Breaking News
बाईकवर लडाखहून पैंगोंग त्सो लेक रवाना झाले Rahul Gandhi

बाईकवर लडाखहून पैंगोंग त्सो लेक रवाना झाले राहुल गांधी ते त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची ८० वी जयंती रविवारी पंगोग त्सो लेक येथे साजरी करणार आहेत

काँग्रेस खासदार राहुल गांधी ( Rahul Gandhi) शनिवारी बाईकने लडाखहून पॅंगॉन्ग त्सो लेककडे रवाना झाले. ते त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची ८०वी जयंती रविवारी (२० ऑगस्ट) रोजी पंगोग त्सो लेक येथे साजरी करणार आहेत.

राहुलने त्यांच्या भेटीचे काही फोटो सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर शेअर केले आहेत. पॅंगॉग त्सो तलावाच्या वाटेवर त्यांनी लिहिले. माझे वडील म्हणायचे की हे जगातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे.

५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० आणि ३५ (A) हटवल्यानंतर राहुल गांधी यांचा हा पहिला लडाख दौरा आहे. राहुल यांनी या वर्षाच्या सुरुवातीला दोनदा श्रीनगर आणि जम्मूला भेट दिली असली तरी त्यांनी लडाखला भेट दिली नाही.

पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, राहुल गांधी केंद्रशासित प्रदेश लडाखच्या दोन दिवसीय भेटीसाठी गुरुवारी लेह येथे पोहोचले, परंतु त्यांचा दौरा आता २५ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला आहे.

कारगिलमध्ये १० सप्टेंबरला होणाऱ्या हिल कौन्सिलच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. कारगिल हिल कौन्सिलच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने नॅशनल कॉन्फरन्ससोबत युती केली आहे.

Check Also

नाना पटोले यांचे टीकास्त्र, नरेंद्र मोदी फेल झालेले इंजिन…

नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षात देशाला अधोगतीकडे नेले आहे. मोदींनी जनतेला दिलेले एकही आश्वासन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *