Breaking News

पंतप्रधान मोदी यांनी नव्या संसदेत महिला आरक्षण विधेयक मांडताना म्हणाले,… नारिशक्ती बंधन अधिनियम विधेयक सर्व पक्षाच्या खासदारांनी मंजूर करण्याचे केले आवाहन

मागील अनेक वर्षापासून देशात आणि सर्व राजकिय पक्षांकडून सातत्याने महिला आरक्षण विधेयक लागू करण्यासंदर्भात सातत्याने चर्चा करण्यात येत होती. त्यातच काँग्रेसचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असताना राज्यसभेत महिला आरक्षणाचे विधेयक मांडत मंजूर करण्यात आले. मात्र लोकसभेत या विधेयकाला मुहूर्त लागत नव्हता. अखेर संसदेच्या नव्या इमारतीच्या पहिल्याच दिवशी महिला आरक्षण विषयक नारीशक्ती बंधन विधेयक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत मांडत सर्व पक्षिय खासदारांनी हे विधेयक मंजूर करावे असे आवाहनही केले.

दरम्यान सोमवारी रात्री केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत महिला आरक्षण विधेयकाला मंजूरी देण्यात आली. त्यानंतर काल सोमवारपासून संसदेच्या नव्या इमारतीत महिला आरक्षण विधेयक मांडले जाणार असल्याची चर्चा सुरु झाली. त्यानुसार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधेयक मांडले. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, काही गोष्टी करण्यासाठी ईश्वराने माझी निवड केली आहे.

मागील अनेक वर्षापासून देशात आणि सर्व राजकिय पक्षांकडून सातत्याने महिला आरक्षण विधेयक लागू करण्यासंदर्भात सातत्याने चर्चा करण्यात येत होती. त्यातच काँग्रेसचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असताना राज्यसभेत महिला आरक्षणाचे विधेयक मांडत मंजूर करण्यात आले. मात्र लोकसभेत या विधेयकाला मुहूर्त लागत नव्हता. अखेर संसदेच्या नव्या इमारतीच्या पहिल्याच दिवशी महिला आरक्षण विषयक नारीशक्ती बंधन विधेयक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत मांडत सर्व पक्षिय खासदारांनी हे विधेयक मंजूर करावे असे आवाहनही केले.

दरम्यान सोमवारी रात्री केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत महिला आरक्षण विधेयकाला मंजूरी देण्यात आली. त्यानंतर काल सोमवारपासून संसदेच्या नव्या इमारतीत महिला आरक्षण विधेयक मांडले जाणार असल्याची चर्चा सुरु झाली. त्यानुसार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधेयक मांडले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आपण सगळ्यांनी नवा इतिहास रचला आहे. असे काही क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात. आज असाच एक क्षण आला आहे. नव्या संसदेच्या पहिल्या सत्रातील पहिल्या भाषणात मी खूप विश्वास आणि गर्वाने सांगतोय की आजचा हा दिवस खूप खास आहे. आजच्या या दिवशी मी ‘नारी शक्ती बंधन अधिनियम’ (महिला आरक्षण विधेयक) लोकसभेच्या पटलावर मांडत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आज गणेश चतुर्थीचा दिवस आहे. गणपतीच्या आशीर्वादाने इतिहासात नोंद होईल असा हा आजचा दिवस आहे. आपल्या सर्वांसाठी हा क्षण खूप खास आहे. गेल्या अनेक वर्षांपासून देशात महिला आरक्षणाविषयी खूप चर्चा झाली, वादविवाद झाले. हे विधेयक पास करून कायदा बनवण्याचे अनेक प्रयत्न झाले. १९९६ मध्ये हे विधेयक पहिल्यांदा संसदेच्या पटलावर आलं. अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात अनेकदा हे विधेयक सादर करण्यात आलं. परंतु, ते पारित करून कायदा करण्यासाठी पुरेसं संख्याबळ त्यांच्याकडे नव्हतं. त्यामुळे आपलं स्वप्न अपूर्ण राहिलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, महिलांना अधिकार देण्याचं, त्यांच्या शक्तीचा उपयोग करण्याचं काम मला मिळालं आहे. ईश्वराने मला अशा अनेक पवित्र कामांसाठी निवडलं आहे. पुन्हा एकदा आमच्या सरकारने त्या दिशेने पाऊल टाकलं आहे. महिला अक्षणाच्या विषयाला आमच्या कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. १९ सप्टेंबर या तारखेला इतिहासात अमरत्व प्राप्त होणार आहे.

महिलांच्या नेतृत्वात देशाचा विकास हा आमचा संकल्प आम्ही पुढे नेत आहोत. आमचं सरकार एक प्रमुख संविधान संशोधन विधेयक सादर करत आहे. लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांच्या भागीदारीचा विस्तार करणे, हे या विधेयकाचं लक्ष्य आहे. आम्ही आज ‘नारी शक्ती बंधन अधिनियम’ सादर करत आहोत. याच्या माध्यातून आपली लोकशाही आणखी मजबूत होईल. मी देशातील माता, बहिणी आणि मुलींना नारी शक्ती बंधन अधिनियमासाठी शुभेच्छा देतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगत मी या सभागृहातील सर्व सदस्यांना आग्रहपूर्वक विनंती करतो की, सर्वानुमते हे विधेयक पास करा. या विधेयकाचं कायद्यात रुपांतर होईल तेव्हा त्याची ताकद अनेक पटींनी वाढेल. सर्वसंमतीने हे विधेयक पारित करावं अशी आग्रहपूर्वक विनंती असल्याचे सांगितले.

Check Also

श्याम मानव यांचा मोठा गौप्यस्फोट: अनिल देशमुख यांनी दिला दुजोरा उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शपथपत्र द्या, नाही तर अजित पवार यांच्या विरोधात द्या

तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शपथ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *