Breaking News

संविधान दिन ऑनलाईन इव्हेंट सांसदीय कार्यमंत्रालयाचे आवाहनः फोटो काढा अन् अपलोड करा

देशात २०१४ साली भाजपाप्रणित नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सातत्याने भाजपा आणि केंद्र सरकारकडून फोटो काढा आणि त्यांनी दिलेल्या संकेतस्थळाच्या लिंकवर नागरिकांनी फोटो काढून पाठवा असे आवाहन करण्यात आले. मात्र यावर्षी ७३ व्या संविधान दिनाचे औचित्य साधत २६ जानेवारी रोजीचा संविधान दिनीही ऑनलाईन इव्हेंट आयोजित करण्यात आला असून संविधानाची प्रस्तावना वाचतानाचा फोटो काढा आणि केंद्र सरकारशी संबधित वेबसाईटवर अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यापूर्वी भाजपा आणि पंतप्रधान कार्यालयाकडून स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत हर घर तिरंगा, मेरी माटी मेरा देश या नुकत्याच ऑनलाईन इव्हेंटनंतर आयोजित केंद्राच्या संसदीय कार्य मंत्रालयाकडून संविधान दिनादिवशी ऑनलाईन इव्हेंट आयोजित करण्यात आला आहे. यापूर्वी भाजपाच्या स्थापना दिनीही भाजपाकडून अशाच पध्दतीचा इव्हेंट आयोजित करण्यात आला होता.

सांसदीय कार्य मंत्रालयाने संविधान दिनाचे औचित्य साधत प्रत्येक भारतीय नागरिकाने, तरूणाने, राज्य घटनेची प्रस्तावना वाचतानाचा फोटो काढावा आणि तो #SamvidhanDiwas या हॅशटॅगचा वापर करून @mpa_India या ट्विटवरला टॅग करावा असे आवाहन ही सांसदीय कार्य मंत्रालयाने केले.

तसेच https/:constituationquiz.nic.in https//:readpreamble.nic.in या संकेतस्थळावरून या अभियानात सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र मिळवा असे आवाहनही केले.

Check Also

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्रासाठी मागितल्या या गोष्टी, पण पंतप्रधान मोदींकडून साधा उल्लेखही नाही

स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेस विसर्जित करावी असा सल्ला महात्मा गांधींनी दिला होता. त्यानुसार काँग्रेस विसर्जित झाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *