Breaking News

Tag Archives: मणिपूर हिंसाचार

मणिपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ११ बुथवर पुन्हा मतदान निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे आयोगाला पत्र

भारताच्या निवडणूक आयोगाने शुक्रवारी अंतर्गत मणिपूरमधील पाच विधानसभा क्षेत्रांमधील ११ बूथवर घेतलेले मतदान रद्द घोषित केले आहे, पीठासीन अधिकाऱ्यांनी काही बूथमध्ये जमावाने हिंसाचार, गोळीबार आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे नष्ट केल्याचा अहवाल दिला आहे. ईसीआयने जाहीर केले आहे की या बूथवर सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेत फेरमतदान घेण्यात येईल. …

Read More »

अमित शाह म्हणाले, मणिपूरमधील हिंसाचाराला म्यानमार मधील मिलीटरी राज… विरोधकांच्या अविश्वासदर्शक ठरावाला अमित शाह यांनी दिले उत्तर

मणिपूरमधील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला आहे. त्यावर मंगळवारपासून लोकसभेत चर्चा सुरु झाली आहे. आसाममधील खासदार गौरव गोगोई यांनी अविश्वास प्रस्ताव मांडला आणि सरकारला धारेवर धरणारे तिखट प्रश्न उपस्थित केले. त्यावर भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी उत्तर दिलं. त्यापाठोपाठ आज लोकसभेत काँग्रेस खासदार राहुल …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, मणिपूरचा हिंसाचार हे गुजरातचे मॉडेल हिंसाचार प्रकरणात बरेचसे साम्य

आरएसएस आणि भाजपा संत्तेत आल्यापासून देशात मुस्लिम दलित आदीवासी विरोधी धार्मिक ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. सध्या मणिपुर मध्ये सुरू असलेला हिंसाचार २००२ मध्ये झालेल्या गुजरात हिंसाचाराचे मॉडेल आहे.गुजरातमध्ये मुस्लिम विरोध होता तर मणिपुरमध्ये मैतेईचा वापर होत आहे.असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले. प्रदेश कार्यालयात …

Read More »

संसदेत विरोधक पंतप्रधानांची वाट बघतायत, तर पंतप्रधान मुख्यमंत्री गेहलोतांच्या… पीएमओने भाषण हटविल्याने अशोक गेहलोत ऑनलाईन पध्दतीने उपस्थित

एकाबाजूला अडीच महिन्याहून अधिक काळ मणिपूर राज्यातील हिंसाचार काही केल्या थांबायला तयार नाही. त्यातच दिवसेंदिवस तेथील नवनवीन घटनांचे धक्कादायक व्हिडिओ बाहेर येत आहेत. यापार्श्वभूमीवर सध्या संसदेच्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात मणिपूरप्रश्नी आपले मत मांडावे यासाठी काँग्रेससह विरोधी पक्षांकडून रोज गोंधळ घातला जात आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेत जायलाही …

Read More »

मणिपूर प्रश्नी जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली गांधी पुतळ्यासमोर आंदोलन सलग दोन महिने मणिपूर धगधगतंय मात्र सरकार निष्क्रिय !

मणिपूर येथे घडणाऱ्या हिंसाचार विरोधात व केंद्र सरकारच्या निष्क्रियतेविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात आले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालय परिसरातील गांधी पुतळ्यासमोर मौन व्रत धारण करून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाबाबत माहिती देताना जयंत पाटील म्हणाले की, भारतात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती किती …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, …शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, पोकळ घोषणा नको सरकारवर शेतकरी, गरिब जनतेचा विश्वासच राहिला नाही

राज्यातील शेतकऱ्यावर संकटाचे आभाळ कोसळले आहे पण राज्य सरकारची मदत काही पोहचत नाही. राज्य सरकार केवळ घोषणा करते त्याची अंमलबजावणी होत नाही. मागील वर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची मदत अजून मिळालेली नाही, त्याचा सर्वेही केलेला नाही. सरकारकडे तलाठी, कृषी सहाय्यक ही यंत्रणा नाही. संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला राज्य सरकारने तातडीने …

Read More »

मणिपूरमधील भाजपा आमदाराकडूनच पंतप्रधान मोदींच्या भूमिकेवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह न्युजलाँड्री या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत केला अनेक गोष्टींचा गौप्यस्फोट

साधारणतः दोन महिन्याहून अधिक काळ मणिपूर मधील हिंचासार काही केल्या शांत होण्याची चिन्हे दिसून येत आहे. अखेर मणिपूरप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला दट्ट्या दिल्यांनंतर व्हायरल व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा शासित मणिपूरबरोबर काँग्रेसची राजवट असलेल्या राज्यांना लक्ष्य करत विरोधकांवरच टीका केली. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर …

Read More »

मुख्यमंत्री पिनराई विजयन म्हणाले, मणिपूरमधील हिंसाचाराला राष्ट्रीय स्वंयसेवक संघ…. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि केंद्र सरकारचे मौन यातच सगळे आले

मागील दोन महिन्याहून अधिक काळ मणिपूर धुमसत असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरला भेट देण्याऐवजी अमेरिका, फ्रांस आणि मुस्लिम राष्ट्राच्या दौऱ्यावर गेले. मात्र मणिपूरबद्दल चकार शब्द काढला नाही. त्यातच संसदेच्या पावसाळी अधिवेशाच्या तोंडावर मणिपूर येथील दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यावरून भारतासह विदेशातून मोदी सरकारवर …

Read More »