Breaking News

Tag Archives: हिवाळी अधिवेशन नागपूर

विजय वडेट्टीवार यांची टीका, “मोठ मोठे आकडे सांगुनिया थकले, दिले नाही काही बळीराजा”

अवकाळी आणि दुष्काळी परिस्थितीने शेतकरी उद्धवस्त झाला आहे. परंतु अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना सरकारने शेतकऱ्यांना ठोस काही दिले नाही. हिवाळी अधिवेशनाकडे बळीराजाचे डोळे लागलेले असताना ट्रीपल इंजिन सरकारने जुन्याच घोषणा नव्याने करून शेतकऱ्यांची घोर निराशा केली आहे. शेतकऱ्यांना न्याय न देता अधिवेशनातून पळ काढण्याचा प्रयत्न सरकारनं केला असल्याची टीका विधानसभा …

Read More »

नाना पटोले यांची मागणी,… अन्याय करुन जाऊ नका, विदर्भातील प्रश्नांना उत्तरे द्या

नागपूर करारानुसार विदर्भाच्या प्रश्नांसाठी हे अधिवेशन होत असते. सभागृहात विदर्भातील विषय मांडले पण सरकार त्याला उत्तर द्यायला तयार नाही. केवळ दीड आठवड्याचे अधिवेशन होत आहे. अधिवेशनाचा कालावधी आणखी दोन दिवस वाढवावा अशी मागणी केली पण आता अंतिम आठवडा प्रस्ताव आला आहे. विदर्भावर अन्याय करुन जाऊ नका, विदर्भातील प्रश्नांना उत्तरे द्या, …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती, समृद्धीलगत १३ कृषी अणूऊर्जा आधारीत कांद्याची महाबँक

राज्यात प्रथमच कांद्याची महाबँक स्थापन केली आहे. आजच या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला आहे. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर हे यासाठी मदत करत आहेत. न्यूक्लिअर तंत्रज्ञानाचा वापर करून कांदा इरॅडिशनचा हा पथदर्शी प्रकल्प कांदा उत्पादकांच्या समस्येवर कायमस्वरुपी उपाय ठरेल, असा विश्वास व्यक्त करीत समृद्धी महामार्गालगत १३ कृषी समृद्धी केंद्रांच्या उभारणीचं …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा,…शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २० हजार रुपये बोनस

दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पूर, गारपीट अशा प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहे. गेल्या दीड वर्षांत आम्ही विविध योजनांच्या माध्यमातून बळीराजाला तब्बल ४४ हजार २७८ कोटी रुपयांची आतापर्यंतची विक्रमी मदत केली असून राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सचं पुनर्गठन करण्याचा, धान उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी प्रति …

Read More »

मराठा- कुणबी आरक्षणासाठीचा शिंदे समितीचा दुसरा अहवाल शासनास सादर

राज्यातील मराठा- कुणबी, कुणबी -मराठा जातीच्या नोंदीसाठी आवश्यक पुराव्यांची तपासणी करणे व प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी नेमलेल्या न्यायमूर्ती संदीप शिंदे ( निवृत्त) समितीने तयार केलेला अहवाल आज राज्य शासनास सादर करण्यात आला. विधानभवनाच्या मंत्रिमंडळ कक्षात हा अहवाल न्या. शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

सलिम कुत्ता प्रकरणी अंबादास दानवे, एकनाथ खडसेंचा गिरिष महाजनांवरून सरकारवर हल्लाबोल

मुंबईतील बॉम्बस्फोट प्रकरणातील सहआरोपी सलिम कुत्ता हा पॅरोलवर असताना त्यांच्यासोबत ठाकरे गटाच्या नाशिकमधील नेत्याकडून नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल करत भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी आरोप केला. त्याचे पडसाद आज विधान परिषदेत उमटत विधान परिषदेतील शिवसेना ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सलिम कुत्ता याच्यासोबत भाजपाचे आमदार गिरिष महाजन यांचे नाव …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा पलटवार…मोर्चा आम्ही काढला पण सेटलमंट करायला भाजपा कुठे होती सोबत

मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाची निविदा वादग्रस्त उद्योगपती अदानी समुहाला दिली. ही निविदा फक्त अदानीला मिळावी यासाठी राज्य सरकारने काही नव्याने अटी घातल्या. तसेच अदानी समुहाला मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा होण्यासाठीच या अटींचा समावेश करण्यात आल्यावरून आरोप-प्रत्यारोप फेरी झडत आहे. त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी …

Read More »

बांग्लादेशामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नुकसानः मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली “ही” माहिती

संत्रा निर्यातदार शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात राज्य मंत्रिमंडळात प्रस्ताव आणून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज विधानसभेत दिली. यासंदर्भात सदस्य मोहन मते यांनी प्रश्न उपस्थित केला होता. अब्दुल सत्तार म्हणाले की, संत्रा निर्यातदारांना बांग्लादेशाने आयात शुल्क वाढवल्यामुळे आर्थिक फटका सहन करावा लागला. अनेक शेतकऱ्यांना …

Read More »

मुंबई विद्यापीठातील प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्यास सरकारची मान्यता

मुंबई विद्यापीठात रिक्त पदांवर मनुष्यबळ भरती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. विद्यापीठातील प्राध्यापकांची १३८ रिक्त पदे भरण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. यासंदर्भात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य प्रा. वर्षा …

Read More »

संदीप क्षिरसागर यांनी सांगितली आपबितीः फडणवीस म्हणाले, दोन दिवसात एसआयटी…

राज्यातील मराठा-ओबीसी आरक्षणाप्रश्नावरून आक्रमक रूप धारण केल्याने काही दिवसांपूर्वी बीड शहर आणि माजलगांव येथील मोठ्या प्रमाणावर जाळपोळीच्या घटना घडल्या. याच जाळपोळीच्या घटनांमध्ये शरद पवार समर्थक आमदार संदीप क्षिरसागर यांच्या घराला आणि अजित पवार गटाचे समर्थक आमदार प्रकाश सोळंके यांच्या घराला आग लावत त्यांच्या घरासमोरील वाहनांही लक्ष्य करण्यात आली. या सर्व …

Read More »