Breaking News

पंतप्रधानांच्या आरोपावर संजय राऊत म्हणाले, “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी बोलावं ” दिला घरचा आहेर, मी काय ठेका घेतलाय का?

मराठी ई-बातम्या टीम

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना प्रसारास महाराष्ट्र काँग्रेसला जबाबदार धरत आम आदमी पार्टीलाही त्यांनी जबाबदार धरत या पक्षांनी महाभयानक संकटातही गलिच्छ राजकारण केल्याची टीका केली. पंतप्रधानांच्या टीकेवर प्रसारमाध्यमांनी शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांना विचारण्यात आले असता ते संतापून म्हणाले की, मी बोलतो म्हणजे प्रत्येक गोष्टीवर मीच बोलले पाहिजे का यावर राज्य सरकारमधल्या लोकांनी बोलले पाहिजे. मी काही ठेका नाही घेतला असा घरचा आहेर महाविकास आघाडी सरकारला दिला.

मी महाराष्ट्र अभिमानी आहे. मी महाराष्ट्राचा नेता आहे. ही महामारी आहे. या महामारीचा उगम चीनमधून झालाय. मात्र यासंदर्भात पंतप्रधानांनी महाराष्ट्रावर केलेली टीका ऐकून मला वाईट वाटल्याचे सांगत जागतिक आरोग्य संघटनेनं त्यात तथ्य मांडलंय. महाराष्ट्रासारख्या राज्यावर खापर फोडणं चुकीचं. जागतिक आरोग्य संघटनेनं धारावी पॅटर्नचं कौतुक केले. महाराष्ट्रातील सरकार, मुंबई महापालिका कसं काम करतेय याचं दाखले, आदर्श सर्वोच्च न्यायालयाने इतर राज्यांना दिल्याची आठवणही त्यांनी यावेळी पंतप्रधानांना करून दिली.

जागतिक आरोग्य संघटनेने केलेलं कौतुक, न्यायालयाने दिलेले दाखले या सर्व गोष्टींचा विचार न करता महाराष्ट्र आणि मुंबईमुळे ही महामारी पसरली असं सांगणं हे महाराष्ट्रातील साडे अकरा कोटी जनतेचा लोकनियुक्त सरकारने केलेला अपमान असल्याचा उपरोधिक टोला करत ज्या डॉक्टर, नर्स, पारिचारिकांनी मरण पत्करणाऱ्यांचा सुद्धा अपमान असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपाच्या प्रमुख नेत्यांनी पुढं येऊन यावर बोलायला हवे. एक महाराष्ट्राचे नेते म्हणून बोलायला हवं अशी अपेक्षा व्यक्त करत ते म्हणाले, मतभेद एका बाजूला आहेत. पण ठपका ठेवण्याचा जो प्रयत्न झाला. चार राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन प्रयत्न करण्यात आल्याची टीका त्यांनी केला.

सोनू सूद कोणाचे कोण होते? त्यांना राजभवानात कोणी नेलं?, त्यांना राज्यपालांच्या हस्ते सोनू सूदचा सत्कार करणारे कोण होते? त्यांचं कौतुक कोण करत होतं?, लोकांना महाराष्ट्राबाहेर पाठवणारं कोण होतं? (सोनू सूद प्रकरणात) आम्ही म्हणत होतो की थांबा घाई करु नका, तीच आमची भूमिका होती असेही ते म्हणाले.

यासंदर्भात सविस्तर प्रतिक्रिया राज्य सरकारतर्फेच, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मांडायला हवी. मी माझ्या पुरतं माझं एक मत मांडलं. सरकारमध्ये जे बसलेले आहेत त्यांनी बोलायला हवं. महाविकास आघाडी सरकारने गप्प बसू नये असे आवाहनही त्यांनी महाविकास आघाडीतील पक्षांना केले.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार

भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *