Breaking News

राहुल गांधी यांच्या त्या विधानावरून पंतप्रधान मोदींचा निशाणा; टीएमसीकडून तक्रार दाखल

लोकसभा निवडणूकीच्या प्रत्यक्ष रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रात या रणधुमाळीचा धुराळा अद्याप उडायला सुरुवात झालेली नसली तरी दक्षिण भारतातील केरळ, तामीळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये मात्र लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराला रंग चढण्यास सुरुवात झालेली आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या मेव्हणीने सीता सोरेन यांनी झारखंड मुक्ती मोर्चाचा राजीनामा देत भाजपामध्ये प्रवेश केला. तर दुसऱ्याबाजूला पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने मोदी की गॅरंटी ही घोषणा दिल्याने भाजपाच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

इंडिया आघाडीची नुकतीच मुंबईतील शिवाजी पार्कवर जाहिर सभा झाली. या जाहिर सभेत बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपाच्या शक्ती धोरणावर टीका करत या शक्ती संपवून टाकायची असल्याचा इशारा दिला. राहुल गांधी यांच्या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामीळनाडूत झालेल्या जाहिर सभेत प्रत्युत्तर देताना म्हणाले, आमच्या सरकारने स्त्री शक्तीला सातत्याने सन्मान आणि आदर केलेला आहे. त्यामुळे इथे बसलेल्या प्रत्येक स्त्रीया या आमच्या माता-भगिनी आहेत. परंतु या स्त्री शक्तीलाच संपविण्याची भाषा आज इंडिया आघाडीचे नेते करत आहेत असा पलटवार केला.

तसेच नरेंद्र मोदी पुढे बोलताना म्हणाले की, आमच्यावर जी काही टीका करायची आहे ती करा पण आमच्या धर्मावर टीका आणि लक्ष्य करू नका असा इशाराही दिला. तामीळनाडूतील सालेम येथील भाजपाच्या जाहिर सभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीला इशारा दिला.

दरम्यान, झारंखडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची मेव्हणी सीता सोरेन यांनी आज झारखंड मुक्ती मोर्चापासून फारकत घेत भाजपात प्रवेश केला. यावेळी सीता सोरेन यांनी पक्षाच्या प्रमुखांना पत्र लिहित त्यांच्या पतीच्या निधनानंतर पक्षाने आणि कुटुंबियाने त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केले. तसेच राजकिय पक्षातही आपणाकडे साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे झारखंड मुक्ती मोर्चा राजीनामा देत असल्याचे पत्रात नमूद केले.

तर दुसऱ्याबाजूला भाजपाकडून आणि नरेंद्र मोदी यांच्याकडून सातत्याने मोदी गॅरंटी या शब्दाचा प्रयोग निवडणूक प्रचारात करण्यात येतो. या शब्द प्रयोगावरून नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. मोदी की गॅरंटी म्हणजे सर्व संस्थांना ताब्यात घेणे या अर्थाने ही घोषणा देण्यात येत आहे. तसेच या संस्था हस्तगत करणे आणि पंतप्रधान पदावरील व्यक्तीने त्यानेच दिलेले आश्वासन कधीच पूर्ण केले नाही. यासंदर्भात तृणमूल काँग्रेसच्या नेत्या सागरिका घोष आणि बाबूल सुप्रियो यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *