Breaking News

Tag Archives: मनसे

राज ठाकरे यांच्या पोस्टवर शरद पवार यांची खोचक टीका, महिना-दोन महिन्यानंतर जागे… आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी जातीपातीबाबत केली होती पोस्ट

राज्यातील वारकरी संप्रदायांच्या आषाढी एकादशी निमित्त राज्यातील सत्ताधारी आणि प्रमुख विरोधी पक्षांकडून आषाढी वारीचे निमित्त साधत राज्यातील अनेक प्रश्नी विठ्ठलाला साकडे घातले. त्यातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही आषाढी एकादशी निमित्त साधत महाराष्ट्रातील जातीपातीच्या राजकारणावरून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. यापूर्वी अनेकदा मनसे प्रमुख राज …

Read More »

राज ठाकरे यांचे आवाहन, जातीपतीचे विष कालवणाऱ्यांना दूर करा मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले आवाहन

विधानसभा निवडणूका जाहिर होण्यास अद्याप तीन-चार महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. मात्र लोकसभआ निवडणूकीत लागलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी आणि सत्ताधारी पक्षासोबत असलेल्या समविचारी पक्षाकडूनही आता विधानसभा निवडणूकीची तयारी सुरु केली आहे. यापार्श्वभूमीवर आज मनसेच्या पादधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत, समाजामध्ये जातीपातीचे विष कालवणाऱ्यांना महाराष्ट्रातून दूर करावे, कारण यातून …

Read More »

मनसेने पुन्हा घेतली निवडणूकीच्या रिंगणातून माघार अभिजित पानसे पुन्हा अर्ज काढून घेणार

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी राज्यात अजित पवार गट, एकनाथ शिंदे गट आणि भाजपाला पाठिंबा जाहिर करत पक्षाच्यावतीने उमेदवारही उभे केले नाहीत. २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणूकीतही राज ठाकरे यांनी उमेदवार न देता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा जाहिर केला …

Read More »

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्रासाठी मागितल्या या गोष्टी, पण पंतप्रधान मोदींकडून साधा उल्लेखही नाही

स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेस विसर्जित करावी असा सल्ला महात्मा गांधींनी दिला होता. त्यानुसार काँग्रेस विसर्जित झाली असती, तर देश पाच दशके पुढे गेला असता. नैराश्याने ग्रासलेल्या आणि भारतीयांच्या क्षमतेवर विश्वास नसलेल्या काँग्रेसने देशाला पाच दशके मागे ढकलले, असा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी शिवाजी पार्कवरील विराट विजय संकल्प सभेत …

Read More »

राज ठाकरे यांचा सवाल, साडेसात वर्षे सत्तेत होते मग उद्योगधंदे बाहेर का?

काही दिवसांपूर्वी केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्यासाठी राज्यातील भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जाहिर पाठिंबा देत असल्याचे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जाहिर केले. त्यानंतर भाजपासह महायुतीतील घटक पक्षांच्या समर्थनार्थ कधी सभा घेणार आणि कोण कोणत्या ठिकाणी जाहिर सभा घेणार याची माहिती लवकरच देणार असल्याचे सांगत …

Read More »

राज ठाकरे यांचा उपरोधिक टोला, जी टीका केली ती ४० आमदार फोडले म्हणून…

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नुकतीच जाहिर सभा घेत राज्यातील भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी पाठिंबा देत असल्याची घोषणा केली. या पाठिंब्यावरून राज्याच्या राजकारणात राज ठाकरे यांच्यावर टीका होऊ लागली. या टीकेला राज ठाकरे यांनी आज प्रत्युत्तर देताना राज ठाकरे यांनी शिवसेना उबाठा …

Read More »

राज ठाकरे म्हणाले, व्याभिचाराला राज मान्यता देऊ नका…मोदींना बिनशर्त पाठिंबा

दरवर्षी प्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढी पाढवा मेळावा आज दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर आयोजित करण्यात आला होता. मागील काही दिवसांपूर्वी राज ठाकरे हे दिल्लीत अमित शाह यांच्या भेटीला गेले होते. तसेच राज ठाकरे हे भाजपासोबत जाणार असल्याची अटकळही बांधली जात होती. त्यामुळे आज मनसेच्या गुढी पाढवा मेळाव्यात राज …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, राज ठाकरेंशी युती करून भाजपा कोणत्या तोंडाने उत्तर भारतीयांची मते मागणार ?

भारतीय जनता पक्षाने राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महायुतीत घेऊन भाजपाने उत्तर भारतीय बांधवांचा फक्त विश्वासघातच केला नाही तर त्यांच्या जखमेवर मीठ चोळून त्यांच्या स्वाभिमानाला धक्का लावला आहे. उत्तर भारतीय बांधवांना लाठ्या काठ्यांनी मारणा-या राज ठाकरेंना सोबत घेऊन भारतीय जनता पक्ष कोणत्या तोंडाने उत्तर भारतीयांची मते मागणार आहे? असा सवाल …

Read More »

राज ठाकरे आणि अमित शाह यांची दिल्लीत चर्चा

लोकसभा निवडणूकांची आचारसंहिता जाहिर होऊन आज जवळपास चार दिवस झाले. मात्र देशातील सर्व लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची यादी कोणत्या राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्षांकडून अद्याप जाहिर करण्यात आलेली नाही. निवडणूकांची प्रत्यक्ष नोटीफीकेशन जाहिर होण्यास अद्याप काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिलेला आहे. त्यापार्श्वभूमीवर विविध राजकिय पक्षांच्या युत्या-आघाड्या आणि राजकिय समीकरणं साधण्याला सध्या …

Read More »

राज ठाकरे यांचा सवाल, अमेरिकेत मराठी शाळा सुरु तर महाराष्ट्रात बंद…

मराठी भाषा आणि मराठी माणूस ह्यासाठी मी आणि माझ्या पक्षाने अनेक आंदोलनं केली, मी जेलमध्ये गेलो, अंगावर केसेस घेतल्या. मी अत्यंत कडवट मराठी आहे आणि माझ्यावरचे संस्कार पण तसेच आहेत. महाराष्ट्र ही काय ताकद आहे हे जसं जसं मला समजत गेलं तसं तसं मी महाराष्ट्राच्या प्रेमात अधिक पडत गेलो अशी …

Read More »