Breaking News

योगेंद्र यादव नितीश कुमार यांना म्हणाले, गुरूबंधू म्हणून आम्हाला लाज वाटते…

बिहारमधील मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडून सातत्याने राजकिय जोडीदार बदलत राज्याच्या मुख्यमंत्री पदाची खुर्ची स्वतःकडेच कशी राहिल यासाठी प्रयत्न सातत्याने आघाड्या बदलत आहेत. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ राजकिय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी नितीशकुमार यांच्या गुरूजी आठवण करून देत या सगळ्या आघाड्या बदल्याची आज गुरूबंधू म्हणून लाज वाटत असल्याचा खोचक टोला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना लगावला.

आज सकाळी काँग्रेस, राष्ट्रीय जनता दलाच्या पाठिंब्यावर बिहारच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झालेल्या नितीशकुमार यांनी मुख्यमंत्री पदासह सरकारचा राजीनामा दिला. १७-१८ महिन्यापूर्वी भाजपापासून फारकत घेतलेल्या नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा महागंठबंधन पासून यु टर्न घेत पुन्हा एकदा भाजपा आघाडीत सहभागी होत पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची खुर्ची जवळ केली. त्यावर जेष्ठ विश्लेषक योगेंद्र यादव यांनी त्यांच्या आणि नितीशकुमार यांच्या राजकिय गुरूच्या विचारांची आठवण करून देत गुरूबंधू म्हणून लाज वाटत असल्याचे सांगत खुर्चीसाठी इतका मोह धरल्याबद्दल तुम्हाला लाज वाटत नाही का असा खडा सवालही उपस्थित केला. एक्स या मायक्रो ब्लॉगिंग साईटवर यासंदर्भातील व्हिडिओ पोस्ट करत हा सवाल केला.

योगेंद्र यादव बोलताना व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हणाले की, किशन पटनायक तुम्हाला आठवतात का जे तुमचे आणि माझे राजकिय गुरु होते. राजकारणाचे धडे तुम्ही त्यांच्याच हाती घेतले. तुम्ही जसे घेतलात तसे मीही गिरवले. त्यांनी त्यांच्या जीवनात कधीही खुर्चीसाठी कधीही तडजोडी स्विकारल्या नाहीत, की केल्या नाहीत. त्यांना अनेक संधी चालून येत होत्या. पण त्यांनी अनेक संधीना नाकारले.

योगेंद्र यादव पुढे म्हणाले की, तुम्हाला आठवत असेल की अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात तुम्ही रेल्वेमंत्री होता. त्यावेळी माझ्याकडे येण्याचे निमंत्रण दिले तेव्हा तुम्ही सर्व सरकारी लवाजमा आणि तामझाम सोडून अगदी साधेपणाने माझ्या घरी आलात. त्यानंतर तुम्ही बिहारचे मुख्यमंत्री झालात. त्यावेळी मी तुम्ही पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून यावे अशी भूमिका मी मांडली. त्यावेळी तुमचे समर्थन करताना बिहारमधील जंगराजला अटकाव करण्यात आणि तेथील रस्ते चांगले केल्याचे दिसून आले होते. मी तुमचे समर्थन केले म्हणून त्यावेळी अनेकांनी माझ्यावर टीका केली. पण मी माझ्या भूमिकेवर ठाम राहिल्याची आठवणही करून दिली.

पुढे बोलताना योगेंद्र यादव म्हणाले की, परंतु फक्त मुख्यमंत्री पदाची खुर्ची टिकविण्यासाठी कधी इंडिया आघाडीशी तर कधी भाजपाच्या एनडीएसोबत जात आहात. तुमच्या सततच्या या भूमिकेमुळे तुम्ही तुमची विश्वासार्हता कमी होत आहे. तरीही तुम्हाला खुर्चीचा मोह सुटत नाही. त्यामुळे आम्हाला गुरुबंधू म्हणून तुमची लाज वाटतेय तुम्हाला वाटतेय का असा खोचक सवालही या व्हिडिओच्या माध्यमातून नितीशकुमार यांना केला.

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका भटकती आत्मा…शरद पवार म्हणाले, ते खरंय

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहराबरोबरच, बारामती आणि शिरूर मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *