Breaking News

संजय राऊत यांचा पलटवार, पंतप्रधानपदासाठी आमच्याकडे अनेक पर्याय, तुमच्याकडे तर…

तुमच्याकडे गेल्या दहा वर्षापासून पंतप्रधान पदासाठी एकच चेहरा आहे. पण आमच्याकडे बरेच पर्याय आहेत. यामध्ये राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, आणि उद्धव ठाकरे यांच्यातील कुणीही पंतप्रधान होऊ शकतं. देशात इंडिया आघाडीची सत्ता येईल तेव्हा या नेत्यांपैकी कोणीही पंतप्रधान होऊ शकतो असा दावा शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपावर टीका करताना केली. इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही अशी टिका भाजपाने केली होती त्यावर पलटवार करताना वरील वक्तव्य केले.

संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले, आगामी लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आली असून सर्वच पक्ष आपल्या पद्धतीने व्युव्हरचना आखत आहेत. भाजपा प्रणित एनडीए आघाडीला रोखण्यासाठी देशभरातील विरोधकांनी इंडिया आघाडी स्थापन केली आहे. या इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदासाठी उमेदवारच नाही अशी टीका भाजपाचे नेते सातत्याने करत आहेत. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आमच्याकडे नरेंद्र मोदीं सारखा कणखर नेता आहे, विरोधकांकडे पर्यायच नाही अशी टीका केली होती. त्यावर संजय राऊत यांनी सणसणीत दिले.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, इंडिया आघाडीकडून पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असू शकतो याबाबत काही नावेही जाहीर केली. भाजपानं नरेंद्र मोदींना भगवान विष्णुचा तेरावा अवतार घोषित केल आहे. रामाचा हात धरून ते त्यांना मंदिरात बसवणार या राम मंदिरावरून संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला. मंदिरात जाणारा हा भक्त असतो, पण या देशात मंदिरात जाणारा एकमेव व्हीआयपी म्हणजे नरेंद्र मोदी अशी खोचक टीकाही केली.

संजय राऊत म्हणाले, जेव्हा बाबरी पाडण्यात आली त्यावेळी हे सर्वजण कुठे होते बाळासाहेब ठाकरेंनी तेव्हा पुढे येऊन जबाबदारी घेतली. बाबरीचं घुमट कोसळताच जे पळून गेले, हे आमचं काम नाही म्हणणारे आता छाताडाची भाषा करत आहेत. तेव्हा कुठे होती छाताडं? असा खोचक सवालही केला.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

मनोज जरांगे पाटील गुलाल उधळत म्हणाले, अध्यादेश टिकवण्याची जबाबदारी…

राज्यातील मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे या मागणीकरीता सुरु करण्यात आलेले मनोज जरांगे पाटील यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *