Breaking News

पवार यांच्या आरोपावर देवेंद्र फडणवीस प्रत्युत्तर, शरद पवार, चिडलेले, नाराज आहेत…. मोठे नेते आहेत त्यांना उत्तर देणार नाही

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून जालन्यात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामध्ये ५० हून अधिक निष्पाप नागरिक जखमी झाले आणि त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणावरून विविध राजकिय पक्षांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करत या घटनेवरून जबाबदार धरण्यात येत आहे.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, शरद पवार हे मुख्यमंत्री असताना गोवारी हत्यांकाड झाले. त्यावेळी ११३ गोवारी लोकांचे बळी गेले. त्यावेळी ते बघायलाही गेले नाहीत, आणि त्यांनी राजीनामा ही दिला नाही. कदाचित शरद पवार यांच्या जवळचेच लोक आमच्यासोबत सरकारमध्ये आले. त्यामुळे ते फार नाराज आहेत, चिडलेले आहेत. मी त्यांना उत्तर देणार नाही कारण ते मोठे नेते आहेत असा प्रत्युत्तर दिले.

विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी अशा पध्दतीचे वक्तव्य करत शरद पवार हे मुख्यमंत्री असताना त्यांनी गोवारी हत्याकांडाचा मुद्दा पुढे करत स्वत:ची या घटनेच्या जबाबदारीतून सुटका करण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्यावेळी शरद पवार यांनी जबाबदारी पार पाडली नाही म्हणून मी ही जखमी झालेल्या आंदोलनकर्त्यांना भेटायला जाणार नाही त्यांच्यावरील लाठीचार्जप्रकरणी राजीनामा देणार नाही असे एकप्रकारे देवेंद्र फडणवीस यांना सांगायचे आहे का असा सवाल या निमित्ताने जनतेतून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

दरम्यान शरद पवार यांनी जालना येथील पत्रकार परिषदेत बोलताना गोवारी हत्याकांडाच्या प्रश्नी बोलताना म्हणाले की, गोवारी हत्याकांडाचा प्रश्न हा आदीवासी विभागाशी संबधित होता. त्यामुळे ती घटना घडल्यानंतर त्यावेळचे आदिवासी मंत्री मधुकर पिचड यांनी राजीनामा दिला होता. त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो. हवे तर मधुकर पिचड यांना विचारा असेही शरद पवार म्हणाले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *