Breaking News

राजकारण

नाना पटोले यांची घोषणा,… राज्यभर ‘शर्म करो मोदी, शर्म करो’ आंदोलन सत्यपाल मलिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना भाजपला उत्तर द्यावेच लागेल

पुलवामा घटनेच्या मागे एक मोठे षडयंत्र लपलेले आहे हे जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरून स्पष्ट होते. सत्यपाल मलिक यांना गप्प बसण्यास का सांगितले? पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री यांनी सत्य का लपवले? पुलवामा घटनेवर मौन बाळगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरुन ‘शर्म करो मोदी, …

Read More »

जयंत पाटील यांची अखेर ग्वाही, त्या युवकांच्या पाठीशी सर्वशक्तीनिशी… रॅप सॉंग्सच्या माध्यमातून व्यवस्थेवर कडक शब्दात टिका करणार्‍या युवकांच्या पाठीशी राष्ट्रवादी

व्यवस्थेवर कडक शब्दात रॅप सॉंग्सच्या माध्यमातून टिका करणार्‍या युवकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असून अशा युवकांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस सर्व शक्तीनिशी उभी राहिल अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्वीट करुन दिली आहे. गेले काही दिवस महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्हयातील युवक व्यवस्थेवर कडक शब्दात टीका …

Read More »

नाना पटोले यांचा इशारा, महाविकास आघाडीतच निवडणुक लढवा, अन्यथा… बाजार समिती, खरेदी विक्री संघ निवडणुकीत भाजपा व शिंदे गटाशी युती करु नये

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची राज्यात महाविकास आघाडी आहे. राज्यातील सर्व प्रकारच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढवण्याचा पक्षाचा निर्णय आहे. परंतु काही ठिकाणी शिंदे गट व भाजपाशी युती केल्याच्या तक्रारी येत आहेत, हे पक्षशिस्तीचे उल्लंघन आहे. अशी युती करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा काँग्रेस …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, राज्यातील बसस्थानके आता विमानतळांप्रमाणे… नागपूर बसस्थानकापासून उपक्रमास प्रारंभ होणार

महारेलमार्फत राज्यात येत्या वर्षभरात शंभर रेल्वे उड्डाणपूल उभारले जाणार असून पुढील पाच वर्षात राज्यातील रेल्वेचा प्रवास हा फाटकमुक्त होईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. यासोबतच महारेलच्या माध्यमातूनच राज्यातील बसस्थानकेही विमानतळाप्रमाणे बांधून अद्ययावत करण्यात येतील व त्याची सुरुवात नागपूर बसस्थानकापासून करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली. विदर्भातील रेल्वे …

Read More »

भाजपा म्हणते,… खोटी माहिती देणे थांबवा कांजूर येथील १५ एकर जागा मेट्रो ६ च्या कारशेडला

केवळ स्वतःच्या हट्टापायी मेट्रो कारशेड कांजूर मार्गला हलवत मुंबईकरांवर २० हजार कोटी अतिरिक्त खर्च लादून प्रकल्पाला विलंब करणाऱ्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदा त्याबद्दल माफी मागावी व पत्रकार परिषदेत खोटी माहिती देणे आदित्य ठाकरेंनी थांबवावे अशी मागणी भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. भाजपा प्रदेश प्रवक्ते …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी,….पंतप्रधानांनी तात्काळ खुलासा करावा पुलवामा आणि जम्मू काश्मिरप्रकरणी करण्यात आलेले गंभीर

पुलवामात ४० जवान शहीद झाले आणि दुसरीकडे मोदी सरकारमध्ये भ्रष्टाचार आहे असा दावा माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला असेल तर यावर तात्काळ पंतप्रधान व गृहमंत्र्यांनी खुलासा करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले, जम्मू आणि काश्मीरचे माजी …

Read More »

अरविंद केजरीवाल यांचा आरोप, सीबीआय आणि ईडीची न्यायालयात खोटी प्रतिज्ञापत्र १४ फोन नष्ट केले तर ४ फोन त्यांच्याकडे कसे

कथित उत्पादन शुक्ल घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना समन्स बजावले आहे. सीबीआयने केजरीवाल यांना रविवारी १६ एप्रिल रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, या समन्सवरून अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर टीका केली. अरविंद केजरीवाल म्हणाले, गेल्या वर्षभरापासून …

Read More »

सत्यपाल मलिक यांनी मुलाखती दरम्यान पुलवामा, कलम ३७० हटविण्यासंदर्भात केले हे दावेः वाचा ३७० कलम पोलिसी बंडाच्या भीतीने रद्द केले

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते सत्यपाल मलिक यांची द वायर या संकेतस्थळासाठी ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा सरकारवर गंभीर आरोप केले. त्यांच्या या आरोपांवरून सध्या देशभर राजकीय चर्चा सुरू झाली आहे. करण थापर यांनी ‘द वायर’साठी घेतलेल्या मुलाखतीमध्ये सत्यपाल मलिक यांनी विविध …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, निवडणुकांसाठी भाजपाने ४० जवानांच्या बलिदानाचे भांडवल केले का ? सत्यपाल मलिकांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर;पंतप्रधान मोदींनी उत्तर द्यावे

भाजपाचे वरिष्ठ नेते व जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटना व ३०० कोटींच्या ऑफरचा केलेला आरोप अत्यंत गंभीर आहे. सत्यपाल मलिक यांचे आरोप भ्रष्टाचार व देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक आहेत. पुलवामामध्ये ४० जवानांचे बळी गेले त्यात सरकारची चूक होती हे निदर्शनाला आणून दिले असता मोदींनी गप्प राहण्यास …

Read More »

२७ लाख नागरिकांना लाभ देणारा हा अभिनव उपक्रम यशस्वी करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश

आता प्रत्येक जिल्ह्यातून किमान ७५ हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ देणारी शासकीय योजनांची एक अभिनव अशी जत्रा उद्या १५ एप्रिलपासून सुरू होणार आहे. १५ जून पर्यंत चालणाऱ्या या जत्रेमध्ये संपूर्ण राज्यातून एकंदर २७ लाख लाभार्थींना थेट लाभ देण्यात येणार असून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने उत्तम नियोजन करावे, अशा …

Read More »