Breaking News

केसरकरांच्या त्या व्हिडिओवर सुप्रिया सुळे यांचा सवाल, या मंत्र्यांना झालंय तरी काय?

रविवारी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा शिक्षक भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारालाच भरती कधी होणार असा प्रश्न विचारला. त्यामुळे संतापलेल्या शिक्षण मंत्र्यांनी बेशिस्त शिक्षक आवडत नसल्याचे सांगत प्रश्नकर्त्या संभावित शिक्षक महिलेला डिसक्वालिफाय करण्याची धमकी दिल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडिओवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सवाल करत या मंत्र्यांना झालंय तरी काय? तसेच अशा धमकावण्याला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची मूकसंमती आहे का? असा सवालही केला.

शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर हे एका जाहिर कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी तेथे काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते. नेमके त्याचवेळी तेथे शिक्षक भरतीसाठी अर्ज केलेल्या महिला उमेदवाराने या संदर्भात थेट मुलाखत देणाऱ्या शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना थेट प्रश्न करत सर भरतीची प्रक्रिया कधी सुरु होणार असा सवाल केला. त्यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अहो तुम्हाला दिसत नाही का? माझी मुलाखत सुरु आहे. यापूर्वी तुम्ही अर्ज करण्यासाठीची वेबसाईट सुरू होत नाही म्हणून विचारत होतात. आता विचारताय भरती प्रक्रिया कधी सुरु होणार. मला बेशिस्त शिक्षण अजिबात आवडत नाहीत. तुम्हीच जर बेशिस्त असाल तर मुलांना काय शिकविणार अशी तंबी देत मी जितका प्रेमळ आहे तितकाच खडूस आहे. त्यामुळे तुमचे नाव सांगून डिसक्वालिफाय करायला लावेन अशा शब्दात शिक्षक उमेदवाराला दिली. दीपक केसरकर यांचा हा धमकी देतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला.

या व्हिडिओवरूनच सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत म्हणाल्या की, महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री शिक्षक भरतीबाबत विचारणा करणाऱ्या उमेदवार मुलीला ‘डिसक्वालिफाय’ करण्याची धमकी देतानाचा व्हिडिओ माध्यमातून प्रसिद्ध झाला आहे. हा व्हिडिओ पाहून ‘या मंत्र्यांना नेमकं झालंय तरी काय?’ असा प्रश्न पडतो.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, एक ज्येष्ठ मंत्रीमहोदय आजकाल जाहिर सभांतून जनतेला धमकावताना दिसतात. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना त्यांची भूमिका मान्य आहे की या तिघांचीही त्यांना मूक संमती आहे? या मंत्र्यांना नेमकी भीती कशाची आहे? त्यांच्या जे मनात आहे, तोच जनतेच्या दरबारात त्यांचा फैसला ठरलेला आहे. तोवर मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या मंत्र्यांना आवरावे, ही विनंती. यासोबतच दीपक केसरकर यांनी तातडीने संबंधित मुलीची जाहिर माफी मागितली पाहिजे अशी मागणीही केली.

Check Also

विजय वडेट्टीवार यांच्या आरोपाला उज्वल निकम यांचे प्रत्युत्तर, माझ्या पोतडीत….

कसाब किंवा आतंकवाद हा पाकिस्तानमधून पसरवलेला नाही, मुंबई हल्ल्यात पाकिस्तानने नाही, कसाबने निष्पाप लोकांचे बळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *