Breaking News

Tag Archives: dhangar community

नाना पटोले यांचा आरोप, आरक्षणाचे गाजर दाखवित मराठा, ओबीसी, धनगरांना फसवले एकनाथ शिंदेंची खुर्ची राहील की नाही याची खात्री नाही, त्यांच्या शब्दाला किंमत नाही, ते काय आरक्षण देणार?

भारतीय जनता पक्षाने २०१४ मध्ये सत्तेत येण्याआधी मराठा, आदिवासी, धनगर, हलबा व ओबीसी समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवले. १० वर्ष सत्ता भोगली पण ते हे आश्वासन पाळू शकले नाहीत. आरक्षणाचे प्रश्न तीव्र होत चालले आहेत आणि समाजा-समाजात भांडणे लावण्याचे काम भाजपाने सुरु केले आहे त्याचा हा सर्व परिणाम आहे. आज या …

Read More »

देवेंद्र फडणवीसांचा निर्धार, धनगर समाजासह वंचितांचा विकास करणारच राज्य अर्थसंकल्पात भरघोस तरतूद केल्याबद्दल धनगर समाजाच्या विविध संघटनांतर्फे फडणवीस यांचा सत्कार

धनगर समजासह राज्यातील सर्व उपेक्षित, वंचित समाजाच्या कल्याणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार वचनबद्ध आहे. भारतीय जनता पार्टीच्या संघटनेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या वेगवेगळया योजना उपेक्षित, वंचित वर्गापर्यंत पोहचवून दीनदयाळ उपाध्याय यांचा अंत्योदयाचा विचार प्रत्यक्षात आणू , असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केला. धनगर समाजासाठी …

Read More »

इंग्रजांशी जवळीक वाढवल्याने अहिल्याबाईंनी पेशव्यांना खडसावलं होतं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी दिली करून दिली इतिहासाची आठवण

जेजूरी : प्रतिनिधी अहिल्याबाई होळकर या जागतिक ओळख असणाऱ्या स्त्रीयांपैकी एक होत्या. त्यांची तुलना रशियाची आणि ब्रिटनची राणी यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी करत   पेशव्यांनी इंग्रजांशी जवळीक वाढवल्यानंतर अहिल्यादेवींनी पेशव्यांनाही खडसावल्याची इतिहासातील घटनेची आठवण करुन दिली. तसेच अहिल्यादेवी जागतिक स्तरावर छाप सोडणाऱ्या महिला राज्यकर्त्या असल्याचं पवारांनी यावेळी आवर्जून …

Read More »

धनगर समाजासाठी आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गृहनिर्माण योजना बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

चंद्रपूर : प्रतिनिधी भटक्या ‘क’ जमाती प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याच्या योजनेला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याची घोषणा राज्याचे इतर मागास, बहुजन कल्याण विकास, आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. धनगर समाजाचे दैवत असणाऱ्या व धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे नाव आता या योजनेला देण्यात येत असून …

Read More »

अनुसूचित जमातीसाठीच्या योजनांच्या धर्तीवर धनगर समाजासाठीही नव्या १३ योजना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाल्याची मंत्री डॉ. संजय कुटे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी सारथीच्या धर्तीवर ‘महाज्योती’ महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात येणार असून ज्योतीदूत, जलदूत, व सावित्रीदूत असे तीन महत्वाचे पथदर्शी कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. धनगर समाज बांधवांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम राबवून अनुसूचित जमातीसाठी सुरु असलेल्या योजनांच्या धर्तीवर एकूण १३ योजना सुरु करणार असल्याचे कामगार, इमाव, …

Read More »

पंकजा मुंडे या दोन दिवसपण सत्तेपासून दूर राहू शकत नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची खोचक टीका  मुंबई : प्रतिनिधी धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मंत्रालयाची पायरी चढणार नाही म्हणणाऱ्या भाजप मंत्री पंकजा मुंडे यांनी आज घुमजाव केले आहे. त्यांना दोन दिवसपण सत्तेपासून दूर राहता येत नाही. यांचा हा खेळ सत्तेसाठी असल्याची खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते …

Read More »

आणि पंकजा मुंडेकडूनही धनगर समाजाची फसवणूकच

पाय न ठेवण्याच्या घोषणेला २४ तास उलटायच्या आतच पंकजा मुंडे मंत्रालयात हजर मुंबई : प्रतिनिधी धनगर समाजाला अनुसूचित जमाती वर्गातून आरक्षण देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून पाच वर्षे पूर्ण व्हायला आली. तरी त्या घोषणेची अद्याप पूर्तता झाली नाही. त्यातच आता ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी धनगर समाजाला आरक्षण …

Read More »

धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करुन घेण्याचा केंद्राकडे प्रस्तावच नाही फडणवीस सरकारने धनगर समाजाला फसविल्याचा खा.सुप्रिया सुळे यांचा आरोप

नवी दिल्ली : प्रतिनिधी राज्यातील धनगर समाजाला शेड्यूल्ड ट्राईब अर्थात एसटी प्रवर्गात समाविष्ट करुन घेण्यासंदर्भातला प्रस्तावच राज्य सरकारने पाठविला नसल्याची माहिती जनजातीय मंत्रालयाने लोकसभेत दिल्याने देवेंद्र फडणवीस सरकारने धनगर समाजाची फसवणूकच केली असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. धनगर आरक्षणाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत प्रश्न उपस्थित …

Read More »

आधी घोषणा, नंतर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा आणि आता अभ्यासासाठी उपसमिती सोलापूर विद्यापीठ नामांतर प्रश्नी राज्य सरकारची अजब तऱ्हा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या प्रश्नावरून वाढलेला रोष कमी करण्यासाठी सोलापूर येथील विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीतही यावर चर्चा करण्यात आली. मात्र स्थानिक भागातील नागरीकांचा विरोध पाहून राज्य सरकारने अर्थात मुख्यमंत्र्यांच्याच घोषणेवर अभ्यास करण्यासाठी …

Read More »