Breaking News

उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांची सुखरूप सुटका नितीन गडकरी यांनी मानले सर्व टीमचे आभार

देशातील उत्तराखंड राज्यातील हिमालय रांगेतील डोंगराळ भागातील सर्वात मोठ्या उत्तरकाशी (डोंगर पोखरून) बोगद्याचे काम सुरु असताना अचानकपणे डोंगराचा काही भाग कोसळल्याने ४१ कामगार अडकले होते. जवळपास आठवडाभरानंतर या अडकलेल्या ४१ आमदारांना सुखरूप बाहेर काढण्यात विविध यंत्रणांच्या मदतीमुळे यश आल्याची माहिती केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज बुधवारी रात्री ट्विट वरून दिली.

उत्तरकाशी बोगद्याचे काम सुरु असताना बोगद्याच्या वरील बाजूस असलेल्या डोंगराची माती कोसळली. त्यामुळे डोंगराचे कामकाज ठप्प झाले. तसेच पुढच्या भागात काम करणारे ४१ कामगार आणि इतर कामगारांध्ये मातीच्या ढीकाऱ्यामुळे एकप्रकारचा मोठा अडथळा निर्माण झाला. या अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी इतर कामगारांच्या मदतीने आणि यंत्रसामग्रीच्या सहाय्याने प्रयत्न करण्यास सुरुवात केली. परंतु या कामगारांची सुटका करता आली नाही.

हे ही वाचा-ः

उत्तरकाशी बोगद्यात अद्यापही ४१ कामगार अडकलेलेच

त्यानंतर डोंगराच्या वरील बाजूने खोदकाम करण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले. कामगारांच्या सुटकेसाठी परदेशातील काही तज्ञांनाही पाचारण करण्यात आले. अखेर एका डोंगरावरून प्लास्टीकच्या सहाय्याने ड्रिल करून कामगारांपर्यंत पोहचण्यात सुटका करणाऱ्या चमूला आज यश आले. त्यामुळे या कामगारांची सुटका करण्यात यश आल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपाचे अनेक मोठे नेते गुजरातमधील सामन्याचा आनंद घेण्यात मग्न होते. तर भाजपाचेच केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी मात्र कामगारांच्या सुटकेसाठी उत्तराखंड येथील उत्तरकाशी बोगद्याजवळ ठाण मांडून बसले होते.

तसेच अन्नपान्यावाचून बोगद्यात अडकलेल्या कामगारांपर्यंत खाण्या-पिण्याच्या वस्तु आणि योग्य ते औषधोपचार पोहचविण्यास सुटका करणाऱ्या पथकाला यश मिळाले. मात्र या बोगद्याचे काम ज्या कंपनीला देण्यात आले होते. त्या कंपनीने कामगारांसाठी आवश्यक असलेल्या सुरक्षाविषयक गोष्टींना फाटा देत बोगद्याचे काम सुरु केल्याची माहिती पुढे आली आहे.

४१ कामगारांची सुटका झाल्यानंतर नितीन गडकरी यांनी सर्व सुटका करणाऱ्या पथकांचे आणि मदत करणाऱ्या संस्थांचे ट्विटरवरून आभार मानले आहेत.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *