Breaking News

Tag Archives: atul save

अजित पवारांचा खोचक टोला, ज्या-ज्या वेळी न्यायालयाने ताशेरे ओढले त्या-त्या वेळी… न्यायालयाच्या ताशेऱ्यावरुन मुख्यमंत्र्यांच्याऐवजी मंत्र्यांनी सभागृहात उत्तर देताच विरोधी पक्षनेते अजित पवार संतापले

राज्याच्या सहकारमंत्र्यांच्या निर्णयात हस्तक्षेप केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढले आहेत. या प्रकरणामुळे मंत्रीमंडळातील विसंवाद चव्हाट्यावर आला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर न्यायालय ताशेरे ओढते हे महाराष्ट्राच्या गौरवशाली पंरपरेसाठी शोभनीय नाही, अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. दरम्यान मांडलेल्या या महत्त्वाच्या विषयावर मुख्यमंत्र्यांनी …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, भाजपासाठी सावेंकडून मंत्रिपदाच्या घटनात्मक शपथेचा भंग सहकार मंत्री अतुल सावे यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा

महाराष्ट्रात सहकारी संस्था काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानी अनेक वर्षांच्या मेहनत व परिश्रमाने उभ्या केल्या आहेत. भाजपाला हेच खूपत असल्याने आता केवळ भाजपा जिल्हाध्यक्षांच्या शिफारसीवरच सहकारी संस्थांची नोंदणी देऊ असा फतवा सहकारमंत्री अतुल सावे यांनी काढला आहे. सहकार मंत्र्यांचे हे वर्तन मंत्रिपदाच्या शपथेचा भंग असून मुख्यमंत्र्यांनी तात्काळ अतुल सावे यांची …

Read More »

साखर कारखान्यांची फसवणूक टाळण्यासाठी लवकरच बैठक सहकार मंत्री अतुल सावे यांची माहिती

ऊस गाळप हंगामात ऊस तोड मजूर पुरविणे आणि वाहतुकीचे करार गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार मंडळाच्या माध्यमातून होण्यासाठी साखर कारखानदार, लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांसमवेत ९ जानेवारी २०२३ रोजी बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असे सहकार मंत्री अतुल सावे यांनी आज विधानसभेत सांगितले. विधानसभेत आज लक्षवेधी सूचनेद्वारे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी …

Read More »

अजित पवारांची मागणी, शेतमजूरांची, ट्रॅक्टर वाहतूकदार शेतकऱ्यांच्या मुलांची फसवणूक थांबवा आर्थिक फसवणूक करणाऱ्या मुकादम-कंत्राटदारांवर कारवाईसाठी यंत्रणा- सरकारकडून घोषणा

राज्यातील साखर कारखान्यांना ऊसतोड मजूर पुरवणारे, ऊस वाहतूक करणारे कंत्राटदार-मुकादम साखर कारखान्यांकडून आगाऊ उचल घेऊनही काम पूर्ण करत नाहीत. उसतोडणीचे काम अर्धवट सोडून पळून जातात. ऊसतोड मजूरांचे, ट्रॅक्टर खरेदी करुन ऊसवाहतूक व्यवसाय करणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांचे, शेतकऱ्यांच्या मुलांचे पैसे बुडवतात. यामुळे शेतमजूरांवर उपासमारीची, शेतकऱ्यांच्या मुलांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. उलटपक्षी …

Read More »

सावित्रीबाई फुले स्मारक उभारणीबाबत आठवड्यात अहवाल सादर करा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे पुणे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांना निर्देश

पुणे येथील भिडे वाडा याठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक करण्याबाबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. यासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी पुण्यातील भिडे वाड्यातील भाडेकरूंची बैठक घेऊन अंतिम अहवाल एका आठवड्यात सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात …

Read More »

एकाच वेळी ७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २५०० कोटी रुपये जमा

नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ५० हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्याचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. आज एकाच वेळी राज्यातील ६ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे २५०० कोटी रुपये जमा करण्यात आले. अशा प्रकारे …

Read More »

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत लाभ योजनेचा २० ऑक्टो.पासून शुभारंभ

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रु. ५० हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ येाजनेचा शुभारंभ २० ऑक्टोबर, २०२२ रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली. सुमारे …

Read More »

छगन भुजबळ म्हणाले, ओबीसी विद्यार्थ्यासाठीचा ‘तो’ रद्द केलेला निर्णय पुन्हा लागू करा शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा फी योजना पूर्ववत सुरू करा

महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणारे व परराज्यात शिकणाऱ्या विजाभज,विमाप्र व  इमाव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा फी ही योजना बंद करण्यात येऊ नये अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी इतर मागासवर्गीय व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्याकडे केली. छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, …

Read More »

मंत्रिमंडळ विस्तारात शेलार, विखे, कुटे, सावे, क्षिरसागर, बोंद्रेचा समावेश ? रविवारी सकाळी ११ वाजता राजभवनात होणार शपथविधी

मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून होत असलेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात भाजपच्या कोट्यातून राधाकृष्ण विखे-पाटील, आशिष शेलार, संजय कुटे, अतुल सावे आणि डॉ. अनिल बोंद्रे यांचा समावेश होणार आहे. तर शिवसेनेच्या कोट्यातून जयदत्त क्षिरसागर यांचा समावेश होणार असल्याची माहिती भाजपच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली. खासदार सुजय विखे-पाटील यांच्या पाठोपाठ त्यांचे वडील …

Read More »