Breaking News

Tag Archives: anil parab

पवारांचे आश्वासन एसटी कर्मचाऱ्यांना, पण निधीसाठी परिवहन मंत्री भेटणार पुन्हा अर्थमंत्र्यांना दिवाळीपूर्वी थकित वेतन मिळावे यासाठी संघटनेच्या नेत्यांनी केली शरद पवारांशी चर्चा

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात सर्वप्रथम लॉकडाऊन करण्यात आला. या लॉकडाऊन काळात सर्वच परिवहन सेवा बंद ठेवण्यात आली. त्यामुळे एसटी महामंडळाच्या तोट्यात आणखी वाढ झाली. त्यामुळे मागील पाच महिन्यापासून विनावेतन एसटी कर्मचारी काम करत आहेत. मध्यंतरी अर्थमंत्री अजित पवार यांना परिवहन मंत्री अनिल परब यांनी भेटून एक महिन्याच्या पगाराची …

Read More »

मुख्यमंत्री म्हणाले, आपण सगळे घेवूया ‘MAH कसम’ कोरोनाविरूध्दची लढाई निर्णयाक वळणावर असल्याने आजही मास्क हीच आपल्यासाठी लस

रत्नागिरी : प्रतिनिधी कोरोना विरुध्दचा लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. यावर  लस प्राप्त होईपर्यंत मास्कच उत्तम लस ठरणार आहे, याची जाण ठेवा आणि इतरांना जाणीव करुन द्या. कोरोनाची दुसरी लाट येवू द्यायची नाही यासाठी MAH अर्थात मास्क, अंतर आणि हातांची स्वच्छता अशी ‘मा कसम’ सर्वांनी घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी रुग्णालयातील प्लाझ्मा थेरपीसाठीच्या …

Read More »

बेस्टची राज्याच्या मंत्र्यांवर अशीही मेहेरबानी लॉकडाऊन काळात वीज बीलेच पाठविले नसल्याची माहिती उघड

मुंबई : प्रतिनिधी शहरात वीज पुरवठा करणारी बेस्ट वीज कंपनीने सामान्य नागरिकांना लॉकडाउनमध्ये जादा रक्कमेची विद्युत देयके पाठविल्याची तक्रार सर्वश्रुत आहे. पण त्याच बेस्ट प्रशासनाने राज्यातील मंत्र्यांना लॉकडाउन कालावधीतील ४ ते ५ महिन्याची विद्युत देयकेच पाठविली नसल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली. सार्वजनिक बांधकाम …

Read More »

शिवसेनेने अर्णब गोस्वामी विरोधात हक्कभंग ठराव आणल्याने भाजपा आक्रमक सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब

मुंबई: प्रतिनिधी हिंग्लीश भाषेतील रिपब्लिक वृत्तवाहिनेचे संपादक-अॅकर असलेले अर्णब गोस्वामी हे सातत्याने राज्यातील नेते, मुख्यमंत्री यांच्याबाबत एकेरी शब्दात उल्लेख करत असून चुकीच्या पध्दतीचे वृत नेहमी प्रसारीत करत आहेत. त्यांच्याकडून सुपारी घेतल्यासारखे वृत्तांकन करण्यात येत असल्याचा आरोप शिवसेनेच्या आमदारांनी करत गोस्वामी विरोधात विधानसभेत हक्कभंगाचा ठराव आणण्यात आला. हा ठराव आणताच भाजपाचे …

Read More »

या विधेयकावरून फडणवीस आणि महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमध्ये झाली खडाजंगी हसन मुश्रीफ, जयंत पाटील, अजित पवारांच्या उत्तराने झाले नाही समाधान

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्याचे पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्यासंदर्भातील विधेयक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधासभेत मांडले. मात्र त्यास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हरकत घेत सध्या हे याप्रश्नी उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असल्याने त्याबाबतचे विधेयक सभागृहात मांडता येत नसल्याची भूमिका मांडली. त्यामुळे …

Read More »

वाहतूकक्षेत्राला दिलासा : माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना ७०० कोटींची कर माफी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई: प्रतिनिधी कोविडमुळे टाळेबंदीच्या काळात सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने वाहतूक क्षेत्राला फटका बसला. त्यांना नुकसान भरपाई म्हणून सार्वजनिक आणि माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना वाहन कर माफी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या वाहनांना १०० टक्के करमाफी दिल्याने सरासरी ७०० कोटी रूपयांची करमाफी मिळणार आहे. दिनांक १ एप्रिले …

Read More »

विधानमंडळ पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचे पण कोरोना मुक्त आमदारांनाच प्रवेश ७ आणि ८ सप्टेंबरला घेण्याचा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या ७ आणि ८ सप्टेंबर असे दोन दिवसांचे होणार आहे. सध्याची कोविड परिस्थिती पाहता सुरक्षित शारीरिक अंतराचा (सोशल डिस्टन्सिंग) निकष पाळून आणि सुरक्षेविषयी आवश्यक त्या उपाययोजना करुन हे अधिवेशन घेण्यात येणार आहे. पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने विधानसभा आणि विधान परिषद यांच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक आज मुख्यमंत्री …

Read More »

उद्यापासून एसटीने जिल्ह्याबाहेर जाता येणार : ई-पासची गरज नाही परिवहन मंत्री, ॲड.अनिल परब यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीमुळे गेली ५ महिने एसटीची आंतरराज्य व राज्यांतर्गत सेवा बंद करण्यात आली होती. त्यापैकी राज्यांतर्गत सेवा म्हणजेच आंतरजिल्हा बससेवा उद्या २० ऑगस्ट २०२० पासून सुरू होणार आहे. त्यामुळे गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लाखो प्रवाशांना दिलासा मिळेल अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब …

Read More »

परिवहन मंत्र्यांचं वरातीमागून घोडं ही तर चाकरमान्यांची फसवणूक- भाजपा नेते अँड आशिष शेलारांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा निर्णय आज परिवहन मंत्र्यांनी जो घोषित केला, तो वरातीमागून घोडं आहे, ही कोकणी माणसाची फसवणूक असल्याची टीका भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी केली. कोकणातील चाकरमान्यांबाबत निर्णय योग्य वेळी घ्या, या विषयावर सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी …

Read More »

एसटी’ कर्मचाऱ्यांच्या पगारी होणार ५५० कोटी रूपयांचा निधी मंजूर परिवहन मंत्री अनिल परब यांच्या पाठपुराव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी मागील काही महिन्यापासून एस.टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पैसा नसल्याने पगारी देणेही महामंडळाला शक्य होत नव्हते. यापार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून वित्तीय मदत मिळावी यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करत होते. त्यास यश येत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाला (एसटी) ५५० कोटी रुपयांचा निधी देण्याचा …

Read More »