Breaking News

ऐन दिवाळीच्या धामधुमीत बारामतीत शरद पवार-अजित पवार आणि दिल्लीत ?

राज्यातील राजकिय वजनदार घराणं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवार कुटुंबात सध्या काय सुरु आहे याची भणकच विविध राजकिय पंडितांना लागत नाही. त्यातच नुकतेच डेंग्युचा आजार झाल्याने अजित पवार हे राजकियदृष्ट्या सक्रिय राहण्याऐवजी घरीच आराम करणे सध्या पसंत केले आहे. मात्र दोनच दिवसांपूर्वी तब्येत बरी होत असल्याचे ट्विट करत पुढील काही दिवस पवार कुटुंबियांच्या स्नेहमेळाव्यासह कोणत्याच कार्यक्रमाला हजर राहणार नसल्याचे स्पष्ट केले.

त्या ट्विटला ४८ तास पूर्ण होत नाहीत तोच अजित पवार यांनी दरवर्षी पवार कुटुंबियांच्या झालेल्या कौंटुबिक स्नेह मेळाव्याला आज उपस्थित राहिले. या मेळाव्या दरम्यान अजित पवार हे त्यांच्या कुटुंबियातील सर्व सदस्यांना भेटून झाल्यानंतर काही काळ शरद पवार यांच्याशी गुप्त बैठक केली. त्या बैठकीत दोन्ही पवार काका-पुतण्या यांची सविस्तर चर्चा झाल्याची माहिती राजकिय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.

या दोघांच्या भेटीला काही कालावधी लोटत नाही तोच अजित पवार यांना दिल्लीहून अमित शाह यांच्या भेटीचा निरोप आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यानंतर अजित पवार हे नवी दिल्लीला अमित शाह यांच्या भेटीसाठी गेल्याची माहिती पुढे येत आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्या हाती पहिल्यांदाच पुणे येथून विमानतळावरून जाताना काळ्या रंगाची एक छोटीशी बॅग बाळगताना दिसल्याने अनेक तर्क वितर्कांना उधाण आले आहे.

त्यामुळे अजित पवार हे एकाबाजूला आजारी असल्याचे सांगत कोणत्याच कार्यक्रमाला हजर राहणार असल्याचे स्वतःच जाहिर करतात तर दुसऱ्याबाजूला सर्व कार्यक्रमाला हजेरी लावत असल्याने आणि पुणे ते दिल्ली असा विमान प्रवासही करत असल्याची माहिती पुढे येत असल्याने त्यांचा आजार हा खराच शाररीक आहे की राजकिय आहे यावरून राजकिय वर्तुळात चांगलीच चर्चिली जात आहे.

यासंदर्भात सुप्रिया सुळे यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले असता त्या म्हणाल्या की, दिवाळीच्या कालावधीत पवार कुटुंबियांचा स्नेह मेळावा दरवर्षी आयोजित केला जातो. या कार्यक्रमाला सगळे कुटुंबिय हजर असतात असे स्पष्ट केले. त्याचबरोबर शरद पवार हे सर्वांना भेटतात. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार हे भेटले ही काही राजकिय भेट नव्हती असे सांगितले.

तसेच अजित पवार यांच्या आजारपणाबद्दल बोलत असताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित दादा यांना डेंग्यु झाला होता. पण त्यातून आता बरे होत आहेत. डॉक्टरांचे रिपोर्टस आले आहेत. पण आता त्यांना पोस्ट डेंग्यु झाला असून त्याच्यावर उपचार सुरु असल्याचेही यावेळी सांगितले.

Check Also

ईव्हीएम मशिन्स बनविणाऱ्या कंपनीच्या संचालक मंडळावरच भाजपाचे पदाधिकारी नियुक्त

मागील काही दिवसांपासून चंदिगढ येथील महानगरपालिकेच्या निवडणूकीत भाजपा विचाराच्या निवडणूक अधिकाऱ्याने स्वतःच मतपत्रिकेवर खानाखुणा करत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *