Breaking News

छत्रपतींविषयी अनुद्गार काढणारा छिंदम निवडणूकीत विजयी अहमदनगर महापालिका निवडणूकीत दोन हजार मतांची आघाडी

अहमदनगर : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अनुद्गार काढल्याने राज्यातील जनतेचा रोष ओढावलेल्या आणि तडीपारीची शिक्षा भोगत असलेला श्रीपाद छिंदम अहमदनगर महापालिकेच्या निवडणूकीत दोन हजार मतांनी विजयी झाला. शिवरायांबद्दल अनुद्गार काढल्यानंतरही अहमदनगर शहरवासियांनी त्याला स्विकारले हे विशेष आहे.

भाजपच्या तिकिटावर निवडून येवून शहराच्या उपमहापौर पदी विराजमान झालेल्या श्रीपाद छिंदम यांने छत्रपती शिवरायांविषयी अनुद्गार काढले होते. त्यामुळे सर्व राजकिय पक्षांनी त्याच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. तसेच राज्यातील जनतेत ही त्याच्याबद्दल रोष निर्माण झाला. त्यामुळे भाजपने त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली. तर राज्य सरकारने त्याच्यावर तडीपारीची कारवाईची केली.

परंतु अहमदनगर महापालिकेच्या निवडणूक जाहीर होताच वार्ड क्रमांक ९ मध्ये त्याने आपला उमेदवारी अर्ज भरला आणि या निव़डणूकीत भाजपचे उमेदवार प्रदीप परदेशीचा पराभव करत तब्बल दोन हजार मतांची आघाडी घेत विजय मिळविला.

Check Also

मेहबूबा मुफ्ती यांचे निवडणूक आयोगाला पत्रः कार्यकर्त्यांना अटक करण्याचे थांबवा

जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *