महाराष्ट्र आज विदेशी थेट गुंतवणुकीत देशात प्रथम क्रमांकावर आहे. यामुळे रोजगार देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. राज्य कृषि, शिक्षण, ऊर्जा, पायाभूत सुविधा, आरोग्य आणि पर्यटन अशा सर्व क्षेत्रात देशात क्रमांक एकवर राहील हा आमचा विश्वास आहे. त्यासाठी आपण सर्वजण शपथबध्द होऊया आणि प्रयत्नशील राहूया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …
Read More »‘माझी माती, माझा देश’ अभियानास सुरुवात मंत्रालयात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत अधिकारी-कर्मचारी घेणार पंचप्रण शपथ
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्यात ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’अभियान बुधवार, ०९ ऑगस्ट, २०२३ पासून सुरु होत आहे. त्या अनुषंगाने सकाळी १० वाजता मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे पंचप्रण शपथ तसेच इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, …
Read More »कोकणातील पायाभूत विकासाला प्राधान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
राज्यातील जनतेला मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे हे सरकारचे कर्तव्य असून त्यामध्ये रस्त्यांची जोडणी ही महत्त्वपूर्ण बाब आहे. त्या पार्श्भूमीवर कोकणाच्या गतीमान विकासासाठी त्या ठिकाणी दळणवळण सुविधांमध्ये वाढ करण्यास आणि पायाभूत सुविधा उभारण्यास शासनाचे प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील एकूण १२ …
Read More »सुट्टीच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून नागरिकांच्या पत्रांवर कार्यवाही शनिवार असूनही कामाचा उरक
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन शुक्रवारी (दि.४) रात्री उशीरा संस्थगित झाल्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (५ ऑगस्ट) सुट्टीच्या दिवशी सकाळी लवकर आठ वाजता मंत्रालयात येऊन अधिवेशन काळात नागरिकांकडून प्राप्त झालेल्या पत्रांचा आढावा घेतला. तसेच कार्यवाहीबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. तत्पूर्वी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली. उपमुख्यमंत्री …
Read More »पदोन्नतीसाठीच्या विभागीय परिक्षेसंदर्भातील निकषाबाबत महिन्याभरात बैठक मंत्री गुलाबराव पाटील याची माहिती
शासनाच्या सन २०२२ च्या शुद्धिपत्रकामुळे प्रदीर्घ काळ प्रशासनाची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यास त्याच्या वयाच्या ५० वर्षानंतर सेवानिवृत्तीपूर्वी पदोन्नतीची संधी उपलब्ध होईल, हा हेतू साध्य झाला आहे. शासनाने सदर शुद्धिपत्रक हे व्यापक हीत लक्षात घेऊन काढलेले असून विभागीय परीक्षेतून सूट देण्याच्या शासनाच्या अनुषंगाने न्यायाधिकरणात दोन स्वतंत्र मागणीसाठी दोन मूळ अर्ज दाखल केले …
Read More »सुरक्षा कायद्याबाबत अधिकारी एकतर्फी निर्णय घेणार नाही महासंघाच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
अधिकाऱ्यांचे सुरक्षा कवच असलेल्या कायद्यात बदल करावा, अशी मागणी पावसाळी अधिवेशनात करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी संघाने मागणीला विरोध करत, मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी कायद्यात बदल करू नका असे साकडे घातले. दरम्यान, अधिकारी महासंघाच्या प्रतिनिधींना अडथळा ठरणारा कोणताही एकतर्फी निर्णय घेणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, ठाणे – नाशिक महामार्ग आठ पदरी…. मुख्यमंत्र्यांनी केली खारेगाव ते पडघा मार्गाची पाहणी
ठाणे -नाशिक महामार्गावर पडघ्यापर्यंत वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी आठ पदरी रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे. लहान वाहनांना रस्ता मिळावा, यासाठी अवजड वाहने डाव्या बाजूने चालविण्यासंदर्भात सूचना, तसेच या मार्गावरील खड्डे तातडीने मास्टिकने भरण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकानाथ शिंदे यांनी दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी ठाणे- नाशिक महामार्गावरील …
Read More »मंत्री पदाची सुत्रे हाती घेताच धनंजय मुंडे यांचे आदेश, योजनांमध्ये लॉटरी पद्धत बंद कृषी विभागातील 'मागेल त्याला योजनां'मध्ये अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला लाभ द्यावा
महाडीबीच्या माध्यमातून सर्व ‘मागेल त्याला’ अशा स्वरूपातील योजनांमध्ये लॉटरी पद्धत बंद झाली पाहिजे. अर्ज केलेल्या पात्र शेतकऱ्याला लाभ मिळाला पाहिजे. त्याचवेळी शासनाचा ‘मागेल त्याला’ लाभ देण्याचा उद्देश यशस्वी होईल. मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला ठिबक सिंचन संच अशा योजनांचा अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला लाभ देण्यात यावा. त्यासाठी अर्ज प्रक्रिया कमी …
Read More »मंत्री पदावरून आमदारांनी घातला मुख्यमंत्री शिंदेंना वर्षावर घेरावः इकडे अधिकारी मात्र ताटकळत रायगडचा पालकमंत्री भरत शेठ, अध्यक्ष पद नकोय मंत्री पद हवय आमदारांनी धरला हट्ट
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्याच काकाच्या अर्थात पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विरोधात बंड पुकारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांमध्ये एकच खळबळ उडालेली असताना आज मुख्यमंत्री शिंदे हे महत्वाच्या बैठकांसाठी मंत्रालयात निघाले. मात्र त्यांच्याच गटातील आमदारांनी मंत्री पदाच्या …
Read More »राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षपूर्तीचे गिफ्टः वेतनासोबत मिळणार महागाई भत्ता महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ
राज्य सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. हा महागाई भत्ता ३८ टक्क्यांवरून ४२ टक्के करण्यात आला आहे. १ जानेवारी २०२३ पासून ही वाढ होणार आहे. राज्य सरकारच्या वर्षपुर्तीनिमित्त सरकारी कर्मचा-यांना सरकारने गिफ्ट दिले आहे. राज्य सरकारी कर्मचा-यांना १ जानेवारी २०२३ पासून सातव्या वेतन आयोगानुसार हा महागाईभत्ता …
Read More »