उत्तराखंड येथील उत्तरकाशी जिल्ह्यातील बोगदा कोसळून झालेल्या दुर्घटनेत शर्तीचे प्रयत्न करूनही अद्याप ४१ जण अडकल्याची माहिती पुढे येत आहे. विशेष म्हणजे या बोगद्यात अडकलेल्या कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने तणावग्रस्त अशा ऑस्ट्रेलियातील तज्ञांना पाचारण केले. तसेच या बोगद्यातून कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाचे माजी सल्लागार भास्कर कुलबे यांची केंद्र सरकारने नियुक्ती केली.
मागील ४-५ दिवसांपासून प्रशासनाकडून सुटकेसाठी सातत्याने प्रशासनाकडून आश्वासन देण्यात येत आहे. दरम्यान, कामगारांच्या सुटकेसाठी डोंगराळात भागात कशा पध्दतीने खोदकाम करायचे यासाठी ऑस्ट्रेलियातील एका तज्ञ व्यक्तीला पाचारण करण्यात आले होते. त्या तज्ञानेनीही बोगद्याचा परिसर पाहून घेतल्याचे माहिती पुढे आली आहे.
उत्तराखंड मधील उत्तरकाशी येथे सुरु असलेल्या बोगद्याचे खोदकाम सुरु होते. बोगदाच कोसळून दुर्घटना घडली. सुरुवातीलाही सरकारकडून बोगद्यात ४० कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र नंतर ४१ जण अडकल्याची माहिती पुढे आली. बोगदाच कोसळून पडल्याने अडकलेल्या कामकारांना बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाला. त्यामुळे जमीनीच्या वरून पुन्हा कामगारांच्या सुटकेसाठी वरून खोदकाम करण्याचा निर्णय सरकारने घेतला.
मात्र जमिनीच्या वरूण खोदकाम करून कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी जेसीबी मशिन मागविण्यात आली. परंतु त्या मशिनकडून जमिनीवरून बोगद्याच्या नेमक्या कोणत्या बाजूने खोदकाम करायचे यावर एकमत न झाल्याने दिवसभर कामगारांच्या सुटकेसाठी प्रयत्न करता आले नसल्याची माहिती भास्कर कुलबे यांनी दिली.
भास्कर कुलबे म्हणाले की, बोगद्याच्या वरील बाजूस चारीबाजूने डोंगरदऱ्यांचा भाग आहे. तसेच बोगद्याचा दुसऱ्या भागात बारकोट येथेही असेच डोंगर आहेत आणि बोगद्याच्या आतील भाग अजून अंडर कंस्ट्रक्शन आहे. त्यामुळे डोंगरातूनच ड्रिल बोगद्यात मारण्याबाबत तंज्ञांचे एकमत झाले आहे. त्यानुसार सिल्कयारा या भागातून बोगद्याच्या दक्षिण बाजूस खोदकाम करून कामगारांच्या सुटकेसाठी प्रयत्न करण्याच्या पर्यायवर एकमत झाल्याचे सांगत यात आणखी कालावधी जाऊ शकतो अशी शक्यताही वर्तविली.
मृत्युजय कुमार बिहारमधून आलेला कर्मचारी म्हणाला की, सात दिवस हा काही कमी कालावधी नाही. पण आत अडकलेले कर्मचारी आणखी किती दिवस ड्रायफ्रुट जपून खातील याबाबत सांगता येत नाही. कामगारांच्या सुटकेसाठी सातत्याने एक पर्याय संपला की, दुसऱ्या पर्यायाचा वापर केला जातो. याचा काही शेवट होईल असे वाटत नाही. दरम्यान, प्रशासनाकडून अडकलेल्या कामगारांच्या नातेवाईकांना कामगारांच्या सुटकेसाठी सहकार्य करा अशी विनंती करण्यात येत आहे. मात्र येथील जमलेल्या गर्दी किती दिवस धरेल असे सांगत धैर्य धरणाऱ्यांची संख्याही आता घटत चालली आहे असे सांगितले.