Breaking News

प्रकाश आंबेडकर यांचा अल्टीमेटम, महाविकास आघा़डीला २६ मार्च पर्यंतची मुदत

आगामी लोकसभा निवडणूकीत काहीही करून भाजपाला केंद्रातील सत्तेत जाण्यापासून रोखण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उबाठा गटाकडून वंचित बहुजन आघाडीला समाविष्ट करून राज्यात भाजपाला सशक्त विरोध निर्माण करण्याच्या हालचाली सुरु आहेत. त्यादृष्टीने वंचित बहुजन आघाडीबरोबर सातत्याने जागा वाटपाची चर्चा सुरु आहे. परंतु अद्याप वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या चर्चेवर अद्यापतरी तोडगा निघू शकला नाही. त्यातच काँग्रेसने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहु महाराज यांची उमेदवारी जाहिर केली. परंतु महाविकास आघाडीबरोबरील चर्चेचा तिढा सुटलेला नसताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शाहु महाराज यांच्या उमेदवारीला पाठिंबा आज जाहिर केला.

काँग्रेसने तिसरी यादी जाहिर केल्यानंतर वंचितची भूमिका मांडण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर बोलत होते.

यावेळी उपस्थित प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, आम्ही २६ मार्च पर्यंत महाविकास आघाडीची वाट बघणार आहोत. त्यानंतर वंचित बहुजन आघाडी आपली भूमिका जाहिर करणार असल्याचे यावेळी जाहिर केले.

दरम्यान, एका प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीने प्रकाश आंबेडकर यांना प्रश्न केला की, तुम्ही ६ जागांचा प्रस्ताव महाविकास आघाडीचा प्रस्ताव दिल्याची चर्चा आहे. तुम्हाला किती जागांवर विजय मिळेल असा विश्वास आहे असा सवाल केल्यानंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सध्या तरी आम्ही महाविकास आघाडीला दिलेल्या प्रस्तावावर काय उत्तर दिले जाते याची वाट आम्ही पाहतोय. जर २६ तारखेपर्यंत महाविकास आघाडीचा प्रतिसाद मिळाला तर त्यांच्यासोबत अन्यथा आम्ही यापूर्वीच जाहिर केल्याप्रमाणे २६ मार्च रोजी आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू सांगत अधिक बोलणे टाळले.

त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, त्या तिघांमध्येच लोकसभा जागांवरून खेचाखेची सुरू आहे. त्यामुळे त्यात आम्ही आमचा विषय कुठे पुढे नेणार. त्यामुळे त्यांच्यातील चर्चा अंतिम झाल्यानंतर आम्ही आमची भूमिका मांडू असे सांगत आम्ही काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना दिलेल्या प्रस्तावानुसार त्यांनी त्यांच्या पसंतीच्या ७ जागा आम्हाला सांगाव्यात त्या सात जागांवर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. तसेच आम्हाला ७ जागा द्याव्यात अशी मागणी यावेळी जाहिर केली.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *