Breaking News

Tag Archives: congress

नाना पटोले म्हणाले, महाराजांचा अपमान करणे भाजपाचे नियोजित षडयंत्र छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर भाजपा कारवाई का करत नाही ?

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करण्याची भारतीय जनता पक्षात चढाओढच लागल्याचे दिसत आहे. मागील महिनाभरात भाजपाच्या चार-पाच नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारी वक्तव्ये केली आहेत. हे प्रकार अनवधानाने झालेले नसून भाजपाने छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करण्याचे जाणीवपूर्वक रचलेले षडयंत्र आहे, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष …

Read More »

एका लुटारुला राज्याच्या तिजोरीवर बसवत असाल तर आधी मुख्यमंत्र्य़ांनी राजीनामा द्यावा

केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रातही निती आयोगासारखीच महाराष्ट्र इन्फरमेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन संस्था म्हणजेच ‘मित्र’ची स्थापन करून त्याच्या उपाध्यक्षपदी अजय आशर नावाच्या बिल्डरची नियुक्ती शिंदे-फडणवीस सरकारने करून चुकीचा पायंडा पाडला आहे. अजय आशर सारख्या लुटारु व्यक्तीला राज्याच्या तिजोरीवर बसवत असाल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष …

Read More »

नाना पटोलेंचे आव्हान, शिवाजी महाराजांबद्दल स्वाभिमान असेल तर सत्ताधाऱ्यांनी…

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत, परंतु या दैवताचा भारतीय जनता पक्ष वारंवार अपमान करत असून यातून भाजपाचा खरा चेहरा उघड झाला आहे. राज्यापाल कोश्यारी, भाजपाचा प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी यांच्यानंतर आता राज्यातील मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही महाराजांबद्दल गरळ ओकली आहे. सत्तेत असलेल्या आमदार व खासदार यांना छत्रपती शिवाजी …

Read More »

विधिमंडळ समितीची बैठक आता पुढच्या महिन्यातः अधिवेशन एक आठवड्याचे?

मागील दोन वर्षाचा अपवाद वगळता प्रथेप्रमाणे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होत आले आहे. यंदाचे हिवाळी अधिवेशनही नागपूर येथे होत आहे. परंतु हिवाळी अधिवेशनाची तारीख निश्चित होऊन दोन महिने जवळपास झाले. मात्र आगामी पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने कामकाज सल्लागार समितीची बैठक होणे आवश्यक असताना या समितीची सातत्याने बैठक पुढे ढकलण्यात …

Read More »

राज ठाकरेंच्या निशाण्यावर राज्यपाल, राहुल गांधी आणि उध्दव ठाकरे

भारत जोडो यात्रेच्या दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वा.वि.दा. सावरकर यांच्या माफीनाम्याचे पत्र जाहिर करत टीका केली. या टीकेवरून मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले की, राहुल गांधी यांनी स्वा.सावरकर यांच्यावर टीका केली. अरे तुझी लायकी तर आहे का? असा सवाल करत गुळगुळीत मेंदूचा राहुल गांधी असल्याची टीका केली. गोरेगांव …

Read More »

काँग्रेसचा आरोप, जनतेच्या पैशावर मुख्यमंत्री शिंदे व सहकाऱ्यांचे गुवाहाटी पर्यटन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांचा ताफा आलिशान सुविधांसह गुवाहाटीच्या कामाख्या देवीचा नवस फेडण्यास गेला. राज्यातील शेतकरी सरकारी मदतीकडे डोळे लावून बसला आहे, बेरोजगार तरुण नोकरीच्या प्रतिक्षेत सरकारकडे आशेने पाहत आहे आणि शिंदे सरकार मात्र सरकार वाचावे यासाठी देवदर्शनात व्यस्त आहे हे पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, अशी खोचक टीका प्रदेश …

Read More »

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व भारत जोडो यात्रा समन्वयक बाळासाहेब थोरात यांचे पत्र..

काँग्रेस खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात यशस्वी करण्यात अनेकांचे सहकार्य लाभले. ही ऐतिहासिक पदयात्रा यशस्वीपणे पार पडावी यासाठी महाराष्ट्रातील जनता, काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी व नेत्यांनी १४ दिवस उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. राहुल गांधीबरोबर पायी चालत आपल्या समस्या, व्यथा, वेदना सांगितल्या व राहुल गांधी यांनीही त्या ऐकून घेतल्या. …

Read More »

नाना पटोलेंचा सवाल, महाराष्ट्राचे तुकडे करण्याची सुपारी घेतली आहे का ?

महाराष्ट्रातील सोलापूर, अक्कलकोट व जत तालुक्यातील गावांवर कर्नाटकने हक्क सांगावा हे हास्यास्पद असून कर्नाटकच्या भाजपा सरकारचा हा आगाऊपणा महाराष्ट्र खपवून घेणार नाही. कर्नाटक सीमा वाद अद्याप न्यायप्रविष्ट असताना अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या गावांवर हक्क सांगणे चुकीचे आहे. शिंदे-फडणवीस सरकारने आधी राज्यातील महत्वाचे प्रकल्प भाजपा शासित गुजरात व मध्य प्रदेशच्या घशात घातले …

Read More »

महाविकास आघाडीने महाराष्ट्राला बदनाम करण्याची सुपारी घेतली का?

राज्यातून उद्योग बाहेर गेल्याची आवई उठवल्यानंतर आता ४४ खेडी कर्नाटकला दिली जाणार असल्याच्या धादांत खोट्या बातम्या पसरवणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने महाराष्ट्राला बदनाम करण्याची सुपारी घेतली आहे का ? असा खडा सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी उपस्थित केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या …

Read More »

राहुल गांधी यांनी भावनिक होत दिला महाराष्ट्रातील जनतेला संदेश

कन्याकुमारीहून सुरु झालेली भारत जोडो यात्रा मागील १४ दिवसांपासून महाराष्ट्रातील चार जिल्ह्यातून प्रवास करत मध्य प्रदेशच्या दिशेने पुढे गेली. मात्र या १४ दिवसात महाराष्ट्रात मिळालेल्या अनुभवाच्या शिदोरीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भावनिक होत महाराष्ट्रातील जनतेला संदेश दिला. काय दिला संदेश महाराष्ट्रातील जनतेला वाचा त्यांच्याच शब्दात…. महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेचा …

Read More »