Breaking News

उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, जीनाच्या थडग्यावर डोकं टेकविणारे नेते चालतात….

काल कोकणच्या दौऱ्यात माझ्या सोबत काही मुस्लिम आले. या माझ्या भारतात राहणाऱ्या मुस्लिमांनी मला त्यांचा मराठी भाषेतील कुराण हा ग्रंथ दिला. पण लगेच काहीजण म्हणतील की, यांनी हिंदूत्व सोडलं. पण अद्याप मी पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाचा केक कापून खाल्ला नाही की, देशाची फाळणी करणाऱ्या जीनाच्या थडग्यावर जाऊन डोकं टेकवलं नाही. आणि कधी मी तरी जाणार नाही. हे असले नेते चालतात पण त्यांवर कुणी प्रश्न उपस्थित करायचं नाही नाही आणि मी त्यांच्या थोतांडाचा बुरखा फाडायला आलोय असा इशारा असा हल्लाबोल शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर चढविला.

कोकणातील माणगांव येथे आज जनसंवाद यात्रा आज पोहोचली. त्यावेळी उपस्थित शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता टीका केली.

उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले, माझ्या देशात राहणारा कोणत्याही जाती-धर्माचा आणि पंथाचा असो. पण माझ्यावर देशवर प्रेम करणारा व्यक्ती असेल आणि तो सोबत येत असेल तर मी त्याला सोबत घेणार आहे. मात्र त्यांच्याकडून ज्याला ते मित्र म्हणतील त्याला मित्र म्हणायचे आणि ते ज्याला म्हणतील त्याला हिंदूत्व सोडलेला म्हणायचे. परवा इंडिया आघाडीतून टून करून भाजपा सोबत गेलेले बिहारचे नितीश कुमार म्हणाले की, संघमुक्त अर्थात राष्ट्रीय स्वंयसेवक संघ नको असे म्हणणारे हे काय कडवट हिंदूत्ववादी आहेत का पण लगेच सोबत आला म्हणून त्याला पाठिंबा दिला. त्याच्याबाबत प्रश्न विचारायचे नाहीत असल्या गोष्टी चालणार नाहीत. असे सांगत हा देश वाचविण्यासाठी जे जे सोबत येतील त्या सर्वांना देश आणि देशाची लोकशाही वाचविण्याठी सोबत येतील त्यांना घेणार असल्याची सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी इशाराही यावेळी दिला.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, भगतगीता पुस्तकातील संदर्भ देताना म्हणाले की, कुरुक्षेत्रावर जेव्हा आपल्याच नात्यातील लोकांना समोर पाह्यले त्यावेळी त्यास प्रश्न पडला की समोर तर माझेच नातेवाईक आणि आप्तेष्ट आहेत. आणि मी त्यांच्यावर शस्त्र कसा उगारू. त्यावेळी श्रीकृष्ण म्हणाला की, जेव्हा धर्म आणि अधर्माच्या यांच्यात युध्द होते. त्यावेळी अधर्माच्या बाजूनं जरी आपले नातेवाईक, घरातील व्यक्ती असतील त्यांना आपण दुश्मन मानायचे आणि त्यांचा वध करायचा असतो असे सांगितले. त्यानुसार या देशाचे अस्तित्व आणि लोकशाही टीकविण्यासाठी धर्माच्या रक्षणासाठी लढायचे आहे. आणि ते जर धर्माच्या नावाखाली अधर्म्यांना सोबत घेऊन येत असतील त्यांचा वध हा आपले असले तरी त्यांचा वध करावा लागणार आहे.

Check Also

ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील तरूणाईशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील अव्वल ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील गेमरशी संवाद साधला. मात्र यागेमर्सनी पंतप्रधान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *