Breaking News

Tag Archives: food and drug dept.

२७ लाख रूपये किंमतीचा कमी प्रतीचा अन्नसाठा जप्त

दैनंदिन जीवनात ग्राहकाकडून नियमितपणे उपयोगात आणल्या जाणाऱ्या विविध अन्नपदार्थासह “खाद्यतेल” व “पावडर मसाले” यांच्या गुणवत्ता व दर्जा यांची खात्री व खातरजमा करण्यासह सर्व सामान्य जनतेस सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. मेसर्स वेदिक स्पाइसेस प्रायव्हेट लिमिटेड, प्लॉट नंबर ए- 362, महापे एमआयडीसी, टीटीसी इंडस्ट्रियल …

Read More »

अन्न व औषध प्रशासनाने केली अॅमेझॉनवर या कारणासाठी कारवाई गर्भपाताची औषधे ऑनलाईन विक्री केली म्हणून कार्यवाही

इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन पोर्टल वर गर्भपातासाठी वापरात येणारी औषधे नियमबाह्य पद्धतीने विक्री होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. याऑनलाईन विक्रीची पडताळणी करण्यासाठी विविध ऑनलाईन विक्री पोर्टल्स वर विनाप्रीस्क्रीपशन MTP kit या औषधाची मागणी नोंदविण्यात आली होती. ॲमेझॉन (amazon.in ) या ऑनलाईन पोर्टल वर A-Kare या ब्राँड नावाने गर्भपाताचे औषध उपलब्ध असल्याचे आढळून आले होते.या  औषधाची मागणी amazon.in द्वारे …

Read More »

कोरोना औषधांची खोटी जाहीरात करणाऱ्यांवर कारवाई करणार अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी कोरोनासंदर्भांत शासन व्यापक प्रमाणात जनजागृती करीत असतांना विविध वस्तुंची निर्मिती करणारे काही उत्पादक आणि जाहिरातदार विशिष्ट प्रकारच्या गादीचा/सोफ्याचा वापर केल्यास किंवा विशिष्ट आयुर्वेदिक औषधांचे सेवन केल्यास कोरोनाचा प्रादूर्भाव होणार नसल्याच्या चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करणाऱ्या उत्पादकांवर आणि जाहिरातदारांवर व जाहिरात प्रक्रियेत भाग घेणाऱ्यांवर अन्न व औषध …

Read More »

दुध भेसळीवर अंकुश ठेवण्यासाठी औषध आणि पदुमचे जिल्हानिहाय पथक मंत्री शिंगणे आणि केदार यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात दुधात भेसळीबाबतच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. या दुध भेसळीवर अंकुश ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रसासन विभाग आणि दुग्धविकास यांची संयुक्तरित्या प्रत्येक जिल्ह्यात पथक तैनात करत त्या मार्फत दूधाची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे मंत्री राजेंद्र शिंगणे आणि पदुम मंत्री सुनिल …

Read More »

अन्न व औषध प्रशासनाचा ढीसाळ काराभारामुळे जनतेचे जीवनमान धोक्यात भारताच्या महालेखा परिक्षकांचे अन्न व औषध प्रशासन विभागावर ताशेरे

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील रूग्णांच्या आरोग्यासाठी महत्वाच्या असलेल्या औषध विक्रेत्यांच्या परवान्यांचे नुतनीकरण करणे आवश्यक होते. मात्र राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या औषध प्रशासनाकडून या औषध व्रिकेत्यांच्या परवान्यांचे नुतनीकरणच करण्यात आले नाही. त्यातच रूग्णांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या गोळ्या, इंजेक्शन, सिरप या औषधांची तपासणी न करताच त्याच्या विक्रीला परवानगी दिल्याबाबतचा मुद्दा उघडकीस आला …

Read More »