Breaking News

विभक्त पतीच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर सुषमा अंधारे म्हणाल्या, ते हितचिंतक आणि…

शिवसेनेची-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि पक्षप्रवेशानंतर अल्पावधीतच ठाकरे गटात स्वत:ची जागा निर्माण करणाऱ्या सुषमा अंधारे यांनी अल्पावधीतच आपली ओळख निर्माण केली. सुषमा अंधारे सातत्याने शिंदे गटातील आमदार आणि नेते यांच्यावर टीका करत असतात. तसेच त्यांनी सुरु केलेल्या प्रबोधन यात्रेत सुरु केलेल्या टीकेमुळे शिंदे गटाची चांगलीच राजकिय कोंडी होत असल्याचे दिसून येऊ लागले. यापार्श्वभूमीवर आता सुषमा अंधारेंचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांना आपल्या गटात घेत शिंदे गटाने अंधारेंना मोठा झटका दिला.

मागील काही दिवसांपासून सुषमा अंधारे आणि शिंदे गटातील आमदार यांच्यात सतत शाब्दिक चकमक उडत आहे. त्यातच सुषमा अंधारेंचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे आज १३ नोव्हेंबर रोजी शिंदे गटात प्रवेश केला. तसेच, वैजनाथ वाघमारे यांना शिंदे गटात मोठं पदही दिलं जाणार असल्याची चर्चा आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारेंनी भाष्य केलं आहे. त्या पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होत्या.

यावेळी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, वैजनाथ वाघमारे आणि मी गेली चार-पाच वर्षे विभक्त राहत आहोत. व्यक्तिस्वातंत्र्याचा आपण आदर केला पाहिजे. वाघमारेंच्या पुढील कारकिर्दीला शुभेच्छा आहेत. त्यांनी काय निर्णय घ्यावा, कुठे जावं हा त्यांच्या वैयक्तिक प्रश्न आहे. वाघमारेंच्या प्रवेशाने माझे खच्चीकरण होणार नाही. मी माझं वेगळं आयुष्य जगत आहे असे स्पष्ट केले.

वाघमारेंच्या प्रवेशाने माझ्या आयुष्यावर परिणाम होईल, असं का मानावे. मी त्यांना मित्र किंवा हितचिंतक समजत नसल्याने शत्रूही मानत नाही. भविष्यात आरोप-प्रत्यारोप होतील, ते व्यक्तिगत अथवा कौटुंबिक पातळीवर न आणता राजकीय विषयावर असावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *