Breaking News

शरद पवार म्हणाले, मुख्यमंत्री पदाचे त्यांचं स्वप्न स्वप्नच राहणार काहीजण युनोचेही अध्यक्ष म्हणून जाहिर केले तर मला हरकत नाही असे सांगत अजित पवारांना लगावला टोला

राष्ट्रवादी पक्षात अजित पवार यांनी बंड करत भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यात सर्वत्र त्यांना मुख्यमंत्रीपद मिळणार अशी जोरदार चर्चा सुरु झाली. अजित पवारांच्या अगोदर स्वपक्षाला खिंडार पाडत भाजपासोबत घरोबा केलेले एकनाथ शिंदे सध्या मुख्यमंत्री आहेत. अशात भाजपा नेतृत्व लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर, शिंदेंना हटवून पवारांना मुख्यमंत्री पदी बसवणार का? असा प्रश्नही चर्चिला जात असताना अजित पवार यांचे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न स्वप्नच राहणार असल्याचे भाकीत शरद पवार यांनी केले.

सध्या शरद पवार हे अकोला शहराच्या दौऱ्यावर आहेत तेथील एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी अजित पवार यांच्याविषयी टीपण्णी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर एकीकडे अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट निर्माण झाले आता राष्ट्रवादी कोणाची? हा वाद निवडणूक आयोगात पोहोचला असून दोन्ही गटांकडून पक्षाचे नाव व चिन्हावर दावा करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, अजित पवार यांचे मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न स्वप्नच राहणार शरद पवार यांचं हे विधान अजित पवार त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आनंदावर विरजण सोडणारं आहे. यावर आता अजित पवार गटाचे नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहावे लागणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना नजीकच्या काळात मुख्यमंत्रीपद देण्यात येणार असल्याच्या चर्चांच्या फुग्यातील हवा आधीच काढून घेतली आहे. ‘एकनाथ शिंदे आपला कार्यकाळ पूर्ण करतील, अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची संधी देण्यात आल्यानंतर ती पूर्ण ५ वर्ष देण्यात येईल.’ असं फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं.

अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले पोस्टर राज्यात ठिकठिकाणी झळकले आहेत. त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी कार्यकर्ते आतूर झालेल आहेत. नाशिकच्या एका कार्यक्रमात मंत्री छगन भुजबळ आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी अजितदादांना मुख्यमंत्री पदावर बसवायचं असेल तर आपल्याला काम करावं लागेल नव्वद आमदार निवडून आणावे लागतील तरच ते शक्य आहे असे भाषणात सांगितले होते. मात्र शरद पवारांना सोडून भाजपाशी जवळीक साधल्यानंतरही अजित पवार यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ अद्याप पडू शकली नाही.

दरम्यान, अजित पवार यांनी स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे जाहिर केले. त्याबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले, काही जण युनोचेही अध्यक्ष म्हणून जरी जाहिर केले तरी मला काही हरकत नाही असा उपरोधिक टोला लगावला.

Check Also

संध्या सव्वालाखे यांचा आरोप…भाजपा सरकार महिला अत्याचार रोखण्यात अपयशी

भारतीय जनता पक्ष बेटी बचाओ, बेटी पढाओ, लेक लाडकी, लाडली बहना यासारख्या योजनांचा गाजावाजा करते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *