Breaking News

Tag Archives: jammu and kashmir

कुपवाडा येथील भारत- पाक नियंत्रण रेषेजवळ झाला शिवजयंतीचा सोहळा

काश्मिरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी शिवजयंतीचा कार्यक्रम झाला. सर्वत्र बर्फाच्छादित वातावरण, उणे तापमानात लष्कराच्या जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय लष्कराच्या जवानांचे अभिनंदन करीत त्यांचे कौतुक केले. हिमवर्षावात देखील काश्मीर खोऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष दुमदुमला. …

Read More »

केंद्रीय मंत्री अमित शाह यांची ट्विटरवरून मुस्लिम लीगवर बंदी नव्या कायद्यातंर्गत युएपीए कायद्याखाली केली कारवाई

देशाचा अविभाज्य भाग असलेल्या जम्मू काश्मीर राज्यासाठी असलेल्या ३७० कलमाच्या माध्यमातून विशेष राज्याचा देण्यात आला. परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपाच्या अजेंढ्यावरील विषयाची प्रतिपूर्ती करण्यासाठी जम्मू काश्मीरला लागू असलेले कलम ३७० च रद्द केले. त्याचबरोबर या राज्याचा दर्जाही काढून घेतला. संसदेने घेतलेल्या या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले. त्यानंतर …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयः कलम ३७० ही तात्पुरती तरतूद

२०१९ साली केंद्रातील मोदी सरकारने जम्मू व काश्मीर राज्याला कलम ३७० कलमान्वये देण्यात आलेला विशेष राज्याचा दर्जा काढून घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापाठीने आज योग्य ठरविला. सर्वोच्च न्यायालयात चार वर्षापूर्वी दाखल करण्यात आलेल्या या संदर्भातील याचिकेवर आज मुख्य सरन्यायाधीश डि वाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय खंडपीठाने केंद्र …

Read More »

भारत-पाक सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार पुतळ्याचे अनावरण

काश्मिरमधील कुपवाडा जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेनजीकच्या ४१ राष्ट्रीय रायफल (मराठा एलआय) याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा बसविण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकार्पण मंगळवार ७ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार देखील उपस्थित राहणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री शिंदे जवानांसोबत दिवाळी फराळाचा आनंद देखील …

Read More »

कारागिल-द्रास युद्ध स्मारकाला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,… ऊर्जा आणि प्रेरणादायी 'कारगिल आश्चर्याचा धक्का ते विजय' पुस्तकाचे प्रकाशन

द्रास येथील युद्ध स्मारकाला भेट दिल्यावर आणि आपल्या शूर सैनिकांच्या पराक्रमाची गाथा जाणून घेतल्यानंतर खूप अभिमान वाटला. द्रास युद्ध स्मारकाला दिलेली भेट प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारी असून देशभक्तीची भावना अधिक वृद्धिंगत करणारी आहे, या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मुख्यमंत्री शिंदे रविवारपासून काश्मीर दौऱ्यावर असून आज …

Read More »

महाराष्ट्र काश्मीरच्या मैत्रीचा नवा अध्याय काश्मिरच्या तरुणांच्या मदतीसाठी सदैव सज्ज, 'सरहद'च्या उपक्रमांना शासनाचे सहकार्य - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र आणि काश्मीरच्या मैत्रीचे नवे पर्व सुरू झाले आहे. काश्मीरच्या तरुणांसाठी ‘सरहद’ संस्था करत असलेले कार्य मोलाचे असून या तरुणांच्या प्रगतीसाठी आवश्यक असे सर्व पाठबळ दिले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी काल येथे सांगितले. पुणे येथील ‘सरहद’ संस्थेमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त विविधतेतील एकतेला सलाम …

Read More »

जम्मू-काश्मिरात ८ फरार दहशतवाद्यांना अटक तब्बल ३० वर्षांपासून फरार होते दहशतवादी

8 fugitive terrorists arrested in Jammu and Kashmir

जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी आज, गुरुवारी ८ फरार जिहादी दहशतवाद्यांना अटक केली. हे जिहादी दहशतवादी तीन दशकांपासून लपून बसले होते आणि अटक टाळत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये आदिल फारुख फरीदी (सरकारी कर्मचारी), मोहम्मद इक्बाल, मुजाहिद हुसेन, तारिक हुसैन, इश्तियाक अहमद देव, एजाज अहमद, जमील अहमद आणि …

Read More »

बाईकवर लडाखहून पैंगोंग त्सो लेक रवाना झाले राहुल गांधी ते त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची ८० वी जयंती रविवारी पंगोग त्सो लेक येथे साजरी करणार आहेत

बाईकवर लडाखहून पैंगोंग त्सो लेक रवाना झाले Rahul Gandhi

काँग्रेस खासदार राहुल गांधी ( Rahul Gandhi) शनिवारी बाईकने लडाखहून पॅंगॉन्ग त्सो लेककडे रवाना झाले. ते त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची ८०वी जयंती रविवारी (२० ऑगस्ट) रोजी पंगोग त्सो लेक येथे साजरी करणार आहेत. राहुलने त्यांच्या भेटीचे काही फोटो सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर शेअर केले आहेत. पॅंगॉग …

Read More »

मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या, राष्ट्रध्वजाची जागा भगवा झेंडा घेईल भारत हा धर्मनिरपेक्ष देश पण आता गोडसेंचा देश बनवला जातोय

काही वर्षापूर्वी भाजपाने पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांच्याशी युती करत जम्मू काश्मीर मध्ये सरकार स्थापन केले. मात्र कालांतराने भाजपा आणि पीडीपीमध्ये राजकिय मतभेद झाल्यानंतर ही युती संपुष्टात आली. त्यातच जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर पीडीपीकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर मेहबुबा मुफ्ती यांनी भीती व्यक्त करत म्हणाल्या, …

Read More »

३७० हटविल्यानंतर काश्मीरमध्ये घेतल्या इतक्या लोकांनी जमिनी, केंद्राची संसदेत माहिती अवघ्या ३४ लोकांनी काश्मीरमध्ये जमीन खरेदी केली

मोठा गाजावाजा करत काश्मीरमधील कलम ३७० हटविण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला. त्यास नुकतीच तीन वर्षेही पूर्ण झाली. हा निर्णय घेतल्यानंतर काश्मीरमध्ये देशातील इतर नागरीकही मोठ्या प्रमाणावर मालमत्ता खरेदी करून रहायला जातील अशा अनेक वल्गना भाजपाकडून करण्यात येत होत्या. तसेच काश्मीरमधील लोकांची रोटी-बेटी व्यवहार होईल अशा हवेतल्या कल्पनाही मांडण्यात आल्या. …

Read More »