Breaking News

राज्य मंत्रिमंडळाच्या तिसऱ्या विस्तारासाठीच्या हालचालींना वेग १४ जणांना संधी दिली जाण्याची शक्यता

गणेशोत्सवापूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या तिसऱ्या विस्तारासाठीच्या हालचाली होण्याची दाट शक्यता आहे. आणखी १४ जणांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात राष्ट्रवादीचे दोन नेते भाजपच्या श्रेष्ठींना दिल्लीत अलीकडेच भेटले. तुम्ही तिन्ही पक्षांचे नेते मुंबईत एकत्र बसा, मंत्रिपदांचे वाटप आणि नावे निश्चित करा आणि पुन्हा दिल्लीला या असे त्यांना भाजप श्रेष्ठींनी सांगितले. त्यानंतर मुंबईत तिन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांची एक बैठक झाली, अशी खात्रीलायक माहिती आहे. दोन-तीन दिवसांत पुन्हा एक बैठक होण्याची शक्यता आहे.

संसदेचे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन १८ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्या आधीच मंत्र्यांच्या यादीला दिल्लीतून मंजुरी मिळविण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न असेल. असे मानले जाते की विस्तार करताना सर्वाधिक डोकेदुखी असेल ती मुख्यमंत्री शिंदे यांना. त्यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आणि १० अपक्ष आमदार आलेले होते. त्यापैकी त्यांना वगळून केवळ नऊ जणांनाच मंत्रिपद देता आले.

सध्या भाजपचे १०, शिवसेनेचे १० आणि राष्ट्रवादीचे ९ कॅबिनेट मंत्री आहेत. मुख्यमंत्र्यांसह ४३ जण मंत्रिमंडळात असू शकतात. याचा अर्थ १४ मंत्रिपदे रिक्त आहेत. त्यातील राष्ट्रवादीच्या वाट्याचे एक मंत्रिपद रिक्त आहे.
ते राष्ट्रवादीला दिले जाईल. उर्वरित १३ पैकी भाजपला ७, शिवसेनेला ३ आणि राष्ट्रवादीला ३ असे वाटप होण्याची दाट शक्यता आहे.

Check Also

अजित पवार म्हणाले, मराठा आरक्षण प्रश्नी सर्वपक्षिय बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली बैठक

जालना येथील आंतरवाली सराटे येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण प्रश्नी उपोषणाचे आंदोलन पुकारले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *