Breaking News

राजकारण

ओडिशातील रेल्वे अपघाताच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले जखमींची रूग्णालयात जाऊन केली विचारपूस

ओडिशातील बालासोरा येथे शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत २६१ जणांचे प्राण गेले असून ९०० हून अधिक जण जखमी आहेत. गेल्या दोन दशकातील ही सर्वांत भीषण घटना असल्याचंही म्हटलं जातंय. दरम्यान, याप्रकरणाची पाहणी करण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी घटनास्थळी भेट देवून परिस्थितीची माहिती घेतली. शुक्रवारी सायंकाळी ही …

Read More »

बाळासाहेब थोरात यांचा आरोप, शिंदे-फडणवीस सरकार कर्नाटकपेक्षा भ्रष्ट… लोकांचे ज्वलंत प्रश्न दुर्लक्षित करुन शिंदे सरकार इव्हेंटमध्ये मग्न

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला असून मंत्रालय हे भ्रष्टाचाराचा अड्डा बनले आहे. कर्नाटकातील भाजपा सरकार ४० टक्के कमिशनवाले सरकार होते, राज्यातील शिंदे सरकारमध्ये त्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार आहे. सरकार जनतेच्या महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे, केवळ मोठ मोठे इव्हेंट करुन प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी घणाघाती टीका विधिमंडळ …

Read More »

एकनाथ खडसे यांच्या भेटीनंतर पंकजा मुंडे म्हणाल्या, …पण त्याची दिशा बदलली खडसे आणि पंकजा मुंडे यांच्यात अर्धातास चर्चा

भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री तथा स्वर्गीय नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज ३ जून रोजी नववा स्मृतिदिन. त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार एकनाथ खडसे गोपीनाथ गडावर गेले. तेव्हा भाजपाच्या नेत्या, पंकजा मुंडे यांची एकनाथ खडसे यांनी भेट घेतली आहे. यावेळी खडसे आणि मुंडे यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. या बैठकीनंतर …

Read More »

रेल्वे मंत्र्याचा तो व्हिडिओ दाखवत काँग्रेसचा सवाल, ते बहुचर्चित ‘कवच’ कोठे गेले ? ओडिशातील रेल्वे अपघातप्रकरणी रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा

ओडिशातील बालासोर बहनागा बाजार स्टेशनजवळ झालेला रेल्वे अपघात शतकातील मोठा अपघात आहे. या अपघातील मृतांची संख्या पाहून मन सुन्न झाले. अपघातात एकही बळी जाऊ नये अशीच अपेक्षा आहे. अपघात रोखणारे महाकवच मोठा गाजावाचा करु आणले होते ते कोठे गेले? एवढा मोठा अपघात झाला त्याची जबाबदारी कोणावर तरी निश्चित झाली पाहिजे. …

Read More »

ओडिसातील रेल्वे अपघाताबद्दल सोनिया गांधी यांनी व्यक्त केला शोक रेल्वे अपघाताची उच्चस्तरीय चौकशीचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आदेश

ओडिसातल्या बालासोरे येथे शुक्रवारी रात्री उशिरा तीन ट्रेन्सचा अपघात झाला. या अपघातात आत्तापर्यंत २६१ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींनी शोक व्यक्त केला आहे. ही घटना अत्यंत वेदनादायी आहे अशी भावना व्यक्त केली. ओडिसातल्या बालासोरमध्ये झालेला अपघात हा अत्यंत वेदनादायी आहे. माझ्या संवेदना मृतांच्या कुटुंबीयासह …

Read More »

नाना पटोले म्हणाले, एकास एकच उमेदवार… देशात व राज्यात परिवर्तनाचे चित्र, भाजपाचे पानिपत करु

राज्यात सध्या महाविकास आघाडीला अनुकुल असे वातावरण आहे. काँग्रेस पक्ष राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहे. स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांची मते अजमावून घेतली जात आहेत. दोन दिवसाच्या या बैठकीनंतर लवकरच राज्यातील सर्व जिल्ह्याचे दौरे केले जातील, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. शुक्रवारी सिंधुदुर्ग रत्नागिरी, ठाणे, धुळे, …

Read More »

पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल, देशाची बदनामी होत असताना पंतप्रधान गप्प कसे?… बॉलिवूडसह सर्व नामांकित लोकांनी महिला कुस्तीपटूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे

रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रमुख आणि भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. बृजभूषण यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप असून याप्रकरणी कोर्टाच्या आदेशानंतर दोन गुन्हे दाखल केले आहेत. यातील एक एफआयआर पॉक्सो कायद्यांतर्गत नोंदवण्यात आला आहे. असे असतानाही भाजपा खासदार बृजभूषणला अटक होत नाही. …

Read More »

केशव उपाध्ये यांचा सवाल, महिला अत्याचाराबाबत राष्ट्रवादीची भूमिका धर्मानुसार ठरते का? मंचर येथील घटनेवरून विचारला परखड सवाल

मंचर येथील ‘लव्ह जिहाद’ घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि खा सुप्रिया सुळे यांची भूमिका धर्माच्या आधारावर ठरते का , असा परखड सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष वर्षा भोसले, मुंबई …

Read More »

अशोक चव्हाण यांची भूमिका, राष्ट्रीय मुद्द्यांबरोबरच स्थानिक मुद्द्यांना महत्व देण्याची गरज आघाडी करुन लढताना स्थानिक पातळीवर समन्वय महत्वाचा

आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी स्थानिक पातळीवरील वस्तुस्थिती जाणून घेणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर काँग्रेसची आघाडी आधीपासून आहेच पण आता या आघाडीत शिवसेनाही आहे. त्यामुळे निवडणुकीत स्थानिक पातळीवर समन्वय राहणे महत्वाचे आहे. चर्चेअंती मविआचा जो उमेदवार ठरेल त्याला निवडूण आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. काँग्रेस पक्ष राज्यातील ४८ मतदारसंघातील …

Read More »

३५० व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यात मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, प्रतापगड प्राधिकरणची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे व्हिजन दिले पंतप्रधान नरेंद्र मोदी

किल्ले रायगडाच्या पायथ्याशी ४५ एकरात शिवसृष्टी उभारण्यासाठी राज्य शासन ५० कोटी रुपयांचा निधी देणार आहे तसेच प्रतापगडाच्या संवर्धनासाठी राज्य शासन प्राधिकरण निर्माण करणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडावर झालेल्या ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यात केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे व्हिजन दिले, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Read More »