Breaking News

राजकारण

आमचे पोलिस काय करत होते? भाजपा नेते अॅड.आशिष शेलार यांचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी मुंबईत येऊन दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने जान मोहम्मद शेख याला अटक केल्याच्या घटनेनंतर भाजपाने राज्याचे गृहमंत्री आणि पोलिसांवर निशाणा साधत हे दहशतवादी महाराष्ट्रात, मुंबईत वास्तव्य करून दहशतवादी कट करत असताना राज्याचं एटीएस झोपलं होतं का? या दहशतवाद्यांच्या बाबतीत राज्यातले पोलिस काय करत होते? असा सवाल भाजपा नेते …

Read More »

ओबीसी आरक्षणप्रश्नी ही तर भाजपाची नौटंकी, पाप झाकता येणार नाही मोदी व फडणवीसच ओबीसी आरक्षणाचे मारेकरी त्यांच्याविरोधात आंदोलन करावे-नाना पटोले

मुंबई : प्रतिनिधी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील भारतीय जनता पक्ष करत असलेले आंदोलन ही नौटंकी आहे. केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी न दिल्याने व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिपत्रक काढून जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलल्याने फक्त महाराष्ट्राच नाही तर देशातील ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. आंदोलनाची नौटंकी …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार संतपीठाची जबाबदारी आता डॉ.आंबेडकर विद्यापीठाकडे पैठणच्या संतपीठाचे अभ्यासक्रम सुरु होणार

मुंबई: प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ९ सप्टेंबर २०२१ रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला तेंव्हा त्यांनी पैठण येथील संतपीठाचे शैक्षणिक व्यवस्थापन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे सोपविण्याची सुचना केली होती त्यानुसार उच्च व तंत्रशिक्षण विभागाने यासंबंधीचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. या निर्णयामुळे संतपीठाच्या कामाला आता वेग मिळणार आहे. पैठण …

Read More »

राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि या पध्दतीची अमंलबजावणी होणार •राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भातील कार्यबल गटाच्या शिफारशींचे सादरीकरण

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० संदर्भात अभ्यास करुन राज्य शासनास अहवाल सादर करण्यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या कार्यबल गटाच्या शिफारशी आणि सूचनांची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनामार्फत कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. शैक्षणिकदृष्ट्या राज्याचा सर्वांगिण विकास करणे आणि या …

Read More »

सरकार जे बोलतं ते कृतीत दिसत नाही देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यावर निशाणा

नागपूर: प्रतिनिधी ओबीसी आरक्षणप्रश्नावर आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणूका घ्यायच्या नाहीत असा निर्णय सर्व पक्षियांच्या उपस्थित राज्य सरकारने घेतला. मात्र आता निवडणुका लागल्या आहेत, तर त्याला आम्ही सामोरं जाऊ, पण एकप्रकारे सरकार जे बोलतं ते सरकारच्या कृतीत मात्र कुठं दिसत नाही असे स्पष्ट दिसून येत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

भाजपाच्या टीकेनंतरही नीती आयोगाने केले कौतुक : मुंबईसह या प्रश्नी आश्वासन केंद्राकडील राज्याच्या प्रलंबित विषयांना त्वरेने मार्गी लावणार

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या २ ऱ्या लाटेनंतर संभावित ३ ऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने काही निर्बंध राज्यातील जनतेवर लादत अनेक गोष्टी खुल्या केल्या. मात्र या निर्बंधावरून भाजपा नेत्यांकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे. मात्र राज्य सरकारकडून कोरोनाला रोखण्यासाठी केलेल्या कामाचे कौतुक नीती आयोगाने केले. महाराष्ट्राला देशात क्रमांक एकवर आणण्यासाठी …

Read More »

शहरी भागातील नव्या रेशनिंग दुकानासाठीची बंदी उठविली नवीन रास्त भाव धान्य दुकाने सुरू करता येणार- मंत्री छगन भुजबळ

मुंबई : प्रतिनिधी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे आणि कोरोनामुळे गरजूंना अन्न धान्यांचे वाटप लगेच व्हावे या उद्देशाने शहरी भागात असलेली नव्या रेशनिंग दुकानावरील अर्थात रास्त भाव दुकाने सुरु करण्याबाबत असलेली बंदी उठविण्यात आली आहे. त्यामुळे आता शहरी भागात आता नव्याने रेशनिंग दुकान सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती अन्न …

Read More »

केवळ परप्रांतियच अशा प्रकारचे गुन्हे करतात का? गुन्ह्यांवरून एखाद्या समाजाला टार्गेट करणे योग्य नाही

पुणे : प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांनी परप्रांतियांना उद्देशून दिलेल्या आदेशाचा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समाचार घेतला आणि असे एखाद्या समाजाला लक्ष्य करणे योग्य नसल्याचे सांगत केवळ परप्रांतीयच गुन्हे करतात का? असा उलट सवाल त्यांनी केला. ते मंगळवारी पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. साकीनाका निर्भया प्रकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस महासंचालक …

Read More »

वडेट्टीवार मोठे विधान,….प्रश्न सुटणार असेल तर राजीनामा द्यायला तयार ओबीसी आरक्षणावरून वातावरण पुन्हा तापणार

मुंबई: प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने प्रलंबित पाच जिल्ह्यातील जिल्हा परिषदा आणि रिक्त झालेल्या पंचायत समित्यांच्या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केला. तरीही राज्यातील राजकारण ओबीसी आरक्षणावरून पुन्हा तापणार असल्याचे दिसून येत असून माझ्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार असेल तर राजीनामा देण्यास तयार असल्याचे मोठे वक्तव्य राज्याचे …

Read More »

प्रविण दरेकरांचे राष्ट्रवादीच्या चाकणकरांना प्रत्युत्तर, म्हणाले… हा तर वडयाचे तेल वांग्यावर काढण्याचा प्रकार

मुंबई: प्रतिनिधी माझे वक्तव्य नीट ऐकले असते तर त्याचा अर्थ कळला असता, पण हे दुसरं काही नाही तर वड्याचं तेल वांग्यावर काढायचा प्रकार आहे. कारण अशा वक्तव्यांमुळेचं त्यांना थोडीफार प्रसिध्दी मिळते, त्यामुळे आपण अशा वक्तव्यांना फार महत्त्व द्यावे असा आपल्याला वाटत नसल्याचा टोला विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी …

Read More »