Breaking News

ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांचा गौप्यस्फोट, शेतकरी आंदोलनाच्या… मोदी सरकारचा ट्विटरवर दबाव मोदी सरकारवर गंभीर आरोपः मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल

शेतकरी विरोधी नव्या तीन कायद्याच्या विरोधात संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्या कायद्याच्या विरोधात विरोधात आंदोलन पुकारले. मात्र १४ ऑक्टोंबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ कालवधीत आंदोलन करण्यात आले. अखेर मोदी सरकारने शेतकऱ्याच्या आंदोलनासमोर माघार घेत ते तीन शेतकऱी विरोधी तीन कायदे मागे घेण्याचा निर्णय जाहिर केला. त्यास जवळपास दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी या आंदोलनाच्या बातम्या दाबण्यासाठी मोदी सरकारकडून ट्विटरवर दबाव टाकण्यात येत होता गंभीर आरोप करत गौप्यस्फोट नुकतेच एका दूरचित्रवाणी वाहिनीला मुलाखत देताना केला. त्यामुळे शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील होते या चर्चेला एकप्रकारे पुष्टी मिळत आहे.

अमेरिकेतील ब्रेकिंग पाँईट या यु ट्युब चॅनेलच्या सागर इजेंटी आणि क्रस्टल द्वियींनी घेतलेल्या मुलाखती दरम्यान ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांनी गौप्यस्फोट केला.

शेतकरी आंदोलनात जवळपास ६५० हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तसेच या शेतकऱी आंदोलनाला मोदी सरकारकडून कधी खलिस्तानी आंदोलक म्हणून हिणवण्यात आले. तर कधी फक्त मोदी विरोधक म्हणून तर कधी दलालांच्या हस्तकांमार्फत चालविण्यात आलेले आंदोलन अशी संभावनाही करण्यात आली. या सगळ्या पार्श्वभूमीवर जॅक डोर्सी यांनी केलेल्या गौप्यस्फोटा वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे.

जॅक डोर्सी यांनी दिलेल्या मुलाखतीचा फक्त १ मिनिट ७ सेंकदाचा व्हिडीओ व्हायरल झालेला आहे. या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलनाच्या बातम्या आणि मोदी सरकारच्या विरोधातील बातम्या दडपण्यासाठी मोदी सरकारकडून कशा पध्दतीने ट्विटरवर दबाव आणला जात होतो. याविषयीची माहिती जॅक डोर्सी यांने दिली.

दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल होताच देशभरातील प्रमुख राजकिय पक्षांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडत हा फक्त ट्विटरवरील दबाव नसून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचा प्रकार असून लोकशाही प्रणालीवरील हल्ला असल्याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *