Breaking News

Tag Archives: मराठा आरक्षण

नाना पटोले यांची मागणी, जरांगे पाटलांनी फडणवीसांवर लावलेल्या आरोपांची SIT चौकशी करा

मराठा समाजाच्या आरक्षणावरुन सरकारने राज्यात वाद निर्माण केले आहेत, सरकारच समाजा-समाजात तेढ निर्माण करत आहे. मराठा समाजावरून राज्यातील राजकीय व सामाजिक वातावरण बिघडलेले आहे. मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात काय बोलणे झाले हे जाहीर करण्याची मागणी काँग्रेस सातत्याने करत आहे. आता मनोज जरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचा सूचक इशारा, आई-बहिण काढता अन् शिवाजी महाराजांचे उदाहरण देता

राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी हा प्रश्न रखडण्यास देवेंद्र फडणवीसच जबाबदार असल्याचा आरोप करत आपला बळी घेण्यासाठी इन्कांऊटर करण्याचा किंवा सलाईनमधून विष देण्याचा डाव असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. या प्रकरणी राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण रहात असलेला …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, हिम्मत असेल तर मुख्यमंत्री व जरांगे पाटील यांच्यातील चर्चा जाहीर करा

मराठा आरक्षण प्रश्नावर शिंदे फडणवीस पवार सरकारने फसवणूक केली आहे, आरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्र पेटवण्याचे पाप केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराला काळीमा फासला आहे. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ असे सांगत कुणबी प्रमाणपत्र वाटून ओबीसी आरक्षणाला धक्का लावला. महाराष्ट्रात नेमके काय चालले आहे? …

Read More »

विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल ‘फसवणूक नको आरक्षण द्या’

राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे आजपासून सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कामकाज सुरू होण्यापूर्वीच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केले. आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधक आक्रमक झाले. ‘फसवणूक नको आरक्षण द्या’ ‘महायुती सरकारचा जागर, आरक्षणाचे रोज नवीन गाजर’ म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. याप्रसंगी विरोधकांनी पायऱ्यांवर धिक्कार असो, मराठा समाजाच्या जीवाशी …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांच्या खळबजनक आरोपावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

राज्यात आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पुढील महिन्यापासून निवडणूकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच उद्या सोमवार २६ फेब्रुवारीपासून राज्याचे अंतरिम अर्थसंकल्पिय अधिवेशनही सुरु होणार आहे. त्यातच राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीवरून जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे आंदोलन करत असलेले मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मतं मिळविण्यासाठी आरक्षण फसव्या सरकारकडून मराठा समाजाची पुन्हा फसवणूक

महायुती सरकारने विशेष अधिवेशनाचा फार्स करून आज मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण दिले. हे आरक्षण न्यायालयात टिकणारे नाही. त्यामुळे फसव्या सरकारने मराठा समाजाची पुन्हा फसवणूक केली असल्याची प्रतिक्रीया विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. सरकारचे पितळ उघडे पडेल म्हणून आज सभागृहात विरोधी पक्षाच्या नेत्यांना बोलू …

Read More »

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, श्रीमंत शाहु महाराज हे राजकारणात… तर मराठा आरक्षणावर….

देशात आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून भाजपाकडून पुन्हा एकदा एनडीएचा तर महाराष्ट्रात महायुतीचा आलाप आवळायला सुरु केले आहे. तर शिवसेना उबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात सध्या कोणत्या मुद्यावर भाजपाला रोखायचे आणि कोणाच्या हिश्याला किती जागा द्यायच्या यावरून अद्यापही चर्चेच्या फेऱ्या होत …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण

राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात बोलविलेल्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गात शिक्षण व नोकरीमध्ये १० टक्के आरक्षण देण्याचे विधेयक एकमताने मंजूर झाले. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे वर्षानुवर्षे एकाच गावात नांदणारे मराठा व ओबीसी बांधव यापुढेही गुण्यागोविंदाने नांदतील व …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मराठा आरक्षणाचा निर्णय धाडसी आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारा

राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक आज विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षणासाठी घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक, धाडसी आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारा असल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने संमत केल्याबद्दल सर्व सदस्यांचे आभार मानले. इतर मागास वर्ग (ओबीसी) अथवा …

Read More »

राज्यपालांच्या अभिभाषणाने विशेष विधिमंडळ अधिवेशनाची सुरूवात

शेतकरी, कामगार, युवकांसह सर्वच समाजघटकांच्या अपेक्षापूर्तीसाठी राज्य शासन काम करीत असून महाराष्ट्राला अधिकाधिक समृद्धीकडे नेण्यासाठीच्या या प्रयत्नांमध्ये सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. रोजगार निर्मिती, उद्योगक्षेत्रातील गुंतवणूक यामध्येही भरीव वाढ झाली असून २०२७-२८ पर्यंत देशाच्या पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था साध्य करण्याच्या उद्दिष्टाशी अनुरूप अशी राज्याची एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था साध्य करण्याचे महत्त्वाकांक्षी …

Read More »