Breaking News

जेव्हा शिवसेनेचा तालिका अध्यक्ष सेनेच्याच आमदारांना परवानगी नाकारतो विरोधी पक्षनेते विखे-पाटील आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने पुन्हा बोलण्याची संधी

मुंबई : प्रतिनिधी

अर्थसंकल्पाच्या पुरवणी मागण्यावर विविध विभागांना वाटप करण्यात आलेल्या निधीच्या अनुषंगाने आमदारांकडून चर्चा  सुरु करण्यात आली.  यावेळी शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके हे निर्धारीत कालावधीपेक्षा जास्त बोलत असल्याचे कारण पुढे करत विधानसभेचे तालिका अध्यक्ष तथा शिवसेनेचे आमदार सुभाष साबणे यांनी नरके यांना मध्येच थांववित काँग्रेसच्या सदस्यास बोलण्यास सांगितल्याने शिवसेनेच्या सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे विधानसभेत शिवसेना विरूध्द शिवसेना असे चित्र पाह्यला मिळाले.

शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके हे बोलण्यास बोलत असताना साबणे यांनी वेळ संपत आल्याची आठवण करून दिली. मात्र नरके हे तसेच बोलत राहीले आणि फक्त कृषी विभागाच्या मागण्यावर बोलणार असल्याचे स्पष्ट केले. तरीही तालिका अध्यक्ष साबणे यांनी नरके यांना थांबवित काँग्रेसचे सुनिल केदारे यांना बोलण्यास सांगितले. त्यानुसार केदारे हे बोलण्यास उभे राहीले असता नरके यांनी ही बोलण्यास सुरुवात केली. त्यामुळे केदारे यांनी नेमके कोणी बोलावे याबाबत भूमिका स्पष्ट करण्याची सूचना केली.

त्यावर साबणे यांनी मध्येच पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना झालेल्या चर्चेवर थेट उत्तर देण्यास सांगितले. त्यामुळे शिवसेनेचे जयप्रकाश मुंदडा यांच्यासह अन्य शिवसेनेचे आमदार अध्यक्षासमोरील मोकळ्या जागेत धावून जात सदस्यांना बोलू द्या बोलू द्या अशी मागणी करू लागले. विशेष म्हणजे त्यावेळी सभागृहात उपस्थित असलेले शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू हे शांतपणे बसून होते. मात्र सार्वजनिक मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सदस्यांना बोलू देण्याची मागणी केली. तरीही मंत्री जानकर हे तसेच बोलत राहीले.

अखेर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी यात हस्तक्षेप करत इथे निवडूण येणारे सर्व आमदार हे जनतेने निवडूण येतात. त्यामुळे त्यांना त्यांचे प्रश्न मांडण्याचा हक्क आहे. रात्री कितीही उशीर झाला तरी हरकत नाही. त्यामुळे सदस्यांना बोलू द्या अशी मागणी केली. त्यानंतर तालिका अध्यक्ष साबणे यांनी शिवसेनेच्या सदस्यांना बोलण्यास संधी दिली. आणि अखेर नरके, मुंदडा यांनी आपले राहीलेले भाषण पूर्ण केले.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या चार टप्प्यात ६६.९५ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यात एकूण मतदान ६६.९५% इतके नोंदवले गेले आहे, निवडणूक आयोगाने गुरुवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *