Breaking News

Tag Archives: ajit pawar

कोरोनाविरोधी लढ्यासाठी मुख्यमंत्री ठाकरेंनी घडवून आणली सर्वपक्षिय एकजूट विविध पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या सूचनांची तत्काळ दखल

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचे संकट घालविण्यासाठी विरोधी पक्ष नेते तसेच इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या सूचनांची गांभीर्याने दखल घेतली जाईल. सर्वांच्या एकजुटीतून आपण हे संकट दूर करूत असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. लॉकडाऊनची चांगली अंमलबजावणी केल्याने एप्रिल महिन्यात आपण कोरोनाचा प्रसार रोखला होता ,आता मे अखेरपर्यंत आपणास ही …

Read More »

अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याचा मृत्यू , जबाबदार कोण? मंत्री कार्यालय कि गुच्छ अधिकाऱ्यांमधल्या नेत्याप्रती निष्ठा आणि स्पर्धेचा पहिला बळी

मुंबई: विशेष प्रतिनिधी एकाबाजूला राज्यातील जनता कोरोना आजारावर विजय मिळण्यासाठी राज्य सरकारला साथ देत आहे. तर दुसऱ्याबाजूला मर्जीतील व्यक्तींची खास पदावर नियुक्ती करण्याच्या आणि नियुक्तीत भ्रष्ट मार्गाचा अवलंब करण्याच्या पध्दतीमुळे एका अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याला आपला जीव गमवावा लागल्याची दुख:द घटना पुणे येथे घडली. त्यामुळे मंत्रालय आणि इतर शासकिय अधिकाऱ्याकडून याबाबत हळहळ …

Read More »

चला शासकिय कर्मचाऱ्यांनो ५ टक्के हजेरी लावा, पण कामकाज चालवा सामान्य प्रशासन विभागाकडून आदेश जारी

मुंबई: विशेष प्रतिनिधी एकाबाजूला कोरोना रूग्णांची संख्या वाढीस लागलेली आहे. मात्र प्रशासनाचा गाडा थांबू नये यासाठी मुंबई महानगर प्रदेश, पुणे महानगर प्रदेश, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्द, मालेगांव महानगरपालिका हद्दीतील सर्व शासकिय कार्यालये ५ टक्के कर्मचाऱ्यांवर सुरु ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच या कर्मचाऱ्यांनी काम करण्यासाठी कार्यालयात आल्यानंतर संसर्ग होणार …

Read More »

मुख्य सचिव म्हणाले, योजना पुढे ढकला, बदल्याही करायच्या नाहीत शासनाच्या सर्व विभागांना आदेश

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. सर्व उत्पन्नाचे मार्ग बंद आहेत. यामुळे राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या सर्व विभागांनी नव्या योजना आणूच नये असे सांगत जितक्या म्हणून योजना आणि त्यावरील खर्च पुढे ढकलता येईल तितका पुढे ढकला असे सांगत कोणत्याही …

Read More »

अजून थोडे दिवस कळ काढा, जाता येईल शेजारच्या जिल्ह्यात कंटेन्मेंटमधील प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्ह्याच्या सीमा बंदच राहणार

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोवीड विषाणूचा प्रादुर्भाव कमी होण्याकरिता उपाययोजना करण्यात येत असताना हळूहळू आर्थिक व्यवहाराला चालना देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रेड झोन आणि कंटेन्टमेंट झोनमधील बाधितांची संख्या कमी करण्यावर भर देणे आवश्यक असल्यामुळे आंतर जिल्हा प्रवासावर अजूनही निर्बंध आहेत, जिल्ह्यांच्या सीमा अजून काही काळ बंदच राहणार असल्याचे आज राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले. …

Read More »

राज्यात पहिल्यांदाच २४ तासात १००८ नवे रुग्ण एकूण संख्या ११ हजार ५०६ तर १८७९ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची आरोग्यमंत्र्यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी आज राज्यात सर्वाधिक १००८ रूग्णांचे निदान झाले असून गेल्या ५१ दिवसात एकादिवसात इतक्या रूग्णांचे निदान होण्याची ही पहिलीच वेळ असून १०६ जणांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १८७९ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे एकूण रुग्ण संख्या ११ हजार ५०६ झाली पोहोचली असून ९१४८ रुग्णांवर उपचार सुरू …

Read More »

महाराष्ट्रातील नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क करायचाय, मग ही यादी बघाच राज्य सरकारकडून जिल्हा नोडल अधिकाऱ्यांची यादी जाहीर

मुंबई: प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनमुळे कामगार, विद्यार्थी, पर्यटक किंवा यात्रेकरू म्हणून परराज्यात किंवा दुसऱ्या जिल्ह्यात अडकून पडला असाल तर घाबरू नका. राज्य सरकारने तुमच्यासाठी राज्यातील सर्व नोडल अधिकाऱ्यांची यादी प्रसिध्द केली असून तुमच्या जिल्ह्यातील नेमक्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात फोनवरून संपर्क साधता येणार आहे. तसेच त्यांच्याकडील पुढील गोष्टींचे मार्गदर्शन घेवून त्यानुसार माहिती द्या. …

Read More »

सरकार विरूध्द राज्यपाल संघर्ष तीव्र निवडणूका घेण्याचे राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र

मुंबई: प्रतिनिधी राज्यासह देशात कोरोनाचे मोठे संकट आलेले आहे. या संकटाची चाहूल लागताच केंद्रीय निवडणूक आयोगाने देशभरातील सर्व निवडणूका, पोटनिवडणूका, विधान परिषदेच्या निवडणूका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. मात्र राज्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच निर्माण झाला. त्यावर तोडगा काढण्याऐवजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी थेट केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहीत …

Read More »

कोटा येथे अडकलेले ३२ विद्यार्थी रायगडकडे रवाना पालकमंत्री आदिती ठाकरे यांची माहिती

अलिबाग: प्रतिनिधी राजस्थान येथील कोटा येथे आय.आय.टी., मेडिकलच्या प्रवेश परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी गेले होते. करोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे देशात सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे ते विद्यार्थी त्या ठिकाणीच अडकले होते. त्यांना परत गावाकडे आणण्यासाठी त्यांच्या पालकांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार आज २८ रोजी पहाटे कोटा …

Read More »

९ हजार रूग्ण संख्येचा टप्पा पार करत राज्यात ३१ जणांचा मृत्यू मुंबई महानगराची संख्या ७ हजार २२३ वर

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारकडून नागरिकांना सातत्याने आवाहन करण्यात येत आहे. तसेच लॉकडाऊन, संचारबंदी आदी गोष्टींची अंमलबजावणीही करण्यात येत आहे. मात्र कोरोना रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढच होत असून आज सर्वाधिक ३१ जणांचा मृत्यू झाला असून राज्यात नव्याने ७२९ रूग्ण आढळून आले असून ९ हजार ३१८ वर संख्या …

Read More »