Breaking News

मंदिराचे ट्रस्टी आता समर्थ रामदास तर योगी आदित्यनाथ छत्रपती शिवाजी महाराज ?

तसेही देशात हिंदूत्ववादी राजकारणाला देशातील आणि विशेषत पुरोगामी महाराष्ट्रातील जनतेने स्विकारण्यास सुरुवात केली आहे. तसे उत्तर भारतातील केवळ भगव्या कपनीने स्वतःला विद्वान (?) समजणाऱ्यांची संख्या वाढीस लागली आहे. त्यामुळे उत्तर भारतातील अनेक कथित भगवी कपनी धारण करणाऱ्यांना महाराष्ट्राचा आणि देशाच्या इतिहासाचा नव्याने शोध लावण्याचा प्रकार सर्रास सुरु झाला आहे. पुणे येथील आळंदी येथे राम मंदिराचे ट्रस्टी असलेले गोविंद गिरी महाराज नामक व्यक्तीच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नरेंद्र मोदी यांना शिवाजी महाराजाची उपमा दिली म्हणून गोविंद गिरी महाराजाला चक्क समर्थ रामदास स्वामीची उपमा देत महाराष्ट्राचा इतिहासच बदल्याण्याचा घाट भाजपावाल्यांकडून सुरु करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

त्याचबरोबर महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सुपुत्र तसेच स्वराज्याचे वारसदार छत्रपती संभाजी महाराज हेच वेगळे राजेशाही मुकुट वापरत होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजेशाही मुकूट आतापर्यंत कधीच कोणत्याच राजकिय नेत्याला जाहिर कार्यक्रमात सन्मानार्थ देण्यात आला नाही. मात्र इतकेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना शिवकालीन सरदाराची टोपीच सन्मानार्थ सातारच्या राजघराण्याने दिली.

तसेच महाराष्ट्राच्या इतिहासात समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे कधीच गुरू नव्हते याबाबत मराठेशाहीच्या अभ्याकांनी कधीच मान्य केले नाही. उलट शिवरायांचे खरे गुरू हे संत तुकाराम महाराज असल्याचे अनेकवेळा पुराव्यानिशी सिध्द झालेले आहे. तरीही भाजपाच्या संघ शाखेत वैचारीक बौध्दीके घेतलेल्या तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी तर अनेकवेळा चुकीची वक्तव्य केली. त्यावर प्रसारमाध्यमांसह अनेक राजकिय नेत्यांकडून टीकास्त्र सोडल्यानंतर अखेर भगतसिंग कोश्यारी यांनी आपली वक्तव्य मागे घेतली.

परंतु राज्यघटनेतील कायदेशीर पदांचा दुरुपयोग करत खोटा इतिहास घुसडण्याचे काम सध्या मोठ्या प्रमाणावर भाजपा समर्थकांकडून सुरु असल्याचे दिसून येत आहे. त्यात आता राम मंदिराचे ट्रस्टी गोविंद गिरी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जाहिर वक्तव्यामुळे दिसून येत आहे.

त्यातच योगी आदित्य नाथ यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या वधाची आठवण सांगत औरंगजेब यांनी जेव्हा छत्रपती संभाजी महाराज यांना हालहाल करून मारले. त्यावेळी औरंगजेबाचे वंशच अर्थात (मुस्लिम समाज) कोणी पहायाला गेले नव्हते असे आणखी एक वादग्रस्त वक्तव्यही योगी आदित्यनाथ यांनी केले.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *