलिसांनी शनिवारी रात्री रेमडेसिवीरची साठेबाजी करणाऱ्या एका कंपनीच्या व्यवस्थापकाला व मालकाला ताब्यात घेतले असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर यांनी हस्तक्षेप करून पोलिसांवर दबाव टाकून त्याला सोडवले आणि तो साठा भाजपाने केंद्रीय मंत्र्यांच्या परवानगीने मिळवल्याचा दावा केला. वास्तविक रेमडेसिवीरचा साठा खाजगी व्यक्तीला करता येत नाही तर …

Read More »

साठेबाजी करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर भाजपा का घाबरली? राज्यात रेमडेसिवीरचा साठा मिळू नये यासाठी भाजपचा प्रयत्न- नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी रेमडीसीवीरचा साठा करणार्‍या ब्रुक्स फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया याला बीकेसी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर राज्यातील भाजपा का घाबरलीय? राज्यातील भाजप वकिली करण्यासाठी का जातेय याचं उत्तर भाजपने जनतेला द्यायला हवे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक केली. रात्रीच्या वेळी पोलिस स्टेशनमध्ये दोन विरोधी पक्षनेते …

Read More »