Breaking News

आता मध्यमवर्गीय ग्राहकही आरामात खरेदी करू शकतील बीएमडब्ल्यू ची नवी कार! कारमध्ये सहा एअरबॅग्ज

बीएमडब्ल्यू 2 सीरीज एम परफॉर्मन्स एडिशन ब्लॅक सॅफायर मेटॉलिक पेंटमध्ये उपलब्ध आहे. हे लांब सिल्हूट आणि फ्रेमलेस डोअर्ससह येते. यामध्ये एम परफॉर्मन्स फ्रंट ग्रिल, फॉग लॅम्प इन्सर्ट आणि सेरियम ग्रे कलरचे ORVM आहेत. एलईडी हेडलाइट्स आणि फुल-एलईडी टेल-लाइट्स आहेत. टेललाइट्स रिअरमध्ये मध्यभागी पसरतात. एम परफॉर्मन्स स्टिकर्सला साइड प्रोफाइलवर लावले आहेत.

कारमध्ये सहा एअरबॅग्ज, अटेंटिव्हनेस असिस्ट, ब्रेक असिस्ट, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, ट्रॅक्शन कंट्रोल, डायनॅमिक स्टॅबिलिटी कंट्रोल, कॉर्नरिंग ब्रेक कंट्रोल, ऑटो होल्डसह इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, साइड-इम्पॅक्ट प्रोटेक्शन, इलेक्ट्रॉनिक व्हीकल इमोबिलायझर आणि क्रॅश सेन्सर्स यांसारखे फीचर्स सुद्धा देण्यात आले आहेत.

बीएमडब्ल्यू 2 सीरीज एम परफॉर्मन्स एडिशनमध्ये 2.0L चार-सिलिंडर ट्विन-टर्बो पेट्रोल इंजिन आहे, जे १३५०-४६००rpm वर १७६bhp आणि २८०Nm जनरेट करते. ते केवळ ७.१ सेकंदात ० ते १०० किमी प्रति तासाचा वेग वाढवते. यामध्ये 7-स्पीड स्टेपट्रॉनिक स्पोर्ट ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे. स्टीयरिंग व्हीलवर पॅडल शिफ्टर्स देखील आहेत.

बीएमडब्ल्यूने (BMW) नवीन BMW 220i M परफॉर्मन्स एडिशन (केवळ पेट्रोल) भारतात ४६ लाख रुपयांमध्ये (एक्स-शोरूम) लाँच केली आहे. चेन्नईतील बीएमडब्ल्यू ग्रुपच्या प्लांटमध्ये कारची निर्मिती केली जात आहे. ही लिमिटेड एडिशन फक्त ऑनलाइन उपलब्ध असणार आहे. नवीन मॉडेल 220i M स्पोर्ट प्रो ट्रिमपेक्षा जवळपास ५०,००० रुपये जास्त महाग आहे.

Check Also

आर्थिक सर्व्हेक्षणानंतर अर्थसंकल्पातील कर प्रणालीवरून उद्योग जगतात उत्सुकता अनेक नवे नियम शेअर बाजारापासून उत्पन्न करातही वाढ होण्याची शक्यता

केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ जवळ येत असताना, दलाल स्ट्रीट इक्विटी आणि डेरिव्हेटिव्ह बाजारांवर परिणाम करू शकणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *