Breaking News

Tag Archives: उत्तर प्रदेश

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार रामसिंगची कोठी असलेल्या जागेचे अधिग्रहण करणार

आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या रामसिंगच्या कोठीत ठेवण्यात आले होते ती सध्याच्या मीनाबाजार भागातील जागा महाराष्ट्र सरकार अधिग्रहित करणार असून तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्रा येथे केली. यासंदर्भात आपण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही यावेळी …

Read More »

लालूप्रसाद यादव यांची टीका, महाकुंभ फालतू …काही अर्थ नाही दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू

१४४ वर्षानंतर महाकुंभ मेळावा आल्याचे सांगत आणि हा महाकुंभ महिनाभर चालणार असल्याचा प्रचार उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारने देशभरात मोठ्या प्रमाणावर केला. या महाकुंभबद्दल आस्था निर्माण व्हावी याकरिता मोठमोठ्या राजकीय नेत्यांना आणि त्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक भाजपाशासित राज्याचे …

Read More »

चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवरून प्रकाश आंबेडकर यांचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सवाल महाकुंभातील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची संख्या १००० हून अधिक !

महाकुंभातील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची संख्या १००० पेक्षा जास्त आहे आणि काही मृत भाविकांची वाहने अजूनही अनेक दिवसांपासून पार्किंगमध्ये पडून आहेत, कदाचित योगी आदित्यनाथ आणि त्यांचे प्रशासन ही वाहने लपवायला विसरले असतील असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट द्वारे विचारला आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर …

Read More »

चेंगराचेंगरीत मृत पावलेल्यांच्या प्रती श्रद्धांजलीः मुख्यमंत्री योगी म्हणाले परिस्थिती नियंत्रणात स्थगित केलेले शाही स्नान दुपारी २.३० वाजता सुरु

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यादरम्यान संगममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीसारख्या घटनेनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रियजनांना गमावलेल्यांप्रती शोक व्यक्त केला. जखमींच्या लवकर बरे होण्याची इच्छा व्यक्त करताना, पंतप्रधान मोदी म्हणाले की स्थानिक प्रशासन पीडितांना मदत करण्यात गुंतले आहे. काही काळापूर्वी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की परिस्थिती नियंत्रणात आहे आणि काही …

Read More »

महाकुंभ मेळ्यात पहाटेच्यावेळी चेंगराचेंगरीची घटना, १५ जण मृत्यूः संख्या वाढण्याची शक्यता मध्यरात्री १ ते २ वाजण्याच्या सुमारास शाही स्थानासाठी उडालेल्या झुंबडमुळे चेंगराचेंगरी

बुधवारी (२९ जानेवारी २०२५) पहाटे महाकुंभाच्या संगम परिसरात मौनी अमावस्येनिमित्त पवित्र स्नान करण्यासाठी कोट्यवधी यात्रेकरू जागेसाठी धावपळ करत असताना चेंगराचेंगरी झाली आणि त्यात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली. सध्या उत्तर प्रदेश सरकारकडून १५ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असून ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. चेंगराचेंगरीत उत्तर प्रदेश सरकारने …

Read More »

उत्तर प्रदेशातील मायवतींच्या पुतळा उभारणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्व निर्णय निवडणूक आयोगाचे नियम सर्वांनी पाळा

२००७ ते २०१२ दरम्यान उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती, त्यांचे गुरु कांशीराम आणि बहुजन समाज पक्षाचे (बसपा) चिन्ह असलेले हत्ती यांचे पुतळे लखनौ आणि नोएडा येथील उद्यानांमध्ये करदात्यांच्या पैशाने बांधल्याबद्दल २००९ मध्ये दाखल केलेल्या जनहित याचिकेचा सर्वोच्च न्यायालयाने १५ जानेवारी रोजी निकाल दिला. न्या. बी. व्ही. नागरत्न आणि सतीश चंद्र …

Read More »

संभल मस्जिदप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची त्या नोटीसीला स्थगिती विहिरीबाबत जारी केलेल्या नोटीशीला स्थगिती दिली

उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील शाही जामा मशिदीजवळील विहिरीवर पूजा किंवा पवित्र स्नान होणार नाही कारण शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक नगरपालिका अधिकाऱ्यांनी विहिरीबाबत जारी केलेल्या ‘नोटीस’च्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आणि दोन आठवड्यांत स्थिती अहवाल मागितला. उत्तर प्रदेश सरकारने विहीर सरकारी जमिनीवर असल्याचा युक्तिवाद केला असला तरी ही नोटीस स्थगित करण्यात आली. …

Read More »

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते केन बेतवा राष्ट्रीय नदी जोड प्रकल्पाची पायाभरणी वाघांच्या जंगलातून जात धरणाचे काम, काँग्रेसची टीका

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (२५ डिसेंबर) केन-बेतवा रिव्हर लिंकिंग राष्ट्रीय प्रकल्पाची पायाभरणी केली. या प्रकल्पामुळे पन्ना व्याघ्र प्रकल्पाला धोका असल्याचे सांगत काँग्रेसने पंतप्रधानांवर टीका केली. केबीएलबी KBLP ने केन नदीचे पाणी यमुनेच्या दोन्ही उपनद्या बेतवा नदीत सोडण्यात येणार असल्याची कल्पना केली …

Read More »

आंदोलक विद्यार्थी ठामः उत्तर प्रदेश सरकारची एका दिवसात परिक्षा घेण्याची तयारी प्रांतीय परिक्षा एका दिवसात घेण्यास तयार

उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी उमेदवारांनी प्रयागराजमध्ये केलेला निदर्शने गुरुवारी चौथ्या दिवशीही करण्यात आली. अखेर उत्तर प्रदेश राज्य सरकारने जाहीर केले की, ते प्रांतीय नागरी सेवा परीक्षा (पीसीएस) प्राथमिक परीक्षा एकाच वेळी एकाच दिवशी घेणार आहेत – मुख्य मागण्यांपैकी एक आंदोलक उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्तक्षेपानंतर हे पाऊल …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनही बटेंगे… चा पुढचा नारा “एक है तो सेफ है” धुळ्याच्या प्रचार सभेत दिला नारा

राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराच्या निमित्ताने भाजपाचे नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा आणि महायुतीच्या प्रचाराला आजपासून सुरुवात केली. परंतु धुळ्यातील पहिल्याच जाहिरसभेत बोलताना नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगेचा नारा देत पुन्हा एकदा हिंदू मतांचे धुव्रीकरणाच्या धर्तीवर पुढचा नारा देत एक …

Read More »