Breaking News

Tag Archives: उपमुख्यमंत्री

मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, मराठवाड्याच्या शाश्वत विकासाला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य ३०० वर्षे जुन्या पुलाच्या कामासाठी निधी देणार

मराठवाड्याच्या विकासाचे मध्यवर्ती केंद्र म्हणून छत्रपती संभाजी नगरची ओळख आहे. या शहरासह मराठवाड्यातील पायाभूत सुविधांसाठी शासनाने वेळोवेळी निधी उपलब्ध करुन दिला आहे. मराठवाड्याच्या शाश्वत विकासाला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शहरातील वंदे मातरम सभागृहात “मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी” वर्षानिमित्त महापालिकेच्या विविध विकासकामांचे उद्घाटन व …

Read More »

छत्रपती संभाजीनगर महसुली विभाग, धाराशिव जिल्हा नामकरण फलकाचे तिघांकडून उद्धाटन मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

छत्रपती शिवाजी महाराज की जय… छत्रपती संभाजी महाराज की जय… या जयघोषाच्या निनादात छत्रपती संभाजीनगर महसुली विभागाचे आणि धाराशिव जिल्हा नामकरण फलकांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांचे छत्रपती …

Read More »

अखेर औरंगाबाद, उस्मानाबादच्या तालुका, जिल्हा आणि विभागाचे नामांतर मराठवाड्यातील बैठकीच्या अनुषंगाने राज्य सरकारचा मोठा निर्णय

महाविकास आघाडीने सरकारला उलथवून टाकत राज्यात स्थानापन्न झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ठाकरे सरकारचा निर्णय रद्दबादल ठरवित पुन्हा एकदा औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे अनुक्रमे छत्रपती संभाजी नगर आणि धाराशीव असे नामांतर करण्याचा निर्णय घेतला. मात्र औरंगाबाद नामांतर प्रश्नी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असताना आणि मराठवाडा …

Read More »

अंबादास दानवे यांचा टोला, मागील फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीतील घोषणा अजूनही अपूर्णच ४१ हजार कोटींच्या घोषणा अद्यापही अपूर्णच

२०१६ साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात संभाजीनगर येथे मंत्रिमंडळ बैठक झाली होती.या बैठकीमध्ये मराठवाड्याच्या विकासासाठी ४१ हजार कोटी रुपयांचा कालबद्ध कार्यक्रम घोषित करण्यात आला होता.परंतु यामध्ये घेण्यात आलेले निर्णय अजूनही अपूर्ण असल्याची माहिती पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज दिली.सध्याच्या सरकारमध्ये फडणवीस हे सुपर सीएमच्या भूमिकेत आहेत …

Read More »

नवीन आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालयांना मंजुरीसह श्रेणीवर्धन व पदभरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

राज्यातील वरुड, मोर्शी, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, तुमसर, पुसद, चंदगड, गडहिंग्लज, आजरा, वसमत, गंगापूर, खुलताबाद, औंढा नागनाथ, अकोले, संगमनेर, सुरगाणा, शिरूर, आंबेगाव, मंचर, बारामती, खेड, मोहोळ, अहमदनगर आदी तालुक्यातील नवीन प्राथमिक तसेच उप आरोग्य केंद्रे, उप जिल्हा रुग्णालयांना मंजुरी देण्याबरोबरच, रुग्णालयांचे श्रेणीवर्धन, पदभरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी. रुग्णालयांना वैद्यकीय …

Read More »

अजित पवार यांचे निर्देश, विकासप्रकल्प निधी किंवा प्रशासकीय मान्यतेअभावी प्रलंबित राहू नयेत प्रकल्प संनियत्रण कक्षाची घेतली बैठक

“राज्यातील महत्वाचे विकासप्रकल्प निधी किंवा प्रशासकीय मान्यतेअभावी प्रलंबित राहणार नाहीत. पुणे मेट्रो, पुणे रिंगरोड, पुणे नाशिक हायस्पिड रेल्वे, सातारा, अलिबाग येथील वैद्यकीय महाविद्यालये, ‘सारथी’संस्थेचे पुण्यातील मुख्यालय, औंध, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अमरावतीतील ‘सारथी’च्या विभागीय उपकेंद्रांचे बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण करावे,” असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज …

Read More »

अजित पवार यांचे निर्देश, लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार तातडीने पूर्ण करा महावितरण’ची प्रलंबित व नवीन उपक्रेंद्रांची कामे

राज्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांकडून होणाऱ्या वीजेच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने (महावितरण) प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत. लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार संबंधित भागातील उपकेंद्रांचे प्रलंबित काम पूर्ण करणे, उपकेंद्रांची क्षमतावाढ करणे आणि नवीन उपकेंद्र मंजूर करणे आदी कामे हाती घेऊन प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. …

Read More »

पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार यांच्यात रंगला शाब्दिक कलगीतुरा छत्रपतींचे पुरावे चालत नाही अन् निझामाचे चालतात....

मराठा आरक्षणप्रश्नी जालन्यात मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यासह राज्यातील कुणबी समाजातील सर्वांना मराठा आरक्षणाचा लाभ देण्याची मागणी केली. त्यावर राज्य सरकारने निजामकालीन नोंदी असलेल्या मराठा कुटुंबांना कुणबी दाखले देण्याची घोषणा केली. तर दुसऱ्याबाजूला याच मुद्यावरून जालन्यातील आंदोलन आणखी उग्र करत वंशावळीचा मुद्दा काढून टाकण्याची मागणीही करण्यात …

Read More »

अजित पवार म्हणाले, मराठा आरक्षण प्रश्नी सर्वपक्षिय बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावली बैठक

जालना येथील आंतरवाली सराटे येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण प्रश्नी उपोषणाचे आंदोलन पुकारले आहे. त्यांच्या या उपोषणाच्या आंदोलनाचा आज १४ वा दिवस असून आजपासून मनोज जरांगे पाटील यांनी वैद्यकीय उपचार आणि पाणीही त्यागले आहे. त्यातच राज्य सरकारने दोन वेळा सुधारणा केलेल्या राज्य सरकारचा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी …

Read More »

महाराष्ट्रासाठी स्वतंत्र “भूस्खलन देखरेख व अभ्यास संस्था” स्थापन करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांची मागणी मान्य

केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रासाठी देशातील पहिली राज्यस्तरीय “भूस्खलन देखरेख आणि अभ्यास संस्था” स्थापन करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांच्या मागणीवर दिली आहे. महाराष्ट्रात पावसाळयात भूस्खलनाच्या घटना दरवर्षी घडत असून माळीन, तळीये नंतर या पावसाळयात खालापूर येथील इर्शाळवाडी येथे भूस्खलन होऊन शेकडो …

Read More »