Breaking News

Tag Archives: मुंबई

शिवराज्याभिषेक दिनी मुंबईसह रायगडावर ‘या’ कार्यक्रमांचे आयोजन रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होणार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार असून कार्यक्रमासह येथे येणाऱ्या शिवभक्तांच्या सेवेसाठी प्रशासन देखील सज्ज झाले आहे. शुक्रवार २ जून रोजी सकाळी ८.३० वाजता या सोहळ्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईत समुह पुनर्विकास धोरणासह या गोष्टींना मान्यता ठाण्याच्या धर्तीवर मुंबई महापालिका हद्दीत समुह पुनर्विकास

मुंबईतील समूह पुनर्विकासाला मोठे प्रोत्साहनः अधिमूल्यात ५० टक्के सवलत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला निर्णय मुंबईमध्ये समूह पुनर्विकासास मोठे प्रोत्साहन देण्यासाठी अधिमूल्य तसेच विकास अधिभारामध्ये ५० टक्के सवलतीचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यापूर्वी २० ऑगस्ट २०१९ रोजी दिलेल्या निदेशाच्या धर्तीवर विनियम ३३ …

Read More »

ठाकरे गटाचे खासदार राऊत यांचा पलटवार,… एकनाथ शिंदेंना स्मृतीभ्रंश झाला एकनाथ शिंदे यांना ठाकरे नावाची कावीळ झालीय

शिवसेना ठाकरे गटाचे  खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्र सोडताना म्हणाले, मिंधे गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरे या नावाची कावीळ झाली आहे. मोदीभक्त झालेल्या शिंदे गटाला आता उद्धव ठाकरेंवर आणि आमच्या पक्षावर टीका करण्याशिवाय दुसरं काम नाही. आरएसएसकडून स्क्रिप्ट लिहून दिली जाते, ते वाचण्याचं काम केलं …

Read More »

न्या. रमेश धानुका यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ; सर्वाधिक कमी कालावधी मिळणार अवघे चार दिवस मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश

उच्च न्यायालयातील न्यायाधीश रमेश देवकीनंदन धानुका यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. आज राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल रमेश बैस यांनी न्या. धानुका यांना पदाची शपथ दिली. आता पर्यंत न्यायालयाच्या इतिहासात सर्वाधिक कमी कालावधी न्यायमुर्ती धानुका यांना मिळाला आहे. चार दिवसानंतर धानुका हे …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या राजकीय निर्णयाच्या विरोधात मुंबईवर एकटवले मुंबईतील खुल्या जागा, खेळाचे मैदान आणि मनोरंजन मैदानाचे सद्याचे धोरण बदलण्याची हालचाल

मुंबईतील खुल्या जागा, खेळाचे मैदान आणि मनोरंजन मैदानाचे सद्याचे धोरण बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्त यांस आदेश जारी केले असून त्याविरोधात बॉम्बे कॅथोलिक सभेने एका सभा माहिम येथील सेंट मायकल सभागृहात आयोजित करण्यात आले होते. खाजगी संस्थेस किंवा व्यक्तीस दत्तक देण्याऐवजी शासन आणि पालिकेने या जागेच्या परिरक्षण करण्यावर सर्व वक्त्यांनी भर …

Read More »

राज्य सरकारची नवी घोषणा, अडीच लाखात झोपडीधारकाला घर; शासन निर्णय वाचा गृहनिर्माण विभागाकडून शासननिर्णय जारी

सर्वोच्च न्यायालयाने अप्रत्यक्षरित्या शिंदे-फडणवीस सरकारवर अपात्रतेवर शिक्का मोर्तब केल्यानंतर राज्यात विधानसभा-लोकसभा निवडणूका घेण्याच्या चर्चेला सुरुवात झाली. तर दुसऱ्याबाजूला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकाही जाहिर करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यापार्श्वभूमीवर काहीही करून मुंबई महापालिका ठाकरे गटाच्या ताब्यातून हिसकावून घ्यायचीच याचा चंग बांधलेल्या भाजपा-शिंदे गटाने आता मुंबईकरांसह राज्यातील झोपडीधारकांना खुष करण्यासाठी अडीच लाख …

Read More »

भेटीनंतर शरद पवार यांचे अरविंद केजरीवालांना आश्वासन,…काळाची गरज राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करणार

देशातील लोकशाही वाचवण्यासाठी भाजपाविरुध्द सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्यक्त केले. दिल्लीतील आप सरकारविरोधातील विधेयकाला राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करतील असे आश्वासन शरद पवार यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिले. अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान व आपच्या …

Read More »

नाना पटोले यांची थेट पोलिस महासंचालकाकडे मागणी, ती पोलीस भरतीची प्रक्रिया स्थगित करा… पोलीस भरती प्रक्रियेची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करा

पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या राज्यातील हजारो मुला-मुलींसाठी मुंबईतील ७ मे २०२३ रोजीची पोलीस भरती परिक्षा ही एक मोठी संधी होती. परंतु या पोलीस भरतीमध्ये अनुचित प्रकार झाल्याचे उघड झाले आहे. या परिक्षेत मोठ्या प्रमाणात हायटेक कॉपी करण्यात आली. कमी मार्क असलेल्या मुलांना पात्र ठरवण्यात आले, यासह भरतीसाठी मुलांकडून …

Read More »

१२ वीचा निकाल जाहिरः कोकणचा सर्वाधिक तर मुंबईचा सर्वात कमी टक्क्याचा बारावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले अभिनंदन

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १२ वीच्या परीक्षांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. राज्यात एकूण ९१.२५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून परीक्षेतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थी, त्यांचे पालक व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अभिनंदन केले आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी …

Read More »

अतुल लोंढे यांची मागणी, दंगलीस चिथावणी देणाऱ्या आशिष शेलारांना अटक करा मणिपूरमधील गोहत्येची चित्रफीत कर्नाटकची असल्याचा दाखवून माथी भडकवण्याचा डाव

राज्यातील वातावरण अशांत करुन धार्मिक दंगली भडवण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. भाजपाचे आशिष शेलार, नितेश राणे सारखे लोक सामाजिक द्वेष वाढवणारी प्रक्षोक्षक विधाने सातत्याने करत आहेत. मणिपूरमधील गोहत्येची चित्रफीत कर्नाटकची असल्याचे खोटे सांगून आशिष शेलारांनी जनभावना भडकवण्याचा प्रयत्न केला आहे. अशा प्रकारे अफवा पसरवून शेलार यांनी राजकीय फायद्यासाठी दंगल भडकवण्याचा …

Read More »