Breaking News

Tag Archives: Deputy Chief Minister Devendra Fadnavis

जरांगे पाटील यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना चिंततो…, रितेश देशमुखची सूचक पोस्ट जरांगे पाटील शांतीपूर्ण उपोषणाला बसलेत त्यांच्या तब्येतीसाठी मी प्रार्थना चिंततो

राज्य सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी गावात पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यांनी अन्न-पाणी त्याग करुन आमरण उपोषणाला सुरूवात केली. आज उपोषणाचा सहावा दिवस आहे. सध्या सरकारी डॉक्टर तपासणी साठी आलेले असताना जरांगे पाटलांनी त्यांना पुन्हा पाठवले होते. रविवारी त्यांची …

Read More »

नमो शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून ८५.६० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात मिळाले १७१२ कोटी रुपये नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळालेले सर्वाधिक शेतकरी या जिल्ह्यातील

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न प्राप्त व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर ६ हजार रुपये थेट जमा करण्यात येतात. त्याच धर्तीवर राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘नमो शेतकरी सन्मान’ योजनेचा शुभारंभ गुरुवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी, अहमदनगर येथे करण्यात आला. राज्य सरकारच्या या योजनेमुळे केंद्र आणि …

Read More »

संसदेचे विशेष अधिवेशन देशाचे तुकडे करण्यासाठी – नाना पटोले मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून केंद्रशासित प्रदेश करण्याचा मोदी सरकारचा डाव

मोदी सरकारने १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. विशेष अधिवेशनाचा अजेंडा सरकारने दिलेला नाही. विरोधी पक्ष, संसदीय कामकाज समितीसह कोणालाही न विचारता मोदी सरकारने हे अधिवेशन बोलावले आहे. संसदेचे विशेष अधिवेशन देशाचे तुकडे करण्यासाठी बोलावले असून मुंबईला महाराष्ट्रापासून तोडून केंद्र शासित प्रदेश करण्याचा मोदी सरकारचा डाव …

Read More »

आम्ही आरक्षण दिलं तरी ते कायद्याच्या चौकटीवर टीकलं पाहिजे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर ओबीसी समाजावर परिणाम होण्याची

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. तर, दुसरीकडे मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिलं तर ओबीसी समाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वक्तव्य केलं आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सरकारला कायद्याचा विचार करावा लागतो. सर्वोच्च …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या तिसऱ्या विस्तारासाठीच्या हालचालींना वेग १४ जणांना संधी दिली जाण्याची शक्यता

गणेशोत्सवापूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या तिसऱ्या विस्तारासाठीच्या हालचाली होण्याची दाट शक्यता आहे. आणखी १४ जणांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात राष्ट्रवादीचे दोन नेते भाजपच्या श्रेष्ठींना दिल्लीत अलीकडेच भेटले. तुम्ही तिन्ही पक्षांचे नेते मुंबईत एकत्र बसा, मंत्रिपदांचे वाटप आणि नावे निश्चित करा आणि पुन्हा दिल्लीला या असे त्यांना भाजप श्रेष्ठींनी सांगितले. …

Read More »