Breaking News

Tag Archives: हसन मुश्रीफ

मुंबईतील शासकीय रूग्णालयात सर्व वैद्यकीय चाचण्या उपलब्ध करून द्याव्या विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांचे आदेश

शासकीय रुग्णालयातील रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. वैद्यकीय चाचण्यांसाठी रुग्णांना खासगी वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात येऊ नये. सर्व चाचण्या शासकीय रुग्णालयांतच कराव्यात, यासाठी आवश्यक तंत्रज्ञान, मनुष्यबळाची पूर्तता करण्यात यावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दिले. मुंबईतील कामा, सर जे.जे. रुग्णालय, जी.टी. रूग्णालय, सेंट जॉर्ज रूग्णालयांतील समस्यांबाबत …

Read More »

नाना पटोले, सुषमा अंधारे यांच्या मागणीला यशः ससूनप्रकरणी चौकशी समिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

ससून रूग्णालयात ललित पाटील भूषण पाटील या अंमली पदार्थ तस्करांना दाखल करून घ्यावे या मागणीसाठी सत्ताधारी पक्षाचे मंत्री दादाजी भुसे यांनी रूग्णालय प्रशासनाला फोन केल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केली होती. त्याननुसार या प्रकरणातील सत्य बाहेर …

Read More »

….. तर हसन मुश्रीफांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी

राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या ऑडिटरचा जामीन अर्ज नाकारताना त्यांच्यावर पीएमएलए न्यायालयाने अत्यंत गंभीर स्वरूपाचे निरीक्षण नोंदवले आहे. वास्तविक पाहता या साखर कारखान्याच्या परिसरातील शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे न्यायालयाने अधोरेखित केले आहे. या अनुषंगाने मंत्रिमंडळात मुश्रीफांना एक मिनीटसुद्धा ठेवू नये असे सांगतानाच सरकारला शेतकऱ्यांची कणव असेल, तर मुश्रीफांची मंत्रिमंडळातून …

Read More »

छत्रपती संभाजी नगर, लातूरमध्ये शासकीय दरात उपचार पण आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

छत्रपती संभाजी नगर आणि लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रूग्णालयाचे परिचालन आणि व्यवस्थापन शासन आणि खाजगी भागीदारी तत्वावर करण्यात येणार आहे. याद्वारे रूग्णांना शासकीय दरामध्ये उपचार मिळणार आहेत. यासाठी रूग्णालयामध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त खाटा महात्मा फुले जनआरोग्य आणि आयुष्मान भारत योजनेतील लाभार्थींसाठी राखीव ठेवण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण …

Read More »

अजित पवार यांचे आव्हान, महायुतीत सहभागी व्हा पत्र खोटं निघालं तर संन्यास घेईन… लोकांची कामे पूर्ण करण्याचा दबाव होता

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यापासून फारकत घेतल्यानंतर बीड येथे झालेल्या सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी बीडऐवजी कोल्हापूरात हसन मुश्रीफ यांनी उत्तरदायित्व सभा आयोजित करण्यात आली. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, अजित पवार आणि काही लोकांनी वेगळा निर्णय का घेतला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आमच्यावर कसला दबाव होता अशी …

Read More »

जे जे रुग्णालयात यकृत रोपण सुविधा उपलब्ध करुन देणार मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

सर्वसामान्य रुग्णांना माफक दरात सर ज. जी. (जे.जे.) रुग्णालयात यकृत रोपण सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. सर ज.जी.रुग्णालयात विविध विषयांवर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे …

Read More »

शरद पवार यांचा पलटवार, …जे गेले नाहीत ते बोलत आहेत कोल्हापूरातील सभेनंतर हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्यावर केला पलटवार

काल शुक्रवारी कोल्हापूरातील दसरा मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची जाहिर सभा झाली. त्यावेळी पक्षाला सोडून अजित पवार गटाच्या आमदारांवर चांगलाच हल्लाबोल चढविला. त्यानंतर आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले, ज्यांना चौकशीला बोलविण्यात आलं त्यांना सांगण्यात आलं की, तुम्ही सत्तेत असलेल्या पक्षासोबत जा नाही तर तुमची जागा …

Read More »

इतर राज्यातील विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी आकर्षित होतील अशी सुस्थिती करणार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

“शासकीय वैद्यकीय, आयुष आणि दंत महाविद्यालयांच्या इमारती अधिक सुसज्ज, दर्जेदार कराव्यात व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत. इतर राज्यांतील विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी आकर्षित होतील अशी सुस्थिती निर्माण करावी, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय, आयुष आणि दंत महाविद्यालयातील …

Read More »

उत्पन्न वाढीच्या मुद्यावरून जयंत पाटील हसन मुश्रीफ यांच्यात रंगला वाद पहिल्यादाच राष्ट्रवादीच्या दोन गटातील मंत्र्यांमध्ये रंगला वाद

राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सत्ताधारी गटासोबत गेलेल्या अजित पवार यांच्यासह ९ आमदार मंत्र्यांमध्ये आणि शरद पवार यांच्या गटात आतापर्यंत एखाद्या प्रश्नावरून वाद रंगल्याचे चित्र सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात दिसले नव्हते. मात्र आज पहिल्यांदाच अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ आणि शरद पवार गटाचे आमदारा जयंत पाटील यांच्यात लक्षवेधीवरील …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, सेतू कार्यालयातून सामान्य जनतेची होणारी लूट थांबवा सेतू कार्यालये अद्ययावत करण्यासाठी शासनाचे धोरण काय?

शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे दाखले सेतू कार्यालयातून घ्यावे लागतात. ही सेतू कार्यालये जनतेच्या सुविधांसाठी आहेत परंतु या सेतू कार्यालयातून सामान्य जनतेची सर्रास लूट केली जात आहे. १५ ते २० रुपयांच्या दाखल्यासाठी २०० ते ३०० रुपये घेतले जातात, जनतेची होणारी ही लूट सरकारने थांबवावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष …

Read More »