Breaking News

Tag Archives: anil parab

खाजगी डॉक्टरांना पीपीई किट द्या, मात्र लोकल सुरु करण्यासाठीही पाठपुरावा करा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे प्रशासनाला आदेश

मुंबई: प्रतिनिधी कोविड 19 व्यतिरिक्त अन्य आजारावरील उपचारांसाठी विशेषत: येणारा पावसाळा लक्षात घेऊन डॉक्टरांनी आपले क्लिनिक सुरू करणे आवश्यक असल्याने त्यांना पीपीई किट देण्याची व्यवस्था करण्यात यावी तसेच वैद्यकीय सेवा तथा अन्य अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यासाठी लागणार्‍या मनुष्यबळासाठी मुंबई रेल्वेची लोकल सेवा सुरू करण्याशिवाय पर्याय नसल्याने केंद्राकडे पाठपुरावा करावा, असे …

Read More »

आघाडीची तीन माणसं रडली की बोलली? आता रडून नाही, करुन दाखवा भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांचा पलटवार

मुंबई : प्रतिनिधी आघाडीची “तीन माणसं” बोलली कि रडली..? कोरोना आल्यापासून हे असेच रोज रडणे सुरु आहे. कधी केंद्राच्या नावाने रडायचे.. अधी विरोधी पक्षाच्या नावानं.. आता थांबवा ही तुमची रडगाणी.. आता करुन दाखवा ना! तुम्ही मदत द्या.. शेतकऱ्यांना पँकेज द्या.. कोरोनापासुन महाराष्ट्राला वाचवा, रडू नका, अशा शब्दांत भाजपा नेते माजी …

Read More »

केंद्र सरकार राज्याचे पैसे देत नाही मात्र कोणतीही गोष्ट फुकट देत नाही शिवसेना नेते तथा परिवहन मंत्री अनिल परब यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी केंद्राकडे महाराष्ट्राचे ४२ हजार कोटी पडून आहेत. ते पैसे द्या म्हणून मागणी करतोय तर ते दिले जात नाहीत. ८० ट्रेन मागितले तर ३० ट्रेन दिल्या जातात. एक तास आधी ट्रेन उपलब्ध असल्याचे रेल्वेकडून सांगत नुसता गोंधळ निर्माणण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप शिवसेना नेते अनिल परब करत …

Read More »

सरकार म्हणते ८ लाख तर रेल्वे म्हणते १५ लाख कामगारांना घरी सोडले स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या राज्यात पोहोचविण्याच्या आकडेवारीवरून गोंधळ

मुंबई : प्रतिनिधी राज्यात विशेषत: मुंबई महानगरातील स्थलांतरीत कामगारांना बिहार, उत्तर प्रदेशमधील स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या घरी पोहोचविण्यावरून रेल्वे गाड्या उपलब्ध असणे-नसण्यावरून केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि शिवसेना यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. एकाबाजूला या कामगारांना त्यांच्या राज्याच्या सीमापर्यंत पोहोचविण्यासाठी रेल्वेबरोबरच एसटीने ७ ते ८ लाख जणांना पोहोचविल्याचे राज्य …

Read More »

राज्याची जीवन वाहीनी ठरलेली लाल परी बनली मजुरांची मदत वाहीनी ११ हजार ३७९ बसेस मधून १ लाख ४१ हजार ७९८ मजुरांचा प्रवास

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ज्या एस.टी बस कडे पाहिले जाते त्या एस.टी बसेसही स्थलांतरीत मजुर आणि कामगारांच्या मदतीला धावून आल्या आहेत. आतापर्यंत ११ हजार ३७९ बसेसद्वारे सुमारे १ लाख ४१ हजार ७९८ स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत बसची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. आतापर्यंत आपल्या …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरेंसाठी काँग्रेसची माघार: मात्र राष्ट्रवादीसमोर लीन ९ वा उमेदवार मागे

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्याच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झालेले शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना विधान परिषदेवर निवडूण येण्यासाठी निवडणूक जाहीर झाली. मात्र ९ जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्याने राष्ट्रवादीला राज्यसभा निवडणूकीत केलेल्या मदतीची परतफेड म्हणून विधान परिषदेची जास्तीची एक जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात आला. परंतु राष्ट्रवादीने त्यांच्या हिश्यातील दुसरी …

Read More »

अडकलेले नागरिक, विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी मोफत एसटी पाठवतोय : मात्र या गोष्टी करा अर्ज भरून सादर करा: सोमवारपासून मिळणार सेवा: सतेज बंटी पाटील

मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या विविध भागात लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना त्यांच्या मुळ घरी सोडण्याटसाठी एसटी महामंडळाकडून सोमवारपासून मोफत बस सेवा सुरु करण्यात येणार आहे. या बससेवेतून स्थानिक नागरिकांना प्रवास करता येणार नाही. तसेच या खालील अटींची पूर्तता करणाऱ्यांना बस सेवेचा लाभ मिळणार असल्याची माहिती परिवहन राज्यमंत्री …

Read More »

कोविड फायदा: एसटी प्रवाशांना मिळणार ही सवलत परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती

करोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या ” स्मार्ट कार्ड ” योजनेला १५ ऑगस्ट २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे २७ विविध सामाजिक घटकांना ३३ टक्के ते १०० टक्के पर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत देते. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित …

Read More »

सर्व आमदारांच्या वेतनात ३० टक्के कपात: आर्थिक तोडग्यासाठी दोन समित्या विशेष राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सातत्याने उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र तरीही या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यास अपयश येत असल्याने अखेर या आजाराशी लढा देण्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ निर्माण करण्यासाठी राज्यातील सर्व आमदारांच्या वेतनातील ३० टक्के रक्कम कापण्याचा निर्णय घेण्यात आला असून ही कपात एक वर्षासाठी करण्याचा …

Read More »

उध्दव ठाकरेंना राज्यपाल नियुक्त सदस्य करण्याचा अजित पवारांचा निर्णय उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत प्रस्ताव पाठविण्यावर शिक्कामोर्तब

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विधान परिषद किंवा विधानसभेवर निवडूण येणे आवश्यक आहे. मात्र कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्वच निवडणूका निवडणूक आयोगाने पुढे ढकलल्याने अखेर मुख्यमंत्र्यांना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राजकिय संकेतानुसार स्वत: मुख्यमंत्री …

Read More »